ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल इंडियाच्या रिपोर्टनुसार, येत्या आठवड्यात 'अग्गंबाई सासूबाई' मालिका पहिल्या क्रमांकावर आहे. सध्या या मालिकेत नवा ट्विस्ट पहायला मिळतो आहे. अभिजीत राजे सोहमला सुधरवण्यासाठी कुलकर्णींच्या घरात काही दिवसांसाठी राहण्यासाठी आले आहेत. त्यामुळे घरामध्ये घडणाऱ्या गोष्टी पाहणे रंजक ठरते आहे. या मालिकेनं सुरूवातीपासून रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केले आहे. गेल्या आठवड्यात ही मालिका तिसऱ्या क्रमांकावर होती. अभिजीत राजे सोहम व शुभ्राच्या घरी रहायला आल्यापासून प्रेक्षक या मालिकेकडे वळले आहेत. 


या आठवड्याचं टीआरपी रेटिंग समोर आलं असून यामध्ये टॉप 5 या झी मराठीच्याच मालिका आहेत. मात्र या आठवड्यात एका नव्या मालिकेची टॉप 5 मध्ये एंट्री झाली आहे. पण या आठवड्यात ‘अग्गंबाई सासूबाई’ ही मालिका या आठवड्याच्या टीआरपी रेटिंगमध्ये बाजी मारली आहे. तर माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेच्या लोकप्रियतेत काहीशी घसरण झालेली पाहायला मिळाली.


माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका या आठवड्याच्या टीआरपी मालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. पण मागच्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात या मालिकेला चांगला टीआरपी मिळाला आहे. मागच्या आठवड्यात ही मालिका चौथ्या स्थानावर होती.

मागच्या काही आठवड्यांपासून दुसऱ्या स्थानावर असलेला ‘चला हवा येऊ द्या’ हा शो मात्र तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. मागच्या आठवड्यात या शोबद्दल बराच वाद झाला. ऐतिहासिक महापुरुषांचे फोटो मॉर्फ केल्यामुळे या शोला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. त्यामुळेच या शोच्या टीआरपीवर परिणाम झाला आहे. मिसेस मुख्यमंत्री ही मालिका चौथ्या स्थानावर आहे.

रात्रीस खेळ चाले मालिका गेल्या अनेक दिवसांपासून टॉप 5च्या रेसमधून बाहेर पडली होती. मात्र या आठवड्यात टॉप 5 मध्ये स्थान मिळवलं आहे.

सध्या या मालिकेत बऱ्याच वेगवेगळ्या घटना घडत असल्यानं प्रेक्षका पुन्हा या मालिकेकडे वळताना दिसत आहे. ही मालिका या आठवड्यात पाचव्या स्थानावर आहे.

Web Title: Aggabai Sasubai series becomes the top of TRP's race, know about serial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.