
मुंबई: शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात राज ठाकरेंना मिळणार खास मान?
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात राज ठाकरेंना विशेष मान मिळण्याची शक्यता आहे. ठाकरे बंधूंनी एकत्र यावे, मुंबईतील मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी दोघांनी एकत्र नेतृत्व करावे अशी लोक भावना आहे. आता दसरा येईल त्यात निश्चितपणे एखादी चांगली बातमी मिळेल अशी अपेक्षा केली तरी हरकत नाही परंतु नक्कीच यावेळचा दसरा मेळावा न भूतो, न भविष्य असा असेल असं सचिन अहिर यांनी सांगितले.

बीड: बीडमध्ये खळबळ: सरकारी वकिलानंतर आता डॉक्टरची आत्महत्या, कारण गुलदस्त्यात
बीड जिल्ह्यातील वडवणी येथे डॉ. शुभम यादव यांनी तलावात उडी मारून आत्महत्या केली. ते प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत होते. अवघ्या १५ दिवसांपूर्वी सरकारी वकिलांनीही आत्महत्या केली होती. आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून पोलीस तपास करत आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. - लोकमत

सखी: भारती सिंग सुंदर, लांबसडक, घनदाट केसांसाठी खास घरगुती तेलाचा वापर करते.
कॉमेडियन भारती सिंग केसांसाठी घरगुती तेल वापरते. मेथी, कढीपत्ता, खोबरेल तेल आणि कांद्याच्या रसापासून बनवलेले हे तेल केसांना मजबूत आणि घनदाट बनवते.

सखी: एनर्जी ड्रिंक्समुळे तरुणांना हार्ट ॲटॅकचा धोका; वेळीच सावध व्हा!
सतत एनर्जी ड्रिंक्स पिण्याच्या सवयीमुळे तरुणांना हार्ट ॲटॅक येण्याचा धोका वाढला आहे. या पेयांमुळे रक्तदाब आणि साखर वाढते, ज्यामुळे हृदय कमजोर होते.

राष्ट्रीय: उपराष्ट्रपती निवडणूक! विरोधकांसमोर आव्हान; क्रॉस व्होटिंग कुणाचा 'गेम' करणार?
उपराष्ट्रपती निवडणुकीत संख्याबळानुसार, एनडीएचे उमेदवार सी.पी. राधाकृष्णन यांचे पारडे जड दिसत आहे. विरोधकांकडे संख्याबळ कमी असले तरी, क्रॉस व्होटिंगमुळे निकालात ट्विस्ट येऊ शकतो. काही खासदारांची भूमिका गुलदस्त्यात असल्याने निवडणुकीत अनपेक्षित 'गेम' होण्याची शक्यता आहे. सध्या लोकसभेत ५४२ तर राज्यसभेत २३९ खासदार आहेत परंतु बीजेडी, बीआरएस खासदारांनी तटस्थ भूमिका घेतल्याने विजयी उमेदवाराला जिंकण्यासाठी ३८६ खासदारांच्या पाठिंब्याची गरज आहे.

सखी: गॅसची चिमणी काळीकुट्ट- तेलकट झाली? पांढरी पावडर करेल जादू- मिनिटांत होई साफ
स्वयंपाकघरातील तेलकट, काळी चिमणी साफ करणे कठीण आहे. डिशवॉश लिक्विडऐवजी वापरा हा पांढरा पदार्थ, ज्यामुळे चिमणी सहज स्वच्छ होईल आणि आरोग्य देखील नीट राहिल.

बीड: हैदराबाद गॅझेटिअरचा GR वाचवण्यासाठी याचिका; न्यायालयात कॅव्हेट दाखल
मराठा आरक्षणासाठी २ सप्टेंबरचा GR वाचवण्यासाठी गंगाधर काळकुटे यांनी सर्वोच्च, उच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले. GR विरोधात याचिका दाखल झाल्यास, सुनावणीपूर्वी चर्चा व्हावी, जरांगेंची भूमिका जाणून घ्यावी, अशी मागणी आहे. ॲड. कैलास मोरे वकील आहेत. सरकारने बाजू मांडावी, GR टिकावा, अशी जरांगेंची अपेक्षा आहे.

सखी: लहान मुलांचा चष्मा घालवण्यासाठी प्रभावी सवयी आणि उपाय
लहान वयात लागलेला चष्मा घालवण्यासाठी जीवनशैलीत बदल, योग्य आहार, नियमित व्यायाम महत्त्वाचे आहेत. डोळ्यांवरचा ताण कमी करण्यासाठी नेत्ररोग तज्ज्ञांचा सल्ला घ्याच आणि घरी करा हे उपाय.

