Bigg Boss 14 : राहुल वैद्यसोबत कधी लग्न करणार दिशा परमार? अभिनेत्रीने दिली पहिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2021 17:25 IST2021-02-12T17:25:08+5:302021-02-12T17:25:38+5:30

दिशा व राहुलची पहिली भेट ‘याद तेरी’ या म्युझिक व्हिडीओच्या निमित्ताने झाली होती

Bigg boss 14 rahul vaidya lady love disha parmar reaction about their wedding | Bigg Boss 14 : राहुल वैद्यसोबत कधी लग्न करणार दिशा परमार? अभिनेत्रीने दिली पहिली प्रतिक्रिया

Bigg Boss 14 : राहुल वैद्यसोबत कधी लग्न करणार दिशा परमार? अभिनेत्रीने दिली पहिली प्रतिक्रिया

बिग बॉस 14 मध्ये राहुल वैद्य एक दमदार स्पर्धक म्हणून समोर आला आहे. शोमध्ये त्याने आपल्या लेडी लव्ह दिशा परमारला लग्नासाठी प्रपोज केले होते. 
मीडिया रिपोर्टनुसार व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी राहुलला सरप्राईज देण्यासाठी दिशा बिग बॉसच्या घरात जाऊ शकते.  या सर्वादरम्यान जेव्हा दिशा परमारला  जेव्हा राहुलसोबत लग्नाबाबत प्रश्न विचारला गेला.

काय म्हणाली दिशा परमार?
ईटाइम्सशी बोलताना  दिशा म्हणाली,  राहुल वैद्य बिग बॉस 14 ची ट्रॉफी घेऊन घरी यावे अशी माझी इच्छा आहे. बाकी सगळ्यावर नंतर चर्चा करु.
 २०२१ मध्ये ती राहुलसोबत लग्न करणार का असा प्रश्न विचारल्यावर, दिशा म्हणाली, ''जेव्हा मी यासाठी तयार होईन, तेव्हा मी यावर बोलेन.  जेव्हा वेळ येईल तेव्हा मी त्याबद्दल बोलेन. तेव्हा मी त्याबद्दल बरेच काही सांगेन.


दिशा ही सुद्धा टीव्ही इंडस्ट्रीचा एक लोकप्रिय चेहरा आहे. आपल्या ग्लॅमरस फोटोंमुळे ती नेहमी चर्चेत असते. 'प्यार का दर्द' या टीव्ही शोमध्ये दिशाने काम केले आहे. दिशा व राहुलची पहिली भेट ‘याद तेरी’ या म्युझिक व्हिडीओच्या निमित्ताने झाली होती. या व्हिडीओनंतर दोघांच्या डेटींगच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. दिशा टीव्ही सीरियल 'ती अपना सा'मध्ये दिसली होती. 

अभिनयात सुद्धा राहुलने आजमावले
 नशीब सोनू निगम, मीका सिंग आणि शानसारखे राहुल वैद्यने सुद्धा अभिनयात नशीब आजमावले आहे. 2016मध्ये राहुलने एक इंडो बांग्लादेशी सिनेमा साईन केला होता. या सिनेमात राहुल वैद्यने बंगाली कलाकार रिया चटर्जी आणि रिया सेनसोबत काम केले होते. राहुल वेद्यने अनेक म्युझिक अल्बमला आवाज दिला आहे. राहुल बॉलिवूडमध्ये अनेक गाणी गायली आहेत.

Web Title: Bigg boss 14 rahul vaidya lady love disha parmar reaction about their wedding