मराठी बिग बॉस सीझनचा विजेता घोषित झाल्यानंतर आता सगळ्यांचं लक्ष लागलंय ते सलमान खानच्या हिंदी बिग बॉसकडे. बिग बॉस हिंदीला घेऊन रोज एक नवा खुलासा समोर येतोय. 'विदाई' फेम अंगद हसीजाने बिग बॉस संदर्भात एक नवा खुलासा केला आहे.

इंडिया टिव्हीच्या रिपोर्टनुासर अंगद हसीजाने त्याला बिग बॉस 13 साठी अप्रोच करण्यात आल्याचे समजतेय. मात्र अंगदने यासाठी नकार दिल्याचे समजतेय. अंगदचं म्हणणे आहे हा शो त्याच्यासाठी नाही आहे. अंगदचं म्हणणे आहे तो या घरात राहू शकत नाही. कारण या घरात राहणार व्यक्ती सहनशील हवा जी सहनशीलता त्याच्यात नाही. 


रिपोर्टनुसार या आधी ही अंगदला बिग बॉसची ऑफर मिळाली होती. मात्र त्याने नकार दिला. वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर अंगदला बिदाई मालिकेतून प्रसिद्ध मिळाली. . अंगद हसिजाने सपना बाबुल का... बिदाई या मालिकेपासून त्याच्या करियरला सुरुवात केली. या मालिकेत त्याने एका गतीमंद मुलाची भूमिका साकारली होती. त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते.

त्यानंतर तो राम मिलाये जोडी, सावित्री यांसासारख्या मालिकांमध्ये काम केले होते. सध्या तो वारिस या मालिकेत झळकला होता.  या मालिकेतील त्याच्या भूमिकेलादेखील प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. याशिवाय फुलवा, राम मिलाई जोडी, अमृत मंथनमध्येही तो  दिसला होता. सध्या तो इश्क आजकल मालिकेत झळकतोय. 

Web Title: Bidaai fame angad hasija rejected the bigg boss 13 offer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.