करमाळ्याच्या नरभक्षक बिबट्याला अकलूजच्या मोहिते-पाटलांनीच गोळ्या घातल्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2020 07:34 PM2020-12-18T19:34:27+5:302020-12-18T21:56:55+5:30

साेलापूर लाेकमत ब्रेकींग

The cannibalistic leopard of Karmalya was shot by Mohite-Patal of Akluj! | करमाळ्याच्या नरभक्षक बिबट्याला अकलूजच्या मोहिते-पाटलांनीच गोळ्या घातल्या !

करमाळ्याच्या नरभक्षक बिबट्याला अकलूजच्या मोहिते-पाटलांनीच गोळ्या घातल्या !

googlenewsNext

करमाळा : गेल्या महिनाभरापासून सोलापूर जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक बिबट्याला ठार मारण्यात अखेर यश मिळाले आहे. शुक्रवारी सायंकाळी धवलसिंह मोहिते-पाटील यांनी बारा बोअरच्या रायफलमधून तीन गोळ्या झाडून बिबट्याला जागीच खलास केले.

यानंतर हे वृत्त कळताच दहशतीखाली वावरणाऱ्या नागरिकांंनी नि:श्वास सोडला.या बिबट्याने सोलापूर जिल्ह्यात तीन नरबळी घेतले होते. करमाळा तालुक्यातील वांगी नं. ४ राखुंडे वस्तीवर पांडुरंग राखुंडे यांच्या केळीच्या बागेत बिबट्या आला होता. अकलूज येथील डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील हे बारामतीचे तावरे यांच्यासमवेत या ऑपरेशनमध्ये सहभागी होते.

वांगी येथे बिबट्याला केळीच्या बागेत वेढल्यावर या बिबट्याने धवलसिंह यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र मोहिते-पाटील यांनी १५ फुटावरून नरभक्षक बिबट्यावर बारा बोअरच्या रायफलमधून तीन गोळ्या झाडल्या आणि बिबट्याला ठार केले.

Web Title: The cannibalistic leopard of Karmalya was shot by Mohite-Patal of Akluj!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.