bigg boss 13 payal rohatgi called ameesha patel rashami desai and koena mitra jobless | Bigg Boss 13 :  ‘बिग बॉस’च्या या एक्स-कंटेस्टंटने अमीषा पटेलला म्हटले ‘जॉबलेस’ 
Bigg Boss 13 :  ‘बिग बॉस’च्या या एक्स-कंटेस्टंटने अमीषा पटेलला म्हटले ‘जॉबलेस’ 

ठळक मुद्देअभिनेत्री अमीषा पटेल ‘बिग बॉस’च्या घराची मालकीण बनली आहे. ती स्पर्धकांना वेगवेगळे टास्क देते.

बिग बॉस 13’ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये कधी काय होईल, याचा नेम नाही. एका क्षणाला बिग बॉसच्या घरातील स्पर्धक एकमेकांच्या गळ्यात गळे घालून हिंडतात. अन् दुस-याच क्षणाला एकमेकांसोबत भांडतात.  ‘बिग बॉस 13’चे चित्रही वेगळे नाही. सीझन सुरु होऊन काही दिवस होत नाही तोच स्पर्धक आपआपले रंग दाखवू लागले आहेत. घराबाहेरही शोची प्रचंड चर्चा होतेय. याचदरम्यान टीव्ही अभिनेत्री पायल रोहतगी हिने ‘बिग बॉस 13’च्या सदस्यांना लक्ष्य केले आहे.
पायलने एक ट्वीट केले. या ट्वीटटमध्ये तिने अमीषा पटेल, रश्मी देसाईकोएना मित्रा यांना जॉबलेस म्हणून हिणवले आहे. ‘अमीषा पटेल, रश्मी देसाई, कोएना मित्रा यांच्याकडे काम नाही. त्यामुळे पैसे कमवण्यासाठी ते बिग बॉसच्या घरात गेले. ही अशी मंडळी आहेत, ज्यांना केवळ लोकप्रियता हवी. लोकप्रियतेसाठी हे लोक फुकटातही काम करायला तयार होतील. मी हे लिहितेय कारण, मी स्वत: ‘बिग बॉस 2’मध्ये गेले होते, तेव्हा मी सुद्धा जॉबलेस होते,’ असे पायलने लिहिले आहे.
पायलच्या या ट्वीटनंतर लोक तिची खिल्ली उडवताना दिसत आहेत. ‘या लोकांप्रमाणे आता तू पुन्हा जॉबलेस झाली आहे. 12 वर्षांनंतरही तुला कुठले चांगले काम मिळू शकले नाही,’ असे एका युजरने लिहिले आहे.
अभिनेत्री अमीषा पटेल ‘बिग बॉस’च्या घराची मालकीण बनली आहे. ती स्पर्धकांना वेगवेगळे टास्क देते. तिने दिलेला पहिलाच टास्क वादग्रस्त ठरला होता. यावरून ती प्रचंड ट्रोल झाली होती.

Web Title: bigg boss 13 payal rohatgi called ameesha patel rashami desai and koena mitra jobless

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.