नरेंद्र मोदींनी मागासवर्गीय असलेलं प्रमाणपत्र दाखवावं : प्रकाश आंबेडकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 14:55 IST2019-04-19T14:53:10+5:302019-04-19T14:55:00+5:30
माढा लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीची प्रचार सभा

नरेंद्र मोदींनी मागासवर्गीय असलेलं प्रमाणपत्र दाखवावं : प्रकाश आंबेडकर
माळशिरस : आपली सत्ता गळाला लागली की मागासवर्गीय आहे म्हणून सांगायचं.. मोदीजी तुम्ही स्वत:ला मागासवर्गीय म्हणता, मग त्यांच्यासाठी काय केलं ते सांगा शिवाय स्वत:चे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट काढून जाहीर करावे, म्हणजे सर्वांना कळेल की तुम्ही मागासवर्गीय आहात की नाहीत, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली.
माढा व बारामती मतदारसंघाचा प्रचार करताना अकलूज येथे आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी शंकर लिंगे, लक्ष्मण माने, अण्णाराव पवार, अॅड़ विजयराव मोरे, राजकुमार, नवनाथ पडळकर आदी उपस्थित होते.
अकलूज येथे मोदी यांनी केलेल्या भाषणाचा आधार घेत प्रकाश आंबेडकर यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली, ते म्हणाले, आता गावचे सरपंचसुद्धा चांगले बोलू लागले आहेत, मात्र तुम्ही देशाचे पंतप्रधान असताना गावच्या सरपंचासारखे वागायला लागलात. यापूर्वी पंतप्रधानाच्या खुर्चीमध्ये चोर कधी बसला नव्हता. देशाला पंतप्रधान व भाजपचे अध्यक्ष या दोन माणसांपासून वाचवायला पाहिजे, असे त्यांनी सांगितले. यावेळी लक्ष्मण माने, अण्णाराव पाटील, उमेदवार अॅड. विजय मोरे यांनीही भाजपच्या धोरणावर टीका केली.