जालना: अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंचे जल्लोषात स्वागत; फुलांचा वर्षाव, गुलालाची उधळण
मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटी येथे दाखल झाले, तिथे त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. त्यांनी मराठा एकतेचे कौतुक केले आणि महिलांच्या त्यागाला नमन केले. मराठ्यांनी आरक्षणाची लढाई जिंकली असून मराठवाड्यातील मराठ्यांना ओबीसी आरक्षणाचा 100% लाभ मिळेल, असे जरांगे म्हणाले. लवकरच विजय मेळावा होणार!

व्यापार: अमेरिकेवर मंदीचे सावट! कोरोनापेक्षाही भयंकर स्थितीचा इशारा
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर मंदीचे संकट दिसून येत आहे. येणारी परिस्थिती कोरोनापेक्षा गंभीर असेल असा दावा करण्यात आलाय. २००८ मध्ये मंदीचा अंदाज वर्तवणारे मार्क झँडी यांनी अमेरिकेतील राज्यांची आर्थिक स्थिती खालावल्याचं सांगितलं. महागाई वाढल्याने अमेरिकन नागरिकांवर दुहेरी संकट येण्याची शक्यता आहे.

सखी: टक्कल दिसतंय? मोहरीच्या तेलात मेथी दाणे घाला, केस होतील दाट
केस लांब, दाट करण्यासाठी मोहरीच्या तेलात मेथी दाणे मिसळून लावा! हे मिश्रण केसांच्या वाढीस मदत करेल आणि केस गळती कमी करेल. नियमित वापराने केस दाट होतील आणि पांढऱ्या केसांची समस्या दूर होईल.

सखी: प्रेमानंद महाराज: शिक्षण असूनही मुलांमध्ये 'या' गोष्टीची कमतरता, पालकांकडून दुर्लक्ष
प्रेमानंद महाराज म्हणतात मुलं कितीही शिकली तरी एक गोष्ट मात्र त्याच्यात कायमच अपुरी असते आणि याची जाणीव पालकांनाही होत नाही. वाढत्या शिक्षणाची आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे मुलांमध्ये नम्रता, प्रेम आणि आदर कमी प्रमाणात पाहायला मिळतो.

क्रिकेट: व्वा, हरभजन सिंग! बोटी, रुग्णवाहिका, निधीचा पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात
हरभजन सिंग याने पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला. तो आप पक्षाकडून राज्यसभेचा खासदार आहे. त्यामुळे त्याने खासदार निधीतून आणि स्वत:च्या पैशातून मिळून एकूण ११ बोटी, ३ रुग्णवाहिका दिल्या. तसेच लोकांंना आवाहन करून एकूण ५० लाखांचा निधी उभारला. गरज पडल्यास भविष्यातही सर्वतोपरी मदत केली जाईल असे आश्वासन त्याने दिले आहे.

फिल्मी: वडिलांच्या ट्रोलिंगवर श्रीया पिळगावकर पहिल्यांदाच बोलली, म्हणाली- 'शेवटी बाबांना...'
सचिन पिळगावकर यांना मध्यंतरी सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केलं गेलं होतं. त्यावर आता श्रीयाने प्रतिक्रिया दिली आहे. ते सगळंच खेदजनक होतं. पण, बाबांना मायबाप प्रेक्षकांकडून अमाप प्रेम मिळतंय, त्यापुढे ट्रोलिंग काहीच नाही, असं तिने म्हटलं आहे.

राष्ट्रीय: मेहुल चोक्सीला तुरुंगात मिळणार १४ सुविधा; भारताकडून बेल्जियमला ग्वाही
पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणी सध्या अटकेत असलेल्या मेहुल चोक्सीला भारतात आणल्यास अमानुष वागणूक देणार नाही अशी ग्वाही भारताने दिली आहे. गृह मंत्रालयाने बेल्जियम सरकारला पत्र पाठवून त्याला जेलमध्ये काय काय सुविधा देणार त्याची यादी दिली. त्यात मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात विशेष कोठडी, स्वच्छता, वैद्यकीय सुविधा व करमणुकीसाठी साहित्य मिळेल, असे भारताने बेल्जियमला सांगितले आहे.

आंतरराष्ट्रीय: नेपाळमध्ये सोशल मीडियावर बंदी; युवा पिढी आक्रमक, सरकारविरोधात निदर्शने!
नेपाळ सरकारने सोशल मीडिया अॅप्सवर बंदी घातल्यामुळे देशातील युवा पिढी आक्रमक झाली आहे. राजधानी काठमांडूमध्ये हजारो तरुणांनी हिंसक निदर्शने केली. यादरम्या, संसदेत घुसण्याचा प्रयत्नही करण्यात आला. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला. या निदर्शनाच्या पार्श्वभूमीवर काठमांडूमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.

