 
            बीड: मृत डॉक्टरच्या बोटाने मोबाईलमधील डेटा डिलीट केल्याचा कुटुंबीयांचा संशय
                मृत डॉक्टरच्या बोटाने मोबाईलमधील डेटा डिलीट केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. शवविच्छेदनानंतर व्हॉट्सॲप 'लास्ट सीन' दिसल्याने संशय वाढला. शासकीय प्रतिनिधीने न्यायाचे आश्वासन दिले; राजकीय नेत्यांनी सांत्वन केले.
            
            
         
    महाराष्ट्र: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
      महाराष्ट्र केसरी जिंकणारा आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू सिकंदर शेख मोठ्या प्रकरणात अडकला आहे. पंजाब पोलिसांनी सिकंदर शेख याला शस्त्रतस्करी प्रकरणात अटक केली आहे. सीआयए पथकाने राजस्थानातील पपला गुर्जर टोळीला शस्त्र पुरवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. टोळीतील चार जणांना अटक करण्यात आले असून, यात एक सिकंदर शेख आहे. 
    
    
     
      पुणे: "सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
        "शून्य टक्के व्याजदराने पैसे दिल्यावर तुम्हीपण वेळच्या वेळी पैसे फेडायची सवय लावा ना. सारखंच फुकटात, सारखंच फुकटात आणि सारखंच माफ, सारखंच माफ; कसं व्हायचं? असे म्हणत अजित पवारांनी  कर्जमाफीच्या मागणीवरून शेतकऱ्यांना सुनावले. 
      
      
       
        छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात उशिरा झालेल्या जन्म-मृत्यू नोंदींची पडताळणी होणार
          छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ३० हजार उशिरा झालेल्या जन्म-मृत्यू नोंदींची तीन महिन्यांत पडताळणी होणार आहे. यासाठी तहसील व महानगरपालिका स्तरावर समित्या स्थापन करून शासकीय नियमांनुसार नोंदी नियमित केल्या जाणार आहेत. यामुळे जन्म-मृत्यू नोंदणी प्रक्रिया सुलभ होईल.
        
        
         
          तंत्रज्ञान: मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
            तुम्ही दिवसभर कुठे फिरता, कुठे राहता, कोणत्या लोकांना भेटता, तुमचं घर किती मोठं आहे, या सगळ्यांची माहिती दुसऱ्याला सहज मिळू शकते. याच माहितीचा वापर करून तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलं जाऊ शकते. ही सगळी माहिती दुसऱ्याला कळू शकते जीपीएसच्या माध्यमातून. आयआयटी दिल्लीतील प्राध्यापक डॉ. स्मृति आर. सारंगी यांनी याबद्दल संशोधन केले आहे.
          
          
           
            छत्रपती संभाजीनगर: गंगापूर सिंचन योजना ठप्प: ठेकेदाराला दररोज २५ हजार दंड
              गंगापूर सिंचन प्रकल्प सहा महिन्यांपासून ठप्प; कामातील दिरंगाईमुळे ठेकेदाराला दररोज २५ हजार रुपयांचा दंड. जायकवाडी प्रकल्पाचा अर्धाअधिक जलसाठा गंगापूर तालुक्यात होतो; परंतु तालुक्यातील निम्म्याहून अधिक गावांतील शेतीला सिंचनासाठी पाणी मिळत नाही. यामुळे शासनाने दोन वर्षांपूर्वी गंगापूर उपसा सिंचन योजना मंजूर केली. सूचना देऊनही काम अपूर्ण.
            
            
             
              राष्ट्रीय: भाजप पटेलांच्या वारशाचा अपमान करतंय; खरगेंचा हल्लाबोल
                "देश एका व्यक्तीच्या भरोशावर चालत नाही," असं म्हणत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांनी सरकारवर देशाचे तुकडे केल्याचा आरोपही केला. यासोबतच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) पुन्हा बंदी घालण्याची मागणी केली.
              
