Bigg Boss 13 : Breaking News! माहिरा शर्माला निर्माते दाखवणार बाहेरचा रस्ता?, वाचा यामागचं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2020 12:29 PM2020-02-04T12:29:19+5:302020-02-04T12:33:52+5:30

Bigg Boss 13 : माहिरा शर्मा लवकरच घरातून बेघर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Bigg Boss 13: Breaking News! Mahira Sharma to be eliminated in midweek eviction | Bigg Boss 13 : Breaking News! माहिरा शर्माला निर्माते दाखवणार बाहेरचा रस्ता?, वाचा यामागचं कारण

Bigg Boss 13 : Breaking News! माहिरा शर्माला निर्माते दाखवणार बाहेरचा रस्ता?, वाचा यामागचं कारण

googlenewsNext

बिग बॉसचा तेरावा सीझन अंतिम टप्प्यात पोहचला आहे. या सीझनमधील माहिरा शर्मापारस छाब्रा यांनी लोकांची टीम बनवून हा खेळ पुढे नेत आहेत. हे दोघे एकमेकांसोबत वेळ व्यतित करण्यात इतके मग्न आहेत की त्यांना बाकी कोणत्याच गोष्टींचा फरक पडत नाही. त्यामुळे विकेंड के वॉरमध्ये माहिरा शर्माला घरातल्यांनी पारस छाब्राचा गुलाम सांगितले होते. आता लवकरच बिग बॉसचा फिनाले पार पडणार आहे. त्यात आता असं वाटतंय की माहिरा व पारस एकत्र फिनाले पाहणार नाहीत. कारण माहिरा शर्मा लवकरच घरातून बेघर होणार आहे.


बॉलिवूड लाइफच्या रिपोर्टनुसार, बिग बॉसच्या घरात मीड वीक इविक्शन होणार आहे. या काळात माहिरा शर्माला गेममधून बाहेरचा रस्ता दाखवला जाणार आहे. 


माहिरा बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यामुळे बिग बॉसचे चाहते खूप खूश आहे. लोकांचं म्हणणं आहे की माहिरा शर्माला सुरूवातीपासूनच शोमधून बाहेर काढायला हवं होतं. ही गोष्ट वेगळी आहे की असं काहीच झालं नाही. माहिरा व पारस यांनी एक टीम बनवून गेम खेळत राहिले.


माहिरा शर्मा घरातून बाहेर काढल्यानंतर पारस छाब्रा घरात एकटाच पडणार आहे. आतापर्यंत पारसा कोणाचीही गरज पडली नाही.

मात्र माहिरा घरातून बाहेर पडल्यानंतर खूप काही बदलले पहायला मिळणार आहे. 

Web Title: Bigg Boss 13: Breaking News! Mahira Sharma to be eliminated in midweek eviction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.