छोट्या पडद्यावरील अभिनेत्री काम्या पंजाबी बॉयफ्रेंड शलभ डांगसोबतच्या रिलेशनशीपमुळे चर्चेत असते. काम्या बॉयफ्रेंडसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. आता तिने शलभसोबत लग्न करण्याबद्दल सांगितलं आहे. 

हिंदुस्तान टाईम्ससोबत बोलताना काम्याने सांगितली की, जेव्हा लोक मला विचारतात की शलभने तुला व तुझ्या मुलींना स्वीकारण्यासाठी तयार आहे. हे खूप चांगलं आहे. त्यावेळी मला वाटतं की, 'Excuse me, स्वीकारण्यासाठी तयार आहे, याच्याशी तुम्हाला काय करायचंय?'


ती पुढे म्हणाली, 'मी घटस्फोटीत असून सिंगल मदर आहे. याचा अर्थ असा होतो का की माझ्यात काही कमतरता आहे किंवा मी चांगली नाही?'


 जेव्हा काम्याला लग्नाच्या प्लानिंगबद्दल विचारलं तेव्हा तिने वेडिंग डेट व लग्नाबद्दल सांगितलं नाही. पण ती म्हणाली की, लग्नाचं प्लानिंग सुरू आहे.
शलभसोबतच्या रिलेशनशीपबद्दल काम्याने सांगितलं की, मी त्याच्यासोबत खूश आहे. त्याच्यासोबतचे जीवन खूप वेगळं आहे.

काही दिवसांपूर्वी काम्याने बॉयफ्रेंड शलभ डांगसोबत दुबईत व्हॅकेशन एन्जॉय करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोंमध्ये बिकनीतील फोटोचाही समावेश आहे. या बिकनीतील एका फोटोनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. काम्याने शेअर केलेल्या फोटोतील बिकनीमधील फोटोत तिच्या शरीरावरील व्रण दिसत आहेत.


हा फोटो शेअर करून तिने म्हटलं की, तिच्या शरीरावर दिसणारा प्रत्येक व्रण एक कहाणी सांगतो. काम्यानं तिच्या पोस्टमध्ये म्हटलं की, माझं शरीर एक कॅनव्हास प्रमाणे आहे. ज्यावरील प्रत्येक व्रण मी किती धाडसी आहे आणि यासाठी मला काय किंमत चुकवावी लागली याची मला आठवण करुन देतो. मी ती प्रत्येक गोष्ट वेड्यासारखी लपवण्याचा प्रयत्न केला आणि प्रत्येकवेळी बदलणारं वजन जे कधी माझ्या मुलांमुळे तर कधी खाण्यामुळे वाढत होतं. पण आता मला माझ्या या कॅनव्हासवर अभिमान आहे आणि भविष्यात त्यावर तयार होणाऱ्या नव्या चित्राची प्रतीक्षा आहे.

Web Title: Actress Kamya Panjabi on marrying boyfriend shalabh dang

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.