ठळक मुद्देकोएना बिग बॉसच्या घरात असताना बाथरूममध्ये जाण्यासाठी तिने दरवाजा उघडला असता आत सिद्धार्थ डे आंघोळ करत होता. तो दरवाज्याचे लॉक लावायला विसरला होता. कोएना किंचाळतच दरवाजाच्या बाहेर आली होती.

बिग बॉस या कार्यक्रमाच्या गेल्या आठवड्यात आपल्याला काही स्पर्धकांमध्ये मैत्री होताना पाहायला मिळाली तर काही स्पर्धक एकमेकांशी भांडत असताना दिसले. बिग बॉसच्या घरात आता नवीन नाती निर्माण होत असून प्रत्येक स्पर्धकांचे एकमेकांसोबतचे नाते क्षणाक्षणाला बदलत आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. गेल्या आठवड्यात कोएना मित्रा आणि दलजीत कौर यांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला. कोएना ही प्रेक्षकांची आवडती स्पर्धक होती. त्यामुळे ती घरातून बाहेर पडल्याचा सगळ्यांनाच धक्का बसला.

या आठवड्यात घराच्या बाहेर जाणाऱ्या कोएना मित्राला घरात असताना एका विचित्र गोष्टीचा सामना करावा लागला होता. या गोष्टीची चर्चा बिग बॉसच्या घरात तर झाली होती. पण त्याचसोबत या गोष्टीची सोशल मीडियावर देखील चांगलीच चर्चा रंगली असल्याचे पाहायला मिळाले. बिग बॉस हा कार्यक्रम प्रेक्षकांना कलर्स वाहिनीवर पाहायला मिळतो. पण त्याचसोबत या घरातील काही अनसीन गोष्टी प्रेक्षकांना वूट या ॲपवर पाहायला मिळतात. याच ॲपवर दाखवण्यात आलेल्या एका गोष्टीची गेल्या आठवड्यात चांगलीच चर्चा रंगली होती. या घरात असताना कोएना आणि सिद्धार्थ यांना उप्स मुमेंटचा सामना करावा लागला. कोएना बिग बॉसच्या घरात असताना बाथरूममध्ये जाण्यासाठी तिने दरवाजा उघडला असता आत सिद्धार्थ डे आंघोळ करत होता. तो दरवाज्याचे लॉक लावायला विसरला होता. कोएना किंचाळतच दरवाजाच्या बाहेर आली होती. पण त्याचवेळी तिथे पारस छाब्रा आणि माहिरा शर्मा उभे होते. हे सगळे पाहिल्यावर त्यांना देखील हसू आवरले नव्हते.

हा किस्सा पारसमुळे घरातील सगळ्याच मंडळींना कळला होता आणि ते देखील हे ऐकल्यावर खळखळून हसायले लागले होते. त्यांनी सगळ्यांनी सिद्धार्थची टर उडवण्याची एकही संधी सोडली नव्हती. सिद्धार्थला काय बोलायचे हेच सुचत नसल्याने तो सरळ रूममध्ये निघून गेला. एवढेच नव्हे तर तू ही गोष्ट कोणकोणाला सांगितली हे देखील त्याने कोएनाला विचारले होते. 


 


Web Title: Bigg Boss 13: Koena Mitra sees Siddhartha Dey in the bathroom
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.