सखी: फक्त १० मिनिटांत घरच्या घरी काजूकतली
घरच्या घरी १० मिनिटांत काजू कतली बनवा, गॅस न वापरता! काजू, साखर, मिल्क पावडर आणि तूप वापरून ही सोपी रेसिपी आहे. दिवाळीसाठी झटपट, सोपा आणि स्वादिष्ट पदार्थ.
आंतरराष्ट्रीय: ऑपरेशन सिंदूरमध्ये मदत; इस्लामाबादचे पोलीस SP भारताचे गुप्तहेर?
इस्लामाबादचे पोलीस अधीक्षक आदिल अकबर यांच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ उडाली आहे. प्राथमिक चौकशीत त्यांच्या आत्महत्येचा संशय पण चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली आहे. त्यातच सोशल मीडियावर ते भारतीय गुप्तहेर असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे, परंतु पाक अधिकाऱ्यांनी याची पुष्टी केलेली नाही. ऑपरेशन सिंदूर वेळी त्यांनी भारताला मदत केली होती असंही बोलले जात आहे.
आंतरराष्ट्रीय: २००२ मध्ये भारत-पाक युद्ध? मुशर्रफबद्दल माजी CIA एजंटचा गौप्यस्फोट
मुशर्रफ यांनी अमेरिकेला दाखवण्यासाठी दहशतवादविरोधात काम करत असल्याचे नाटक केले, पण ते भारताच्या विरोधात दहशतवादाला प्रोत्साहन देत होते असा दावा माजी CIA एजंटने केला आहे. २००२ मध्ये भारत-पाक युद्ध होणार होते. अमेरिकेने पाकिस्तानच्या अणुबॉम्बचे जनक अब्दुल कादीर खान यांना मारण्याचा प्रयत्न केला नाही. हे सौदी सरकारच्या थेट हस्तक्षेपामुळे घडले असंही एजेंटने म्हटलं आहे.
राष्ट्रीय: क्रॉस व्होटिंगने निकाल बदलला; कमी आमदार असतानाही भाजप विजयी
जम्मू-काश्मीर राज्यसभा निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सने तीन जागा जिंकल्या. भाजपाने क्रॉस व्होटिंगमुळे अनपेक्षितपणे एक जागा मिळवली, कमी आमदार असूनही ३२ मते मिळवली. कलम ३७० रद्द केल्यानंतरची ही निवडणूक आगामी राजकीय बदलांचे संकेत आहे. चौथ्या जागेवर भाजपाचे नेते सत शर्मा यांनी नॅशनल कॉन्फरन्सच्या इमरान डार यांचा पराभव करून विजय मिळवला. सत शर्मा यांच्या विजयानंतर केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी त्यांचे अभिनंदन केले.
महाराष्ट्र: 'मोदीज मिशन' पुस्तकाचा काही भाग शालेय अभ्यासक्रमात घ्यावा"
‘मोदीज मिशन’मधील भाग शालेय पुस्तकात समाविष्ट करा, अशी मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली. मोदींच्या कार्याचा आलेख, दृष्टिकोन प्रेरणादायी आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली भारताची आर्थिक प्रगती झाली. त्यांनी गरिबांना मदत केली, असा विश्वास शिंदेंनी व्यक्त केला. मोदींची अकरा वर्षांची कारकीर्द हा फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है. लोकांच्या हृदयावर राज्य करणारा नेता फक्त एकच नरेंद्र मोदी असं असल्याचं शिंदे यांनी म्हटलं.
राष्ट्रीय: जम्मू-काश्मीर राज्यसभा निवडणुकीचे निकाल जाहीर
जम्मू-काश्मीरमधील राज्यसभा निवडणुकीचे निकाल आज (२४ ऑक्टोबर) जाहीर झाले. राज्यातील सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्स (NC) नं 4 पैकी 3 जागा जिंकल्या, तर भारतीय जनता पक्षानं एका जागेवर विजय मिळवला. नॅशनल कॉन्फरन्सचे उमेदवार चौधरी मोहम्मद रमजान, सज्जाद किचलू आणि शमी ओबेरॉय यांनी निवडणुकीत विजय मिळवला, तर भाजपचे सत शर्मा यांनी जिंकले.
