ठळक मुद्देसलमान त्यानंतर घरात सुरू असलेल्या भांडणांविषयी स्पर्धकांसोबत बोलणार आहे. सलमान याची सुरुवात पारसपासून करणार असून टास्करमध्ये त्याच्यामुळे कन्फ्यूजन निर्माण झाले होते असे त्याला सांगणार आहे.

बिग बॉस या कार्यक्रमाच्या गेल्या आठवड्यात आपल्याला काही स्पर्धकांमध्ये मैत्री होताना पाहायला मिळाली तर काही स्पर्धक एकमेकांशी भांडत असताना दिसले. बिग बॉसच्या घरात आता नवीन नाती निर्माण होत असून प्रत्येक स्पर्धकांचे एकमेकांसोबतचे नाते क्षणाक्षणाला बदलत आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. आजच्या आठवड्यात आता आणखी एक स्पर्धक प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. कोणता स्पर्धक बिग बॉसच्या घरातून पडणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे. 

विकेंडचा आठवडा म्हटला की, बिग बॉसचे फॅन्स या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक सलमान खानची आतुरतेने वाट पाहात असतात. या आठवड्यात सलमान चुनरी चुनरी या त्याच्या प्रसिद्ध गाण्यावर ताल धरत कार्यक्रमात एंट्री करणार आहे. घरातील वातावरण चांगले करण्यासाठी सलमान घरातील सदस्यांसोबत मजा मस्ती करताना दिसणार आहे. तो घरातल्यांशी गप्पा मारताना त्यांची टर उडवण्यासाठी काहीही न बोलता केवळ बोलण्याचे नाटक करणार आहे. त्यामुळे काहीतरी चुकीचे सुरू आहे असे समजताच स्पर्धक आम्हाला काहीही ऐकू येत नाहीये असे स्पष्टपणे सलमानला सांगणार आहेत. त्यावर घरात स्पर्धकांचे सतत सुरू असलेले कुजबूजणे घराबाहेरील स्पर्धकांच्या फॅन्सना आवडत नाहीये हे सांगण्यासाठी मी अशाप्रकारे वागलो असे सलमान त्यांना सांगणार आहे.

सलमान त्यानंतर घरात सुरू असलेल्या भांडणांविषयी स्पर्धकांसोबत बोलणार आहे. सलमान याची सुरुवात पारसपासून करणार असून टास्करमध्ये त्याच्यामुळे कन्फ्यूजन निर्माण झाले होते असे त्याला सांगणार आहे. टास्कच्या दरम्यान देण्यात आलेल्या सुचनांकडे पारसने दुर्लक्ष केले आणि त्याने त्याचे मत मुलींवर लादले असे सलमानने पारसला सुनावले. त्यानंतर फूटेजसाठी काहीजण काहीही करायला तयार आहेत असे बोलणाऱ्या माहिराचा देखील सलमानने क्लास घेतला. 

याच भागात सलमानने पॉवर विकेंडविषयी कार्यक्रमातील स्पर्धकांना सांगितले. टास्क जिंकल्यानंतर यातील एका स्पर्धकाला एक खास पॉवर मिळणार असल्याचे सांगण्यात आले. त्यासाठी खेळण्यात आलेल्या सुलतानी आखाडा या टास्कमध्ये माहिरा आणि शेफालीला एकमेकांसोबत आखाडण्यात उभे करण्यात आले. यातून विजेता सलमान खान निवडणार असे त्याने सांगितले. सलमान एलिमिनेशकडे वळत असतानाच सुनील ग्रोव्हर आणि हर्ष लिम्बाचिया यांनी कार्यक्रमात एंट्री घेत त्यांच्या नव्या बँडची सगळ्यांना ओळख करून दिली. त्यांच्या नवीन बँडचे नाव सनी लियोनी ऑक्रेस्टा असल्याचे त्यांनी सांगितले आणि त्यांच्या कॉमिक टायमिंगने सगळ्यांना खळखळून हसवले त्यानंतर गौरव दुबने एंट्री घेत स्वतःचे नाव माधुरी अशिक्षित सांगितले आणि दीदी तेरा देवर दिवाना या गाण्यावर डान्स करत सगळ्यांना हसवले. 

दलजीत कौर, रश्मी देसाई आणि शहनाज गिल या तिघांपैकी आता घरातून कोण बाहेर पडतंय ते आजच्या भागातच कळेल. 

Web Title: Bigg Boss 13 Weekend Ka vaar: Salman Khan begins countdown to finale, is joined by Bharat co-star Sunil Grover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.