              
               
                छत्रपती संभाजीनगर: सायबर गुन्हेगारांचे कॉल सेंटर रॅकेट: देशविघातक कृत्यांसाठी फसवणूक
                  छत्रपती संभाजीनगरमधील आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरने परदेशी नागरिकांना फसवले. देशविघातक आर्थिक व्यवहाराचा संशय. तंत्रज्ञानाचा गैरवापर. मास्टरमाइंड फारुकला अटक; डेटा चोरी आणि विदेशी संबंधांची चौकशी सुरू. कंपनीतील साहित्यासह कर्मचाऱ्यांना नेणे, त्यांच्या राहण्याची, जेवणाची, कंपनीसाठी जागा, फर्निचरचा सगळ्या खर्चाची जबाबदारी फारुकवर होती.
                
                
                 
                  महाराष्ट्र: शेतकऱ्यांना तातडीने कर्जमाफी द्या; उद्धव ठाकरेंची मागणी
                    उद्धव ठाकरे यांनी जून २०२६ पर्यंत कर्जमाफीच्या सरकारच्या आश्वासनावर टीका केली आहे. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी तातडीने मदतीची मागणी केली, विलंबावर आणि त्याचा शेतकरी आत्महत्यांवर होणाऱ्या परिणामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ठाकरे यांनी सरकारला शेतकऱ्यांची फसवणूक थांबवण्याचे आणि तातडीने कर्जमाफी देण्याचे आवाहन केले. पुढच्या वर्षी जूनमध्ये जर खरंच कर्जमाफी होणार असेल तर आत्ताच्या कर्जाचे हप्ते भरायचे का? असा सवाल त्यांनी विचारला.
                  
                  
                   
                    महाराष्ट्र: राज ठाकरे कन्फ्युज नेते, जे त्यांना जमलं नाही...; शिंदेसेनेची टीका
                      संजय शिरसाट यांनी मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या भूमिकेतील बदलांवर टीका केली. आम्ही जेव्हा धाडसी पाऊल उचलले तेव्हा तुम्ही कौतुक केले होते. मागच्या लोकसभेला तुम्ही मोदींचे गुणगान गात होता. आता ते दुश्मन वाटायला लागले. मनसैनिकांची अवस्था काय, कोणता झेंडा घेऊ हाती असं झालंय. आता मनसेने थांबले पाहिजे, त्यांनी उबाठात सामील झालं पाहिजे. त्याशिवाय पर्याय नाही असं त्यांनी सांगितले.
                    
                    
                     
                      महाराष्ट्र: आर्याला वेगळे पैसे, सरकारी संबंध नाही: केसरकरांचे स्पष्टीकरण
                        रोहित आर्याला वैयक्तिकरित्या पैसे दिल्याचे दीपक केसरकर यांचे स्पष्टीकरण. शासकीय देयकांशी संबंध नाही. कर्जामुळे आर्याने मुलांना ओलीस ठेवले. केसरकरांनी आर्याच्या कामाचे समर्थन केले, पण ओलीस ठेवण्याच्या घटनेचा निषेध केला. पालकांकडून थेट शुल्क घेतल्याने आर्याचे बिल थकले.
                      
                      
                       
                        सखी: कार्तिकी एकादशी: पारंपरिक पद्धतीने करा खमंग शेंगदाण्याचे लाडू.
                          कार्तिकी एकादशीसाठी शेंगदाण्याचे लाडू बनवताय? मग शेंगदाणे, गूळ आणि तुपाचं योग्य प्रमाण वापरा आणि लाडूंचा चुरा होणं टाळा. शेंगदाणे खमंग भाजून घ्या, गुळ आणि वेलची पूड घालून मिक्सरमध्ये बारीक करा, तूप मिक्स करा आणि घट्ट लाडू वळा. चविष्ट लाडूंचा आनंद घ्या!
                        
