Actress kishwer merchantt and suyash rai are soon to become parents | गुडन्यूज ! टीव्हीवरील हे प्रसिद्ध कपल लवकरच होणार आई-बाबा, बेबी बॅम्प फ्लॉन्ट करत दिली गोड बातमी

गुडन्यूज ! टीव्हीवरील हे प्रसिद्ध कपल लवकरच होणार आई-बाबा, बेबी बॅम्प फ्लॉन्ट करत दिली गोड बातमी

बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीमध्ये अभिनेत्रींची प्रेग्नन्सी अनाऊंसमेंट आणि डिलिव्हरीचा काळ सुरू आहे. काही दिवसांपूर्वी टीव्ही अभिनेत्री अनिता हंसंदानीने बेबी बॉयला जन्म दिला, नुकतीच अभिनेत्री करीना कपूरनेही तिच्या दुसर्‍या मुलाला जन्म दिला आहे. आता 'बिग बॉस 9'मधील कपल किश्वर मर्चंट आणि सुयश राय हे लवकरच आई-बाबा होणार आहेत. या कपलने एक क्युट पोस्ट करत ही गोड बातमी शेअर केली. 

कहां हम कहां तुम अभिनेत्री किश्वर मर्चंट आणि सुयश राय यांचे 2016 मध्ये लग्न झाले. अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर एका गोंडस पोस्टसह तो बाबा होणार असल्याचे सांगितले. किश्वर या फोटोत सुयशसोबत बेबी बॅम्प फ्लॉन्ट करताना फोटो शेअर केला आहे. या फोटोत किश्वर  आणि सुयश समुद्राच्या किनारी उभे आहेत. सुयशने फोटो शेअर करत लिहिले, मी तुझ्या बाळाचा बाप होणार आहे किश्वर, या ऑगस्टमध्ये. 

सुयश आणि किश्वर 2016 मध्ये लग्न बंधनात अडकले.  २०११ मध्ये 'प्यार की ये एक कहानी' शोच्या सेटवर दोघांची पहिली भेट झाली. यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली.  हळूहळू  मैत्रिचे रुपांतर प्रेमात झाले. सहा वर्षांच्या डेटिंगनंतर दोघांनी लग्न केलं. 
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Actress kishwer merchantt and suyash rai are soon to become parents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.