बाबो..! अण्णा आणि शेवंताचा खुल्लमखुल्ला रोमान्स तोही गोव्याच्या किनाऱ्यावर,पहा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2019 11:51 AM2019-12-30T11:51:04+5:302019-12-30T11:51:59+5:30

'रात्रीस खेळ चाले 2'मध्ये येणार रंजक वळण, गोव्याच्या किनाऱ्यावर रंगला अण्णा आणि शेवंताचा रोमान्स

Anna and Shevanta openly romance on the shores of Goa in Ratris Khel Chale 2 , watch video | बाबो..! अण्णा आणि शेवंताचा खुल्लमखुल्ला रोमान्स तोही गोव्याच्या किनाऱ्यावर,पहा व्हिडिओ

बाबो..! अण्णा आणि शेवंताचा खुल्लमखुल्ला रोमान्स तोही गोव्याच्या किनाऱ्यावर,पहा व्हिडिओ

googlenewsNext


झी मराठी वरील 'रात्रीस खेळ चाले २' ही मालिका सध्या एका अतिशय रंगतदार वळणावर आली आहे. मालिकेच्या पहिल्या पर्वाला प्रेक्षकांनी जसा भरभरून प्रतिसाद दिला तसेच या २ भागावर देखील प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करत आहेत. या मालिकेतील बऱ्याच व्यक्तिरेखा घराघरांत लोकप्रिय ठरल्या आहेत.

'रात्रीस खेळ चाले २' मालिकेत जेव्हापासून शेवंताची एंट्री झाली आहे तेव्हापासून मालिकेची लोकप्रियता आणखीच वाढली आहे. अपूर्वा नेमळेकर या मालिकेत शेवंताची व्यक्तिरेखा साकारत आहे आणि या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं आहे. तर अण्णा नाईकांची व्यक्तीरेखा अभिनेते माधव अभ्यंकर साकारत आहेत. दरम्यान, अवघे दोन दिवस नवीन वर्षाला राहिले असून २०२० या नवीन वर्षाची सुरुवात अण्णा आणि शेवंता गोव्याच्या किनाऱ्यापासून करणार आहेत.

शेवंताला ज्यावेळी अण्णा तुला कुठे जायचे?, असे विचारतात. त्यावर शेवंता गोव्याला जाऊया, असे सांगते. त्यानंतर अण्णा आणि शेवंता गोव्याला दाखल होतात. गोव्यात धमाल मस्ती करताना हे दोघे दिसत आहेत. 


झी वाहिनीने सोशल मीडियावर 'रात्रीस खेळ चाले २'चा नवा प्रोमो शेअर केला आहे. या व्हिडिओत अण्णा आणि शेवंता रोमान्स करताना दिसत आहेत.

या व्हिडिओला प्रेक्षकांचा खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे. तसेच येत्या ३१ डिसेंबरला अण्णा व शेवंताचा गोव्याच्या किनाऱ्यावरील रोमान्स प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.

Web Title: Anna and Shevanta openly romance on the shores of Goa in Ratris Khel Chale 2 , watch video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.