Bigg Boss 13:Contestant Daljeet Kaur Could Be Out From Bigg Boss 13 | Bigg Boss 13: या आठवड्यात ही सदस्य जाणार घराबाहेर, लाईफ पार्टनर शोधण्यासाठी आली होती घरात
Bigg Boss 13: या आठवड्यात ही सदस्य जाणार घराबाहेर, लाईफ पार्टनर शोधण्यासाठी आली होती घरात


छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिएलिटी शो बिग बॉसच्या तेराव्या सीझनला सुरूवात होऊन एक आठवडा उलटला. मात्र तरीदेखील अद्याप एकही सदस्य बेघर झालं नाही. आता दुसऱ्या आठवड्यासाठी नॉमिनेशन झालं आहे. नॉमिनेशननंतर आता घरात खरं राजकारण पहायला मिळणार आहे. या आठवड्यात रश्मी व सिद्धार्थ शुक्ला एकमेकांचे चांगले फ्रेंड्स झाल्याचं पहायला मिळत आहे. दुसऱ्या आठवड्यात या दोघांमध्ये वाद पहायला मिळाले. सिद्धार्थने रश्मीऐवजी आरती सिंगला सुरक्षित केले. 


आता या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून बाहेर पडणाऱ्या स्पर्धकाचे नाव समोर आले आहे. बिग बॉस खबरीच्या नुसार, या आठवड्यात अभिनेत्री दलजीत कौर घराबाहेर पडण्याची शक्यता आहे. बिग बॉस खबरीने ही माहिती इंस्टाग्रामवर दिली आहे. इंस्टाग्रामवर लिहिलं की, दलजीत कौर या आठड्यात घराबाहेर होईल.


या पोस्टवर लोकांचे खूप रिएक्शन येत आहेत. अद्याप याबाबत कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या घरातून बेघर होण्यासाठी रश्मी देसाई, कोएना मित्रा, दलजीत कौर व शहनाज गिलला नॉमिनेट केलं आहे. त्यातून आता कोण बाहेर पडणार हे आठवड्याच्या शेवटी समजेल.


 नुकत्याच प्रसारीत झालेल्या भागात बिग बॉसने बेड फ्रेंड फॉरेवर कॉन्सेप्ट बंद केलं. आता सर्व स्पर्धक एकमेकांना चांगले ओळखत असल्यामुळे बेड फ्रेंड फॉरेवर बंद केलं.

 


Web Title: Bigg Boss 13:Contestant Daljeet Kaur Could Be Out From Bigg Boss 13
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.