छोट्या पडद्यावरील लोकप्रिय व वादग्रस्त रिएलिटी शो बिग बॉसच्या तेराव्या सीझनला सुरूवात झाली आहे. स्पर्धकांना घरात जाऊन अकरा दिवस झाले आहेत. आतापर्यंत त्यांच्यातील वादविवाद व मैत्री प्रेक्षकांना अनुभवायला मिळाली. घरातील स्पर्धक फिनाले पर्यंत टिकून राहण्यासाठी मनापासून टास्क खेळत आहेत. घरात हाय व्हॉल्टेज ड्रामा सुरू आहे.

देवोलिना घरातील पहिली क्वीन बनली आहे. यासोबत देवोलिनाचं नॉमिनेशनमधून सुरक्षित झाली आहे. आता बिग बॉसच्या घरात ती काहीच काम करणार आहे. इतकंच नाही तर तिला वेगळा बेड व वॉशरूमही वापरायला मिळणार आहे.


 बिग बॉसमध्ये या आठवड्यात पार पडलेल्या टास्कनंतर पारस छाब्रा घरातल्यांच्या निशाण्यावर आहे तर दुसरीकडे रश्मी देसाई व आरती सिंग यांच्यातील वाद आणखीन विकोपाला जात आहेत. आरती आणि रश्मी एकमेकांमधील मतभेद दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर आकांक्षा रश्मीला म्हणते की, पारसशिवाय माझ्या विरोधात तुला कोणी भडकवू शकत नाही.


आरती पारसला म्हणाली की, पारस तू या घरात अजिबात विश्वास ठेवण्याच्या लायकीचा नाही आहेस. त्यानंतर पारस व आरती एकमेकांशी भांडू लागतात. 
बिग बॉसने कंटेस्टंट्सला सांगितलं की मुलं नॉमिनेशनसाठी सुरक्षित नाही आहेत. मागील आठवड्यासारखं या आठवड्यातही मुली मुलांना ब्लॅक रिंग देणार. आतापर्यंत ज्या मुलाकडे जास्त ब्लॅक रिंग असेल तो पुढील आठवड्यात बेघर होण्यासाठी नॉमिनेट होणार.


आरती व शहनाज यांच्यासोबत जास्त मुलींनी पारसला ब्लॅक रिंग देतात. तर दुसरीकडे रश्मी आरतीला म्हणाली की, तिच्यावर विश्वास ठेवायला घाबरत आहे. त्यानंतर रश्मी रडू लागली.


तर दुसरीकडे शहनाज गिल व पारस छाब्रा यांच्यात दुरावा निर्माण होत आहे. यादरम्यान पारसला घेऊन माहिरा व शहनाज यांच्यात खूप भांडणं होत आहेत.

या आठवड्यात कोयना मित्रा, शहनाज गिल, रश्मी देसाई व दलजीत कौर बिग बॉसच्या घरातून बेघर होण्यासाठी नॉमिनेट झाले आहेत.


Web Title: Bigg Boss 13 Day 11: Paras at House Target, heated arguments and a Report card rating !
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.