ठळक मुद्देशहनाज टायगर श्रॉफला नव्हे तर त्याच्या फोटोला किस करताना दिसली. बिग बॉसच्या घरातील बाथरूममध्ये एका जाहिरातीत टायगरचा फोटो असून या फोटोला किस करताना शहनाजला सिद्धार्थ शुक्लाने पकडले आणि त्याने ओह माय गॉड अशी प्रतिक्रिया दिली आणि तो लगेचच तिथून निघून गेला. 

बिग बॉसच्या तेराव्या सीझनला सुरूवात होऊन काही दिवस उलटले आहेत आणि हा शो सातत्याने चर्चेत येत असते. या कार्यक्रमातील शहनाज गिल प्रेक्षकांना प्रचंड आवडत असून तिच्या अंदाची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. बिग बॉस 13 या कार्यक्रमात नुकतीच एक वेगळीच गोष्ट घडली असून याच गोष्टीची चर्चा सोशल मीडियावर रंगली असल्याचे दिसून येत आहे.

बिग बॉसची स्पर्धक शहनाज गिल चक्क बाथरूममध्ये टायगर श्रॉफला किस करताना दिसली. हे वाचून आता बिग बॉसच्या घरात टायगर श्रॉफ कुठून आला असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल ना... शहनाज टायगर श्रॉफला नव्हे तर त्याच्या फोटोला किस करताना दिसली. बिग बॉसच्या घरातील बाथरूममध्ये एका जाहिरातीत टायगरचा फोटो असून या फोटोला किस करताना शहनाजला सिद्धार्थ शुक्लाने पकडले आणि त्याने ओह माय गॉड अशी प्रतिक्रिया दिली आणि तो लगेचच तिथून निघून गेला. 

बिग बॉसमध्ये क्विन टास्क सुरू व्हायच्याआधी शहनाझ बोलताना दिसली की, मला इथल्या अनेक लोकांचा बदला घ्यायचा आहे. कधी कधी तर मला वाटते की मी आरसा फोडून द्यावा.... पण काय करू मला इथे टायगर श्रॉफ दिसत आहे. त्यामुळे मी हा तोडत नाहीये. कधीतरी मला त्याच्यासोबत रोमान्स करण्याची संधी मिळाली तर... असे म्हणतच ती टायगरच्या पोस्टरला किस करताना दिसत आहे आणि यावर सिद्धार्थ शुक्ला ओह माय गॉड म्हणत तिची टर उडवताना दिसत आहे. 

दरवर्षी ‘बिग बॉस’ हा शो नवा वाद ओढवून घेतो. या वादांमुळे अनेकदा   ‘बिग बॉस’च्या प्रसारणाची वेळ बदलावी लागली. यंदाचे ‘बिग बॉस’चे 13 वे सीझनही याला अपवाद नाही. ‘बिग बॉस 13’ सुरु होऊन उणेपुरे दोन आठवडे होत नाही तोच बोल्ड कंटेन्टमुळे हा शो बंद करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. इतकेच काय आता करणी सेनेनेही हा शो बंद करण्याची मागणी केली आहे. पद्मावत, मणिकर्णिका आणि आर्टिकल 15 या सिनेमानंतर ‘बिग बॉस 13’ हा रिअ‍ॅलिटी शो करणी सेनेच्या रडारवर आला आहे. या शोमधील कंटेन्ट प्रचंड बोल्ड असून हा शो भारतीय संस्कृतीची पायमल्ली करणारा असल्याचे करणी सेनेने म्हटले आहे.

Web Title: Bigg Boss 13 : Shahnaz Gill Lip Kiss Tiger Shroff's Poster In Bigg Boss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.