क्रिकेट: IND vs AUS: कोहलीला फॉर्मसाठी कैफचा मोलाचा सल्ला
कोहलीच्या खराब फॉर्मनंतर, कैफने अय्यरप्रमाणे स्थानिक क्रिकेट खेळून लय मिळवण्याचा सल्ला दिला. सामन्यांचा सराव महत्त्वाचा असल्याचे कैफने सांगितले.
व्यापार: सोन्या-चांदीचे दर कोसळले! सोनं 2,000, तर चांदी 4,000 रुपये स्वस्त; कारण काय..?
शुक्रवारी सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण नोंदवली गेली आहे. सोनं सुमारे ₹2,000 प्रति 10 ग्रॅमने, तर चांदी ₹4,000 प्रति किलोनं स्वस्त झाली आहे. इंडियन बुलियन अँड ज्वेलरी असोसिएशन (IBJA) च्या आकडेवारीनुसार, 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,21,518 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला आहे, जो कालच्या तुलनेत सुमारे ₹2,000 ने कमी आहे.
राष्ट्रीय: "कोणत्याही देशाच्या दबावाखाली व्यापार करार करणार नाही"- पीयूष गोयल
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प भारतावर सतत व्यापार करारासाठी दबाव टाकत आहेत. याच पार्श्वभूमीवर भारताचे वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. “भारत कधीही कोणत्याही देशाच्या दबावाखाली व्यापार करार करत नाही,” अशी स्पष्टोक्ती पीयूष गोयल यांनी दिली.
राष्ट्रीय: 'All is not well with the UN', संयुक्त राष्ट्र संघाबाबत जयशंकर यांचे मोठे वक्तव्य...
संयुक्त राष्ट्र संघाच्या स्थापनेच्या 80व्या वर्धापनदिनानिमित्त राजधानी दिल्लीमध्ये विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमातून परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (UNSC) व तिच्या सदस्य देशांवर थेट टीका केली. जयशंकर यांनी आरोप केला की, काही सदस्य देश दहशतवादी संघटनांना संरक्षण देतात, ज्यामुळे या आंतरराष्ट्रीय संस्थेची विश्वसनीयता धोक्यात येते.
महाराष्ट्र: सत्ताधारी २१ आमदारांना आलिशान डिफेंडर कारची 'दिवाळी भेट'?
महाराष्ट्रातील सत्ताधारी २१ आमदारांना एकाच ठेकेदाराने दिवाळी भेट म्हणून आलिशान डिफेंडर कार दिल्या आहेत असा खळबळजनक दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. अलीकडेच शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या डिफेंडरवरील आरोपानंतर हा दावा करण्यात आला आहे. आमदाराचे स्टीकर लावलेली डिफेंडर कार एका कंत्राटदाराच्या नावावर आहे. कोणत्या कंत्राटातून कमिशन मिळाले याचा शोध घेतला पाहिजे असा आरोप भाजपा नेते विजयराज शिंदेंनी केला होता.
फिल्मी: लग्नानंतर तापसी पन्नूने सोडला देश? या चर्चांचं अभिनेत्रीने केलं खंडन
तापसी पन्नू नवऱ्यासोबत डेन्मार्कला स्थायिक झाल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या होत्या. आता त्यावर तापसीने निशाणा साधला आहे. कोणतीही खातरजमा न करता अशा चर्चा उठल्याचं अभिनेत्रीने म्हटलं आहे. तसंच आपण सध्या मुंबईतील दमट वातावरणात सकाळी डोसा खात या बातम्या वाचत असल्याचं ती मजेशीर अंदाजाच म्हणाली. चुकीच्या बातम्या देणाऱ्यांना अधिक संशोधन करण्याचा सल्लाही तिने दिला आहे.