                        
                         
                          महाराष्ट्र: राज ठाकरेंच्या मनसेचं उद्धवसेनेत विलिनीकरण?; शिंदेसेनेचा दावा
                            एकनाथ शिंदे यांच्या सेनेचे नेते राजू वाघमारे यांनी मनसेवर जोरदार टीका केली. राज ठाकरे यांची मनसे लवकरच उद्धव ठाकरे यांच्या पक्षात विलीन होईल. त्याबाबतचा पुरावा आता समोर आला आहे. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंचे नेतृत्व स्वीकारले आहे. एखाद्या कार्यकर्त्यासारखे ते उद्धव ठाकरेंच्या बाजूला बसलेले फोटो सामना वृत्तपत्रात आले आहे. त्यामुळे आता मनसे लवकरच उबाठात विलीन होईल असं बोलले जाते
                          
                          
                           
                            क्रिकेट: टीम इंडिया फायनलमध्ये! आयसीसीकडून बक्षिसांची मोठी घोषणा!
                              भारतीय महिला संघाने वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये धडक मारताच आयसीसीने विक्रमी बक्षीस जाहीर केले. विजेत्याला $4.48 मिलियन, मागील वेळेपेक्षा चौपट रक्कम मिळेल. उपविजेत्यालाही २० कोटी रुपये मिळणार आहेत. ऑस्ट्रेलियाला गेल्या वेळी विजेतेपदासाठी १२ कोटी रुपये मिळाले होते. यंदा उपांत्य फेरीत हरल्याचेच १० कोटी रुपये मिळणार आहेत.
                            
                            
                             
                              फिल्मी: मराठी अभिनेत्री रुचिता जाधवला रोहित आर्याने केलेला मेसेज, दाखवला स्क्रीनशॉट
                                मुंंबईला हादरवणाऱ्या रोहित आर्याने मराठी अभिनेत्री रुचिता जाधवला एका सिनेमाची ऑफर दिली होती. मुलांना ओलीस ठेवण्याचा सीन असेल असंही त्याने तिला सांगितलं होतं. त्याने तिला पवईला आरए स्टुडिओला भेटायलाही बोलवलं होतं. रुचिता जाधवने या सगळ्या संभाषणाचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर करत हा धक्कादायक खुलासा केला आहे. रोहित आर्याचं सत्य कळल्यावर तिला मोठा धक्काच बसला आहे.
                              
                              
                               
                                फिल्मी: रोहित आर्यामुळे मुंबई हादरली! यामीच्या सिनेमातील कथेसारखं सेम टू सेम किडनॅपिंग, तुम्ही पाहिलाय का 'तो' चित्रपट?
                                  पवईमध्ये काल गुरुवारी (३० ऑक्टोबर) एका व्यक्तीने तब्बल १७ लहानग्यांसह दोन ज्येष्ठ नागरिकांना ओलीस ठेवलं होतं. पण, मुंबई पोलिसांनी धैर्याने कारवाई करत मुलांना सुखरूप सोडवलं. ३८ वर्षीय रोहित आर्या  पोलिसांच्या गोळीबारात जखमी झाला आणि नंतर रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणाचं कनेक्शन बॉलिवूडच्या एका सुपरहिट थ्रिलर सिनेमाशी जोडलं जात आहे.
                                
                                
                                 
                                  क्रिकेट: स्मृती मंधाना पलाश मुच्छलसोबत अडकणार विवाहबंधनात; तारीख, ठिकाण ठरलं!
                                    भारतीय क्रिकेटपटू स्मृती मंधाना संगीतकार पलाश मुच्छलसोबत २० नोव्हेंबरला सांगलीत विवाहबंधनात अडकणार आहे. मंधाना विश्वचषक स्पर्धेत खेळत असली तरी तिच्या घरी लग्नाची तयारी जोरात सुरू आहे. या जोडप्याने गेल्या वर्षी सोशल मीडियावर आपल्या नात्याची कबुली दिली होती. आता ते सांगलीत लग्नगाठ बांधणार आहेत.
                                  
                                  
                                   
                                    लातुर: पुरातील तिघे २४ तासांनंतर सुखरूप घरी परतले!
                                      लातूरमधील बिंदगीहाळमध्ये मांजरा नदीच्या पुरात अडकलेले तिघे २४ तासांनंतर सुखरूप घरी परतले. पावसामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग कमी झाला. मांजरा, रेणा आणि तेरणा प्रकल्पांनी पाणी सोडणे कमी केल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. जोरदार पाऊस आणि वाढत्या नदीच्या पाण्यामुळे हे तिघे अडकले होते.
                                    