छत्रपती संभाजीनगर: १७ सप्टेंबरपर्यंत कुणबी प्रमाणपत्र द्या, अन्यथा परिणाम भोगा: जरांगे
मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाड्यातील मराठा समाजाला १७ सप्टेंबरपर्यंत कुणबी प्रमाणपत्र देण्याचा इशारा सरकारला दिला आहे, अन्यथा नारायणगड येथील दसरा मेळाव्यात मोठा निर्णय घेतला जाईल. जरांगे यांनी भुजबळ यांच्यावरही निशाणा साधला, मराठ्यांना ओबीसीमध्ये सामील होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.

मुंबई: विभाग प्रमुखांची नियुक्ती; शिंदेंच्या शिवसेनेत नाराजीनाट्य
विभागप्रमुखांच्या नव्या नियुक्तीवरून शिंदेसेनेत वाद चिघळला असून, पश्चिम उपनगरात शिंदेसेनेचे पदाधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. पालिका निवडणुका जवळ आल्याने त्यांच्या नाराजीचा पक्षाला फटका बसू शकतो, अशी चर्चा सध्या नाराज समर्थकांमध्ये आहे.

मुंबई: मुंबई लोकल प्रवास आता गारेगार, वेगवानही; वंदे मेट्रोसारखे असतील डबे
पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर अधिक सुविधा-संपन्न वातानुकूलित लोकल उपलब्ध करण्यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) तयारी पूर्ण केली आहे. त्यानुसार १२ ते १८ डब्यांच्या २३८ लोकलसाठी २,८५६ एसी लोकल डबे खरेदीसाठी निविदा प्रसिद्ध केली आहे. अधिकाऱ्यांच्या मते हे डबे वंदे मेट्रो प्रमाणे असणार आहेत.

राष्ट्रीय: बिहारमध्ये खळबळ! हिंदूंच्या घरात आढळले मुस्लिम मतदार, गावकरी हैराण!
बिहारमध्ये निवडणूक आयोगाकडून विशेष सुधारणा करून प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यात मुजफ्फरपूरच्या मोहनपूरमध्ये हिंदूंच्या घरात मुस्लिम मतदारांची नावे आढळल्याने खळबळ माजली आहे. ही चूक नसून मोठे षडयंत्र आहे असा इथल्या गावकऱ्यांचा आरोप आहे. गावात अनेक वर्षांपासून बंद असलेल्या घरातही मुस्लिम मतदारांचे नाव समाविष्ट केले आहे. या यादीत सुधारणा न झाल्यास निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला.

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर: रॉंग साईड जीपने पती-पत्नीसह चिमुकल्याचा घेतला बळी
गंगापूर-वैजापूर मार्गावर भरधाव जीपने दुचाकीला धडक दिल्याने पती-पत्नी आणि त्यांच्या एका वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. सजन राजपूत आपल्या कुटुंबासोबत वाळूजला जात असताना हा अपघात झाला. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

राष्ट्रीय: जम्मू-काश्मीर: जवानांशी चकमकीत दहशतवादी ठार, पाकिस्तानी घुसखोरही अटकेत
जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये सुरक्षा दलांच्या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आले. गुड्डर वनक्षेत्रात ही चकमक झाली. तर, दुसरीकडे आर.एस. पुरा सेक्टरमध्ये एका पाकिस्तानी घुसखोराला अटक करण्यात आली आहे. घुसखोराकडून पाकिस्तानी चलन जप्त केले गेले. तसेच, त्याचा भारतात येण्याचा हेतु काय, याची चौकशी सुरू आहे.

आंतरराष्ट्रीय: भारतावरील ट्रम्प यांच्या टॅरिफचे झेलेन्स्कींकडून समर्थन
भारतावर डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेल्या टॅरिफचे झेलेन्स्की यांनी समर्थन केले. रशियाला मदत करणाऱ्यांवर निर्बंध आवश्यक आहेत, असे ते म्हणाले. रशियाशी व्यापार करणाऱ्या देशांवर कारवाईचे झेलेन्स्की यांनी समर्थन केले.

संपादकीय: मुंबई महापालिका: महापौरपद, स्टँडिंग कमिटी भाजपला पाहिजे!
मुंबई महापालिकेत २२७ जागा आहेत. त्यांपैकी भाजपला १६० ते १७० जागांवर उमेदवार उभे करायचे आहेत. काही जागा मित्रपक्षांना द्यायच्या आहेत. याचा अर्थ मुंबईमध्ये शिंदेसेनेला ५० ते ६० जागादेखील मिळणार नाहीत. भाजपला कोणत्याही परिस्थितीत मुंबईसह प्रमुख शहरांमध्ये महापौरपद स्वतःकडेच हवे आहे. याशिवाय प्रमुख महापालिकांच्या स्टँडिंग कमिटीचे चेअरमनपदही भाजपलाच हवे आहे.