महाराष्ट्र: तुमच्या व्हॉट्सॲपवर आमची नजर; चंद्रशेखर बावनकुळेंचं खळबळजनक विधान
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बंडखोरी केल्यास पाच वर्षे आमचे दरवाजे तुमच्यासाठी बंद राहतील असा सज्जड दम भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळेंनी कार्यकर्त्यांना दिला आहे. त्याशिवाय शहरातील असा कोणताही व्हॉट्सअॅप ग्रुप नाही की ज्याच्यावर माझं लक्ष नाही. कोणत्या ग्रुपवर कोण काय मेसेज टाकतो, कोण काय बोलतो हे माझ्या वॉर रूम दररोज पाहतो. पूर्ण माहिती आपल्याला मिळते असं त्यांनी सांगितले.
सखी: केस गळती थांबवा: आवळा आणि कोरफडीचा प्रभावी उपाय
केस गळतीने त्रस्त आहात? आवळा आणि कोरफड मदत करू शकतात! पोषक तत्वांनी समृद्ध, ते केसांच्या मुळांना मजबूत करतात आणि केस गळणे कमी करतात. चांगल्या परिणामांसाठी हेअर पॅक किंवा तेल म्हणून वापरा. नियमित वापराने केस जाड आणि मजबूत होतात.
महाराष्ट्र: सीएम फडणवीस अन् मनोज जरांगे पहिल्यांदाच एका व्यासपीठावर येणार? चर्चांना उधाण...
मनोज जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर दिसणार असल्याची माहिती समोर आली आहे. 26 ऑक्टोबर रोजी मंगळवेढा येथे होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा अनावरण सोहळ्याला दोघेही एकाच व्यासपाठीवार येतील. या घडामोडीमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमधील RSS कार्यालयावर वंचितचा जनआक्रोश मोर्चा
काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही कार्यकर्त्यांनी छत्रपती संभाजीनगरमधी एका कॉलेजसमोर सदस्य नोंदणी अभियान राबवले. यावरुन राज्यातील वातावरण तापले आहे. याच पार्श्वभूमीवर आज वंचित बहुजन आघाडीनं (VBA) सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली शहरातील संघाच्या कार्यालयावर ‘जनआक्रोश मोर्चा’ काढला आहे.
सखी: किम कार्दशियनला ब्रेन ॲन्युरिझम; महिलांना धोका जास्त.
किम कार्दशियनला ब्रेन ॲन्युरिझम झाल्याचे निदान. यात रक्तवाहिन्या कमजोर होतात. न फुटल्यास उपचाराची गरज नाही, पण फुटल्यास धोका. महिलांमध्ये प्रमाण जास्त. आनुवंशिकता, उच्च रक्तदाब, ताण ही कारणे. निरोगी जीवनशैलीमुळे धोका कमी होतो.
जालना: भुजबळांना मंत्रिमंडळातून काढा; जरांगे पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारवर तीव्र हल्लाबोल केला आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट उद्देशून म्हटलं की, हैदराबाद गॅझेटनुसार तातडीनं प्रमाणपत्र वाटप सुरू करा. तुम्ही मराठ्यांची मनं जिंकली आहेत, ती कायम ठेवायची असतील तर वेळ घालवू नका.
व्यापार: टाटा ट्रस्ट आणि मेहली मिस्त्री वाद लवकरच मिटणार?
टाटा ट्रस्टने मेहली मिस्त्री यांना आजीवन विश्वस्तपदाची ऑफर दिली, ज्यामुळे चालू असलेले वाद मिटण्याची शक्यता आहे. सरकारच्या हस्तक्षेपानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. कारण टाटा समूहाचे अर्थव्यवस्थेतील महत्त्व लक्षात घेऊन सामोपचाराने तोडगा काढण्याचे आवाहन करण्यात आलं होतं.
जालना: 'शेतकऱ्यांची कर्जमाफी न करता नेता कसा फिरतो, हेच बघतो'- मनोज जरांगे
मनोज जरांगे पाटील यांनी संपूर्ण कर्जमाफीसाठी शेतकरी आंदोलनाची तयारी सुरू केली. कर्जमाफी न झाल्यास नेत्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. यावर तोडगा काढण्यासाठी शेतकरी नेते, तज्ञांसोबत येत्या २ नोव्हेंब रोजी बैठक आयोजित करण्यात आली आहे.