                                    
                                     
                                      राष्ट्रीय: 'टॅरिफ वॉर'दरम्यान अमेरिकेने बदलला आपला सूर, भारतासोबत केला एक मोठा संरक्षण करार...
                                        एकीकडे भारत आणि अमेरिकेत व्यापार कराराबाबत अंतिम निर्णय होणे बाकी असताना, दुसरीकडे दोन्ही देशांमध्ये महत्वाचा संरक्षण करार झाला आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी या कराराची घोषणा केली. हा करार दोन्ही देशांमधील संरक्षण संबंधांच्या नव्या दशकाचा प्रारंभ मानला जात आहे.
                                      
                                      
                                       
                                        धाराशिव: लेकींनी शेतात राबून पित्याला वाहिली श्रद्धांजली, आईला दिला आधार
                                          वडिलांच्या निधनानंतर, धाराशिवमधील पाच लेकींनी आठ दिवस शेतात राबून त्यांना श्रद्धांजली वाहिली आणि विधवा आईला आधार दिला. अंत्यविधीनंतर चौथ्याच दिवशी मावशी या पाच लेकींना घेऊन शेतात गेल्या. आठ दिवसांत सोयाबीनची काढणी, मळणी करण्यापासून ते कांदा खुरपणी व पडेल ते काम करून पित्याला अनोखी श्रद्धांजली वाहिली.
                                        
                                        
                                         
                                          छत्रपती संभाजीनगर: इन्स्टाग्राम प्रेमप्रकरण: अल्पवयीन मुलगी गुजरातला, प्रियकर निघाला ऑफिस बॉय!
                                            इन्स्टाग्रामवरील प्रेमात फसवणूक! १३ वर्षांची मुलगी गुजरातला प्रियकरासाठी पळाली, पण तो ऑफिस बॉय निघाला.  २३ ऑक्टोबर रोजी भाऊबीजेला दोघेही शहरात येऊन भावाला भेटण्याचा प्रयत्न करून निघून जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. दीड वर्षांनी पोलिसांनी दोघांना शोधले; मुलाला अटक, मुलगी घरी परतली.
                                          
                                          
                                           
                                            परभणी: तलावात बुडून दोन बहिणींचा अनर्थ; एक ठार, एक गंभीर
                                              कुऱ्हाडी येथे तलावात कपडे धुताना दोन बहिणी बुडाल्या. शेजारील महिलांनी आरडाओरड केली असता गावातील नागरिक धावून आले आणि दोघींना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू केला. संध्या चव्हाण यांचा मृत्यू झाला, तर पूजा चव्हाण गंभीर जखमी असून परभणीत उपचार घेत आहेत. कुटुंबीय लग्नासाठी गावी आले होते.
                                            
                                            
                                             
                                              राष्ट्रीय: 'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', PM मोदींचा घणाघात...
                                                आज सरदार वल्लभभाई पटेल यांची 150वी जयंती आहे. आजचा दिवस राष्ट्रीय एकतादिन म्हणून साजरा केला जातोय. या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. "काँग्रेसच्या चुकीमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानकडे गेला. काँग्रेसनं वेगळं संविधान तयार करुन कश्मीरला देशापासून वेगळं केलं," असा आरोप पीएम मोदींनी केला.
                                              
                                              
                                               
                                                बीड: मास्क, ग्लोज, गॅस कटर: बीडच्या बँकेत १८ लाखांचा हायटेक दरोडा
                                                  बीडमध्ये कॅनरा बँकेत १८ लाखांची चोरी; चोरट्यांनी मास्क, ग्लोज वापरले, भिंत तोडून प्रवेश केला, गॅस कटरने लॉकर तोडले. सीसीटीव्ही बंद पाडले. पोलिसांकडून तपास सुरु. एवढा धाडसी दरोडा लगेच येऊन टाकणे शक्य नाही. यासाठी आरोपींनी अगोदरच एक-दोन दिवस रेकी केल्याचा पोलिसांचा संशय आहे. त्यादृष्टीने पोलिस सीसीटीव्ही आणि इतर संशयितांची चौकशी करत आहेत.
                                                
                                                
                                                 
