माढ्यातून सेनापतींबरोबरच सरदारही पळू लागले : आनंदराज आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 10:32 AM2019-04-08T10:32:56+5:302019-04-08T10:37:55+5:30

स्वत:ला देव म्हणवून घेणाºया महाराजांनी मंदिरात प्रवचन करावे, पार्लमेंट हे महाराजांचे ठिकाण नाही, असाही सल्ला सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार जयसिध्देश्वर महास्वामी आनंदराज आंबेडकरांनी यांना दिला.

The Sardar also ran from the Himalayas with Sardar: Anandraj Ambedkar | माढ्यातून सेनापतींबरोबरच सरदारही पळू लागले : आनंदराज आंबेडकर

माढ्यातून सेनापतींबरोबरच सरदारही पळू लागले : आनंदराज आंबेडकर

googlenewsNext
ठळक मुद्देमोहोळ येथे बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रचारादरम्यान कॉर्नर सभा देशाचे चौकीदार म्हणवून घेणाºया चौकीदाराच्याच काळात देशातून निरव मोदी, विजय मल्ल्या यांच्यासह अनेकांनी करोडो रुपयांचा चुना लावला - आनंदराज आंबेडकरस्वत:ला देव म्हणवून घेणाºया महाराजांनी मंदिरात प्रवचन करावे, पार्लमेंट हे महाराजांचे ठिकाण नाही - आनंदराज आंबेडकर

मोहोळ : महाराष्ट्रात बहुजन वंचित आघाडीमुळे माढ्यातून राष्ट्रवादीचा सेनापतीच पळून गेला आहे.  त्यामुळे आता सरदारही पळू लागले आहेत. आता लढाई भाजप व आपल्यातच असल्याचे मत आनंदराज आंबेडकर यांनी व्यक्त केले.

मोहोळ येथे बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रचारादरम्यान कॉर्नर सभेत ते बोलत होते.  प्रारंभी शहरांमधून रॅली काढण्यात आली. यावेळी समीउल्ला शेख, अ‍ॅड. विनोद कांबळे, बिलाल शेख, युवराज पवार, पार्थ पोळखे उपस्थित होते .

आनंदराज पुढे म्हणाले, देशाचे चौकीदार म्हणवून घेणाºया चौकीदाराच्याच काळात देशातून निरव मोदी, विजय मल्ल्या यांच्यासह अनेकांनी करोडो रुपयांचा चुना लावला आहे. तेव्हा हा चौकीदार कुठे गेला होता, असा सवाल करीत आता या चौकीदाराची चौकशी करण्याची वेळ आली असल्याचे सांगत महाराष्ट्राचे खरे सत्ताधारी तुम्ही आहात, महाराष्ट्रात मंडल आयोगाच्या अंमलबजावणीनंतर बहुजन समाजामध्ये जागृती व्हायला पाहिजे होती, ती जागृती झाली नाही. त्यामुळे बहुजनांच्या हाती सत्ता आली नाही, अशी खंत व्यक्त केली. स्वत:ला देव म्हणवून घेणाºया महाराजांनी मंदिरात प्रवचन करावे, पार्लमेंट हे महाराजांचे ठिकाण नाही, असाही सल्ला आंबेडकरांनी दिला.

Web Title: The Sardar also ran from the Himalayas with Sardar: Anandraj Ambedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.