मुंबई: गणेश विसर्जन: मुंबईत २२ वर्षांत पहिल्यांदा ध्वनी प्रदूषण मोजले नाही
मुंबईत गणेश विसर्जनादरम्यान डीजे, बेंजो आणि फटाक्यांचा दणदणाट होता. आवाज फाउंडेशनने २२ वर्षांनंतर ध्वनी प्रदूषण मोजले नाही, कारण वारंवार मोजूनही काही परिणाम दिसला नाही. पावसामुळे अचूक आकडे मिळवणे कठीण होते. लोकांना आता नियमांची जाणीव आहे. - लोकमत

राष्ट्रीय: कर्नाटक: लिंगायत समाजाची हिंदू धर्म सोडून स्वतंत्र ओळख मागायला सुरुवात!
कर्नाटकात जात सर्वेक्षणाआधी लिंगायत समाजाने हिंदू नव्हे, 'वीरशैव-लिंगायत' म्हणून नोंदणी करण्याची मागणी केली आहे. यामुळे भाजपच्या व्होट बँकेला फटका बसण्याची शक्यता आहे.

क्रिकेट: मोहम्मद नवाजची हॅटट्रिक! आशिया कपपूर्वी पाकिस्तानने उडवली विरोधकांची दाणादाण!
पाकिस्तानच्या मोहम्मद नवाजने अफगाणिस्तानविरुद्धच्या टी२० सामन्यात हॅटट्रिक घेत संघाला विजय मिळवून दिला. नवाज टी२० मध्ये हॅटट्रिक घेणारा तिसरा पाकिस्तानी गोलंदाज ठरला. पाकिस्तानने ७५ धावांनी सामना जिंकून तिरंगी मालिकेच्या ट्रॉफीवर नाव कोरले.

राष्ट्रीय: उपराष्ट्रपतिपदावर कोण बसणार? एनडीए आणि इंडिया आघाडीची जोरात तयारी
मंगळवारी होत असलेल्या उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी एनडीए आणि इंडिया आघाडीची जय्यत तयारी सुरू आहे. एनडीएच्या खासदारांनी दोन दिवसीय प्रशिक्षण घेतले, तर इंडिया आघाडीचे खासदार सोमवारी मॉक पोलद्वारे सराव करणार आहेत. सी. पी. राधाकृष्णन हे एनडीएचे उमेदवार आणि माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी हे संयुक्त विरोधी पक्षांचे उमेदवार आहेत.

मुंबई: दिवाळीत मध्य रेल्वेच्या ९४४ विशेष गाड्या, अनारक्षित डब्यांची सोय!
दिवाळी आणि छटपूजेसाठी मध्य रेल्वेकडून ९४४ आरक्षित आणि अनारक्षित विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. मुंबई, पुणे, कोल्हापूर, नागपूर विभागातून कोल्हापूर, सावंतवाडीसह दक्षिण आणि उत्तर भारतातील विविध शहरांमध्ये सोडण्यात येणार आहेत. यामध्ये वातानुकूलित, शयनयानासह अनारक्षित मिश्र व्यवस्था असलेल्या गाड्यांचा समावेश आहे.

राष्ट्रीय: जीएसटी कपातीने २ लाख कोटींचा सरकारला तोटा? आर्थिक ताण वाढणार?
सरकारने २२ सप्टेंबरपासून जीएसटी दर दोन स्तरावर म्हणजे ५% आणि १८ टक्क्यांवर आणण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे अपेक्षेपेक्षा जास्त महसुली तूट निर्माण होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. अर्थतज्ज्ञांचा अंदाज आहे की पुढील दोन वर्षांत हा तोटा तब्बल २ लाख कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकतो.

मुंबई: राजाला निरोप देण्यासाठी भाविकांचे प्राण कंठाशी; भरती-ओहोटीत रेंगाळला लालबागचा राजा
लालबागचा राजाच्या विसर्जनात यंदा प्रथमच अडथळे आले. अनंत चतुदर्शीच्या दुसऱ्या दिवशी रात्री साडेनऊ वाजता लालबाग राजाचे विसर्जन झाले. विसर्जनादरम्यान आलेली भरती आणि खास गुजरातहून विसर्जनासाठी आणलेल्या अत्याधुनिक तराफ्यावर मूर्ती चढवताना झालेली कसरत यामुळे राजाच्या विसर्जनाला यंदा ३६ तासांपेक्षा अधिक काळ लागला. या सगळ्यामुळे भाविकांचे प्राण मात्र कंठाशी आले होते.