Bigg Boss 13: Bigg Boss 13 Siddharth Shukla to be servant of Rashmi Desai actress refuses | Bigg Boss 13 : घरात एक्स बॉयफ्रेंड बनला नोकर, शिक्षेमुळे नात्यात येणार का आणखी दुरावा ?
Bigg Boss 13 : घरात एक्स बॉयफ्रेंड बनला नोकर, शिक्षेमुळे नात्यात येणार का आणखी दुरावा ?

बिग बॉसच्या तेराव्या सीझनमध्ये सिद्धार्थ शुक्ला व रश्मी देसाई यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून वादविवाद पहायला मिळत आहेत. ते दोघे एकमेकांनी कमी बोलत आहेत. जास्त तर ते एकमेकांशी भांडताना पहायला मिळत आहेत. रविवारी विकेंड वॉर एपिसोडमध्ये एक टास्क झाला. त्यात रश्मी व सिद्धार्थ यांच्यामध्ये पॉवर कार्डला घेऊन कांटे की टक्कर पहायला मिळाली.


या टास्कमध्ये सिद्धार्थ व रश्मी दोघांना घरातल्यांच्या समान पाठिंबा मिळाल्याचं पहायला मिळालं. त्यानंतर सलमान खानने क्वीन देवोलीना भट्टाचार्जीला दोघांपैकी एकाची निवड करायला सांगितली. देवोलीनाने तिची मैत्रीण रश्मी देसाईची निवड केली. त्यामुळे रश्मी देसाई पॉवर कार्ड जिंकली. टास्क संपल्यावर सलमान खानने घोषणा केली की सिद्धार्थ शुक्ला बिग बॉस आदेश देईपर्यंत रश्मीचा नोकर बनून राहणार आहे.


ही गोष्ट समजल्यावर रश्मीने या गोष्टीसाठी नकार दिला. त्यावर सलमानने तिला बिग बॉसचा आदेश मानावाच लागेल असं सांगितलं. आता आगामी काळात रश्मी व सिद्धार्थ यांच्यामध्ये कशाप्रकारे ट्युनिंग पहायला मिळेल, हे आगामी भागात पहावे लागेल.


बिग बॉसच्या तेराव्या सीझनच्या दुसऱ्या आठवड्यात कोयना मित्रा व दलजीत कौर घराच्या बाहेर पडले आहेत. या दोघींसोबत नॉमिनेशनमध्ये रश्मी देसाई व शहनाज गिलदेखील होते. मात्र त्यांना चाहत्यांनी भरपूर मत दिले. या आठवड्यात सिद्धार्थ शुक्ला नॉमिनेशनपासून सुरक्षित आहे.

तिसऱ्या आठवड्यात कोणता स्पर्धक बाहेर पडेल, हे पाहणे कमालीचे ठरेल. 

Web Title: Bigg Boss 13: Bigg Boss 13 Siddharth Shukla to be servant of Rashmi Desai actress refuses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.