Actress Ishita Ganguly shared the special video with the film star Govinda-SRJ | अभिनेत्री इशिता गांगुलीने फिल्म स्टार गोविंदाबरोबरच्या जुन्या आठवणींना दिला ऊजाळा, शेअर केला हा खास व्हिडीओ

अभिनेत्री इशिता गांगुलीने फिल्म स्टार गोविंदाबरोबरच्या जुन्या आठवणींना दिला ऊजाळा, शेअर केला हा खास व्हिडीओ

कोविड १9  चा संसर्ग टाळण्यासाठी सरकारने सर्व देशवासीयांना २१ दिवसांच्या लॉकडाऊनचे अनुसरण करण्याचे निर्देश दिले आहेत. या भागाचे अनुसरण करून, आजचे सर्व टीव्ही कलाकार आपापल्या घरांमध्ये  वेळ घालवत आहेत. दुसरीकडे 'जग जाननी माँ वैष्णो देवी - कहानी माता रानी की' अभिनेत्री इशिता गांगुलीसुद्धा तिच्या चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर काहीतरी नवीन पोस्ट करत असते.

नुकतीच अभिनेत्री इशिता गांगुलीने तिच्या चाहत्यांसाठी 2012 च्या आठवणी तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केल्या आहेत, तिथे तिने बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता गोविंदासोबत स्टेज शेअर केला. या दोघांनी बंगाली गाण्यावर एकत्र परफॉर्मन्स दिले. हे पोस्ट टाकत इशिताने लिहिले की, मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की मला २०१२ साली गोविंदासह स्टेजनर परफॉर्म  करण्याची संधी मिळाली. त्या अभिनयासाठी आम्ही दोघांनी अजिबात सराव केलेला नव्हता.

स्टेजवर जाण्यापूर्वी अर्धा तास आधी आम्ही दोघे एकमेकांना भेटलो आणि त्याने मला सांगितले की आपण ज्या स्टेप्स लक्षात ठेवू त्याच आपण करत राहू. इशिता गांगुली म्हणाली की अशा आठवणी तुमच्यात एक नवी उर्जा भरतात जी तुम्हाला प्रत्येक काम करण्यास सदैव प्रेरित  करते. अशा परिस्थितीत इशिताचे चाहते तिला गोविंदासोबत पाहूनच रिफ्रेश होतील आणि काही क्षण मानसिक ताण देखील विसरतील.

 

Web Title: Actress Ishita Ganguly shared the special video with the film star Govinda-SRJ

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.