एक काळ गाजवणारी लोकप्रिय मालिका रामायणचे निर्माता रामानंद सागर यांची पणती साक्षी चोप्रा बिग बॉस १४ मध्ये एन्ट्री घेऊ शकते अशी चर्चा रंगली आहे. साक्षी या शोमध्ये धमाकेदार एन्ट्री घेणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. आधीच आपल्या बोल्ड फोटोंमुळे साक्षी ही सतत चर्चेत असते. आता सर्वात लोकप्रिय शोमध्ये एन्ट्री घेण्यावरून ती चर्चेत आहे. 

साक्षी चोप्रा ही नेहमीच तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियात शेअर करत असते. ज्यामुळे ती नेहमीच चर्चेत असते. महत्वाची बाब म्हणजे साक्षीने अजून अॅक्टिंगच्या दुनियेत पाउल ठेवलेलं नाही. पण तरी सुद्धा तिचा एका मोठा चाहता वर्ग तयार झाला आहे. ती सध्या परदेशात आपलं शिक्षण पूर्ण कर आहे. 

साक्षीचा ग्लॅमरस अंदाज पाहून तिच्या चाहत्यांना घास फुटतो. अशात जर ती बिग बॉस च्या १४ व्या सीझनमध्ये आली तर टीआरपी वाढू शकतो असा अंदाज लावला जात आहे. साक्षी चोप्रा ही मीनाक्षी सागरची मुलगी आहे. तिचं वय २३ वर्षे आहे. ती गाणंही गाते आणि गाणी लिहिते सुद्धा. अशात ती या शोमध्ये आली तर तिचं करिअरला एक धक्का मिळू शकतो.

दरम्यान, सलमान खानच्या नेहमीच वादग्रस्त ठरणाऱ्या बिग बॉस शोच्या १४व्या सीझनचा प्रोमो रिलीज झाला आहे. हा प्रोमो सलमान खानने त्याच्या पनवेलच्या फार्म हाऊसवर शूट केलाय. कोरोना व्हायरसच्या थैमानात मेकर्स हा शो पुढे ढकलण्याच्या मूडमध्ये अजिबात नाहीत. काही नियम पाळून या शोचं शूटींग सुरू होईल. 
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Bigg Boss 14 : Ramanand Sagar's great grand daughter sakshi chopra may enter the show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.