फिल्मी: मराठमोळ्या त्रिशा ठोसरबद्दल थेट केबीसीमध्ये विचारला गेला २५ लाखांचा प्रश्न, पाहा व्हिडीओ
'कौन बनेगा करोडपती' (KBC) हा केवळ एक क्विझ शो नाही, तर अनेक भारतीयांसाठी करोडपती बनण्याचे आणि महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रीन शेअर करण्याचे स्वप्न आहे. या शोमुळे अनेकांचे आयुष्य बदलले आहे. मात्र, 'केबीसी'च्या हॉटसीटवर बसणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच मोठे यश म्हणजे थेट 'केबीसी'मध्ये एखाद्या व्यक्तीबद्दल प्रश्न विचारला जाणे. आता या भाग्यवान लोकांच्या यादीत मराठमोळ्या त्रिशा ठोसर (Trisha Thosar) या चिमुकल्या अभिनेत्रीचा समावेश झाला आहे. फक्त सहा वर्षांच्या त्रिशाबद्दल थेट 'केबीसी'च्या हॉटसीटवर बसलेल्या एका स्पर्धकाला प्रश्न विचारण्यात आला आहे.
आंतरराष्ट्रीय: पाकिस्तानला उशिराने शहाणपण! हिंसक घटनांनंतर TLP वर घातली बंदी
पाकिस्तानने तहरीक-ए-लब्बैक पाकिस्तान (TLP) वर हिंसक आंदोलनानंतर बंदी घातली, ज्यात १६ लोकांचा मृत्यू झाला होता. दहशतवाद विरोधी कायद्यांतर्गत ही बंदी घातली आहे. मंत्रिमंडळाच्या एकमताच्या निर्णयानंतर ही बंदी लागू करण्यात आली. याआधी २०२१ मध्येही त्यांच्यावर बंदी घातली होती. टीएलपी आता प्रतिबंधित दहशतवादी गटांच्या यादीत सामील झाले आहे.
सखी: थंडीत सर्दी-खोकला टाळण्यासाठी आहारात 'या' गोष्टींचा समावेश करा.
थंडीत निरोगी राहण्यासाठी लसूण, गूळ, हिरवी मिरची, ड्राय फ्रुट्स, आले आणि हळद खा. हे पदार्थ शरीर गरम ठेवतात, प्रतिकारशक्ती वाढवतात आणि संक्रमणापासून बचाव करतात.
फिल्मी: जान्हवी कपूरने प्लास्टिक सर्जरी केल्याचं स्वीकारलं, आई श्रीदेवीनेच दिला सल्ला
जान्हवी कपूर आज आपल्या सौंदर्याने सर्वांना प्रेमात पाडते. मात्र काही वर्षांपूर्वी तिचा लूक खूपच वेगळा होता. तिने प्लास्टिक सर्जरी केल्याची चर्चा झाली. आता तिने अखेर हे जाहीररित्या मान्य केलं आहे. अगदी विचारपूर्वक आणि आईच्या सल्ल्यावरुनच आपण हे केल्याचं ती म्हणाली. यात जर काही चुकलं तर त्याहून वाईट काही नसतं हेही तिने सांगितलं. तसंच मुलींनी ज्यात आनंद वाटतो ते करावं असाही तिने सल्ला दिला.
महाराष्ट्र: ५० खोकेनंतर डिफेंडरची चर्चा; कंत्राटदाराकडून आमदारांना गाड्या भेट: काँग्रेसचा आरोप.
काँग्रेसचा आरोप, २१ आमदारांना कंत्राटदाराकडून डिफेंडर गाड्या भेट. भाजप नेत्याचा आमदार गायकवाडांवर कमिशन घेतल्याचा आरोप. गायकवाड यांनी मालकी नाकारली, राजकीय सूड असल्याचे म्हटले. सपकाळ यांनी लोकप्रतिनिधींच्या दिखाऊपणावर टीका केली.
