BIGG BOSS चं घर मुलींसाठी धोकादायक?अभिनेत्रीच्या वक्तव्यावरुन सोशल मीडियावर चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2021 01:30 PM2021-10-24T13:30:00+5:302021-10-24T13:30:00+5:30

Bigg Boss: सध्या सोशल मीडियावर बिग बॉस स्पर्धक तेजस्वी प्रकाश आणि जय भानुशाली यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

bigg boss 15 tejasswi prakash finds vishal kotian behaviour dirty and inappropriate | BIGG BOSS चं घर मुलींसाठी धोकादायक?अभिनेत्रीच्या वक्तव्यावरुन सोशल मीडियावर चर्चा

BIGG BOSS चं घर मुलींसाठी धोकादायक?अभिनेत्रीच्या वक्तव्यावरुन सोशल मीडियावर चर्चा

Next
ठळक मुद्देतेजस्वीच्या वक्तव्यावर सहमती दर्शवत जयदेखील तिला पाठिंबा देतो.

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त रिअॅलिटी शो म्हणून कायमच बिग बॉसकडे (bigg boss) पाहिलं जातं. स्पर्धकांना देण्यात येणाऱ्या टास्कसोबतच या घरातील काही सदस्यांच्या रिलेशनशीपचीदेखील सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे.  यामध्येच यंदाच्या पर्वात सहभागी झालेल्या एका अभिनेत्रीने घरातील एका स्पर्धकावर गंभीर आरोप करत बिग बॉसचं घर मुलींसाठी धोकादायक असल्याचं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे सध्या नेटकऱ्यांमध्ये चर्चेला उधाण आलं आहे. 

सध्या सोशल मीडियावर बिग बॉस स्पर्धक तेजस्वी प्रकाश( tejaswi prakash) आणि जय भानुशाली (jay bhanushali) यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये हे दोघं विशाल कोटियनबद्दल (vishal kotian) चर्चा करताना दिसत आहेत. विशाल प्रत्येक वेळी गैरवर्तन करतो आणि सतत जवळ येण्याचा प्रयत्न करतो, असं तेजस्वी यावेळी सांगताना दिसत आहे.

Bigg Boss: अश्लीलतेचा कळस! किसिंग सीनपासून चादर शेअर करेपर्यंत स्पर्धकांनी पार केल्या मर्यादा

"मी कायम सत्याच्या मार्गाने चालते. मी कधीच कोणाच्या पाठीमागे वाईट बोलत नाही. पण त्यांचा विनोद काय असतो? या आणि थेट मला मिठी मारा, हा सर्वात घाणेरडा विनोद आहे. आणि, मुळात या सगळ्या गोष्टी टेलिकास्टही करता येत नाहीत. त्याचं वागणं फार असभ्य आहे", असं तेजस्वी म्हणते.

तेजस्वीच्या वक्तव्यावर सहमती दर्शवत जयदेखील तिला पाठिंबा देतो. "विशालची भाषा स्त्रियांबद्दल कायम अनादराची असते," असं जय म्हणतो. दरम्यान, जय आणि तेजस्वीमधील हा संवाद ऐकल्यानंतर बिग बॉसचं घर महिला स्पर्धकांसाठी असुरक्षित किंवा धोकादायक ठरतंय का? असा प्रश्न नेटकऱ्यांमध्ये उपस्थित केला जात आहे. 
 

Web Title: bigg boss 15 tejasswi prakash finds vishal kotian behaviour dirty and inappropriate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app