Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > मुकेश अंबानी यांचा व्हायरल डाएट प्लॅन, नीता अंबानी सांगतात घरच्या साध्या जेवणातला त्यांचा आवडता पदार्थ

मुकेश अंबानी यांचा व्हायरल डाएट प्लॅन, नीता अंबानी सांगतात घरच्या साध्या जेवणातला त्यांचा आवडता पदार्थ

What is Mukesh Ambani's strict diet? Nita Ambani shares details : नीता अंबानी यांनी शेअर केला मुकेश अंबानींचा खास डाएट प्लॅन..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2024 04:04 PM2024-07-09T16:04:45+5:302024-07-09T16:06:21+5:30

What is Mukesh Ambani's strict diet? Nita Ambani shares details : नीता अंबानी यांनी शेअर केला मुकेश अंबानींचा खास डाएट प्लॅन..

What is Mukesh Ambani's strict diet? Nita Ambani shares details | मुकेश अंबानी यांचा व्हायरल डाएट प्लॅन, नीता अंबानी सांगतात घरच्या साध्या जेवणातला त्यांचा आवडता पदार्थ

मुकेश अंबानी यांचा व्हायरल डाएट प्लॅन, नीता अंबानी सांगतात घरच्या साध्या जेवणातला त्यांचा आवडता पदार्थ

राधिका -अनंत यांच्या लग्नामुळे अंबानी कुटुंब सध्या चांगलेच चर्चेत आहेत (Mukesh Ambani). अलीकडेच मुकेश अंबानी यांचा डाएट प्लॅन सोशल मीडियात व्हायरल झाला आहे (Neeta Ambani). त्यांच्या पत्नी नीता अंबानी यांनीच हा डाएट प्लॅन शेअर केला आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, नीता अंबानी यांनी स्वतः सांगितले की मुकेश अंबानी नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणात काय खातात? (Strict Diet Plan).

रिपोर्टनुसार, अनंत-राधिकाच्या लग्नासाठी त्या काशी विश्वनाथला गेले होते, तेव्हा त्यांनी ही माहिती दिली(What is Mukesh Ambani's strict diet? Nita Ambani shares details).

मुकेश अंबानींचा आवडता पदार्थ

आहाराविषयी नीता अंबानी सांगतात, 'संपूर्ण अंबानी कुटुंबाला फक्त घरगुती पदार्थ खायला आवडते. मुकेश अंबानी शाकाहारी आहेत. आठवड्यातून एकदाच बाहेरचे पदार्थ खातात. गुजराती पंकी हा त्यांचा आवडता पदार्थ आहे. हा पदार्थ तांदुळाच्या पिठाचा वापर करून तयार केला जातो. लोणचे किंवा चटणीसोबत तो अप्रतिम लागते.

उपाशी पोटी गूळ पाणी पिण्याचे फायदे अनेक; सर्दी खोकल्यापासून आराम - वजनही झरझर घटेल

मुकेश अंबानी दिवसाची सुरुवात कशी करतात?

रिपोर्टनुसार, मुकेश अंबानी पहाटे साडेपाच वाजता उठतात आणि योग- मेडीटेशन करतात. ते सूर्यनमस्कार देखील करतात.

ब्रेकफास्टमध्ये खातात हलके पदार्थ

मुकेश अंबानी यांचा नाश्ता हलका आणि पौष्टिक असतो. ज्यात ताजी फळे, रस, इडली - सांबार यांचा समावेश आहे.

आईबाबांची पावसाळ्यात घ्या जास्त काळजी, ३ गोष्टी खायला देणं टाळा! त्रासदायक आजारांचा धोका

लंच आणि डिनरमध्ये मुकेश अंबानी काय खातात?

दुपारचे जेवण असो किंवा रात्रीचे जेवण, मुकेश अंबानींचा आहार दिवसभर पारंपारिक भारतीय जेवणावर अवलंबून असते. त्यांना गुजराथी पदार्थ खायला प्रचंड आवडते. ज्यामध्ये डाळी, भाज्या, भात, सूप आणि सॅलड यांचा समावेश आहे. ते काटेकोर डाएट फॉलो करतात. जंक फूडपासून दूर राहतात. दिवसभर एनर्जेटिक राहण्यासाठी मुकेश अंबानी पौष्टीक पदार्थ आणि घरगुती पदार्थ खाण्यास पसंती देतात.

Web Title: What is Mukesh Ambani's strict diet? Nita Ambani shares details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.