हॉकी: भारतात हॉकी खेळणार नाही! पाकिस्तानची माघार, सुरक्षेचे कारण
भारतातील एफआयएच ज्युनियर हॉकी विश्वचषक स्पर्धेतून पाकिस्तानने माघार घेतली, सुरक्षा आणि तणावपूर्ण संबंधांचे कारण दिले. क्रिकेटमधील आशिया कपमधील हस्तांदोलन हा वाद आणि ट्रॉफी न स्वीकारल्याच्या इतर मुद्यांचा उल्लेख करत त्यांनी हा निर्णय घेतला, विशेष म्हणजे महिला क्रिकेट संघ भारतात खेळत आहे.
फिल्मी: प्रसिद्ध बॉलिवूड गायकाला अटक; १९ वर्षीय तरुणीने केले लैंगिक अत्याचाराचे आरोप
बॉलिवूडमधील लोकप्रिय संगीतकार जोडी सचिन-जिगर यांच्यापैकी संगीतकार सचिन संघवीला एका १९ वर्षीय तरुणीच्या तक्रारीनंतर अटक करण्यात आली आहे. तरुणीने केलेल्या तक्रारीनुसार, सचिन संघवीवर बलात्कार आणि लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप लावण्यात आले होते. इतकंच नव्हे तर,सचिन संघवीने तरुणीला जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पाडलं, असाही आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे विलेपार्ले पोलिसांनी सचिनला बेड्या ठोकल्या आहेत. काय आहे नेमकं प्रकरण?
आंतरराष्ट्रीय: अमेरिकेच्या निर्बंधानंतर पुतीन भडकले; टॉमहॉक क्षेपणास्त्रांमुळे तणाव वाढला.
अमेरिकेने रशियन तेल कंपन्यांवर निर्बंध लादल्याने पुतीन भडकले. बाह्य दबावाला बळी पडणार नाही, असा इशारा दिला. टॉमहॉक क्षेपणास्त्रांच्या मागणीमुळे तणाव वाढला, रशियाने याला 'रेड लाईन' मानले. शिखर बैठक स्थगित केली असून डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रयत्नांवर पाणी फेरले आहे.
व्यापार: ओला-उबरला टक्कर देण्यासाठी 'भारत टॅक्सी', सरकारचा पाठिंबा!
ओला आणि उबरच्या मक्तेदारीला आव्हान देण्यासाठी 'भारत टॅक्सी' येत आहे. दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेशात लवकरच सुरू होणारी ही सहकारी टॅक्सी सेवा कमी भाडे, वाढीव दर नसणे आणि चालक मालकी यावर आधारित असून, तिला 300 कोटी रुपयांचे पाठबळ आहे.
मुंबई: मुंबई पोलिसांची मोठी कारवाई! डी-गँगचा ड्रग्स मास्टरमाइंड दुबईतून जेरबंद
मुंबई पोलिसांनी डी-गँगच्या ड्रग्स नेटवर्कचा पर्दाफाश करत दुबईतून एका मास्टरमाइंडला अटक केली. कुर्ला ते सांगलीपर्यंत चाललेल्या या कारवाईत २५६ कोटींचे ड्रग्स जप्त, १२६ किलो मेफेड्रोन जप्त. आंतरराष्ट्रीय ड्रग्स तस्करी प्रकरणी १५ जणांना अटक.
राष्ट्रीय: आंध्र प्रदेश: लक्झरी बस जळाल्याने ३२ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू
हैदराबाद-बंगळूर महामार्गावर कर्नूलजवळ बसला अपघात होऊन आग लागली, ज्यात ३२ प्रवाशांचा मृत्यू झाला. दुचाकी धडकल्याने आग भडकली. अनेक प्रवासी झोपेत असताना ही दुर्घटना घडली. काही प्रवासी बाहेर पडले, जखमींना रुग्णालयात दाखल केले. मुख्यमंत्र्यांनी दु:ख व्यक्त केले व मदतीचे निर्देश दिले. अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून आग विझवली.