अपघाताने मोदींना सत्ता मिळाली; देश कुठं नेऊन ठेवलाय पहा : शरद पवार यांची टिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 11:30 IST2019-04-03T11:29:21+5:302019-04-03T11:30:56+5:30
शरद पवार यांनी भाजप सरकारवर जोरदार टिका केली.

अपघाताने मोदींना सत्ता मिळाली; देश कुठं नेऊन ठेवलाय पहा : शरद पवार यांची टिका
सोलापूर : गेल्या लोकसभा निवडणुकीत अपघाताने नरेंद्र मोदी यांना सत्ता मिळाली़ साडेचार वर्षात त्यांनी देश कुठं नेऊन ठेवलाय पहा, अशी टिका माजी केंद्रीय कृषीमंत्री तथा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सोलापुरात बोलताना केली.
सोलापुरात आयोजित करण्यात आलेल्या काँग्रेस राष्ट्रवादी - कॉग्रेस व मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते़ पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, गेल्या वेळेस सोलापुरातील जनतेनी चूक केली. मी लोकसभेत सोलापुरातून कोण आले हे उत्सुकतेने पाहत होतो़ यावेळेस त्या उमेदवाराला बदलण्यात आले़ त्याचे कारण मला माहित नाही़ आता जो उमेदवार आहे त्याला प्रशासकीय कामाची कोणतीच माहिती नाही, त्यामुळे सोलापुरातील जनतेने यावेळेस विचारपूर्वक निर्णय घ्यावा, असेही त्यांनी सांगितले़ यावेळी शरद पवार यांनी भाजप सरकारवर जोरदार टिका केली.