                                                  फिल्मी: 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकरांचा खुलासा
                                                    'पुन्हा शिवाजीराजे भोसले' हा मराठीतील बिग बजेट सिनेमा असल्याचं महेश मांजरेकरांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. तर सिनेमा बनवण्यासाठी कितीतरी कोटी खर्च झाल्याचा खुलासाही मांजरेकरांनी केला आहे. "हा सिनेमा साडेसात-आठ कोटीत होईल असं वाटलं होतं. पण, हा सिनेमा होईपर्यंत साधारण सिनेमाचं बजेट हे १३ कोटींचं झालं", असं मांजरेकर म्हणाले.
                                                  
                                                  
                                                   
                                                    पर्यावरण: पृथ्वीवरील 'महाविनाशा'चा धोका घटला? नवीन अभ्यास समोर.
                                                      नवीन अभ्यासानुसार, प्रजातींच्या ऱ्हासाचा वेग पूर्वीच्या अपेक्षेपेक्षा कमी आहे. अधिवास ऱ्हास आणि प्रदूषणामुळे जैवविविधतेचे नुकसान अजूनही चिंतेचे कारण असले, तरी 'महाविनाश'चा धोका कमी झाल्याचे दिसते.
                                                    
                                                    
                                                     
                                                      सखी: झटपट नाचणी डोसा: पौष्टिक, कुरकुरीत रेसिपी घरी सहज बनवा
                                                        तांदूळ आणि डाळ टाळा! ही नाचणीच्या डोश्याची रेसिपी पौष्टिक, हलकी आणि चविष्ट आहे. नाश्त्यासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी उत्तम. फक्त साहित्य मिक्स करा, ठेवा आणि नॉन-स्टिक पॅनवर शिजवा. चटणी किंवा सांबार सोबत सर्व्ह करा.
                                                      
                                                      
                                                       
                                                        व्यापार: ट्रम्प यांना ठेंगा! फोर्डची भारतात वापसी, ४ वर्षांनी प्रकल्प पुन्हा सुरू करणार
                                                          फोर्ड ३७० मिलियन डॉलर्सची गुंतवणूक करून भारतात आपला प्रकल्प पुन्हा सुरू करणार आहे. येथे उच्च प्रतीची इंजिने तयार करून निर्यात केली जातील. ट्रम्प यांच्या 'मेक इन अमेरिका' धोरणाला न जुमानता, फोर्ड भारताला जागतिक उत्पादन केंद्र बनवण्याच्या प्रयत्नात आहे. इतर अमेरिकन कंपन्याही भारतात विस्तार करत आहेत.
                                                        
                                                        
                                                         
                                                          सखी: भारतीयांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता, संशोधनातून कारणे उघड.
                                                            शहरी जीवनशैली आणि आहारातील बदलांमुळे भारतीयांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता मोठ्या प्रमाणावर आढळली आहे, असे संशोधनातून समोर आले आहे. दक्षिण भारतीयांमध्ये कमतरता जास्त आहे. किशोरवयीन आणि महिलांमध्ये व्हिटॅमिन डीची पातळी चांगली आहे.
                                                          
                                                          
                                                           
                                                            व्यापार: अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपवर ₹४१,९२१ कोटींच्या घोटाळ्याचा आरोप!
                                                              कोबरापोस्टने रिलायन्स ग्रुपवर ४१,९२१ कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला, ज्यात २००६ पासून निधी वळवल्याचा आरोप आहे. रिलायन्सने आरोप फेटाळले, याला शेअर बाजारात फेरफार करण्याचा हल्ला म्हटले आहे.
                                                            
                                                            
                                                             
                                                              मुंबई: दोन नोटिशींना प्रतिसाद नाही; उद्धव ठाकरेंना कारणे दाखवा नोटीस
                                                                कोरेगाव भीमा चौकशी आयोगाने उद्धव ठाकरेंना कागदपत्रे सादर न केल्याने कारणे दाखवा नोटीस बजावली. प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांनी दिलेली, उजव्या विचारसरणीच्या संघटनांच्या कथित सहभागाची कागदपत्रे सादर न केल्याने ठाकरेंविरोधात वॉरंटची मागणी केली.