Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Social Viral > लादी पुसण्याच्या पाण्यात १ चमचा मीठ मिसळा; झुरळं-पाली पळतील, वाचा फायदे

लादी पुसण्याच्या पाण्यात १ चमचा मीठ मिसळा; झुरळं-पाली पळतील, वाचा फायदे

Why You Must Add Little Salt In Mopping Water : लादी पुसण्याच्या पाण्यात चिमूटभर मीठ घातल्यानं बरेच फायदे मिळतात.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 18:07 IST2026-04-29T16:07:15+5:302026-04-29T18:07:14+5:30

Why You Must Add Little Salt In Mopping Water : लादी पुसण्याच्या पाण्यात चिमूटभर मीठ घातल्यानं बरेच फायदे मिळतात.

Why You Must Add Little Salt In Mopping Water Benefits Will Shock You | लादी पुसण्याच्या पाण्यात १ चमचा मीठ मिसळा; झुरळं-पाली पळतील, वाचा फायदे

लादी पुसण्याच्या पाण्यात १ चमचा मीठ मिसळा; झुरळं-पाली पळतील, वाचा फायदे

 घराच्या साफसफाईसाठी रोज केर काढणं आणि लादी पुसणं हे  प्रत्येकाचंच रुटीन असतं. आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी लादी पुसणं फार महत्वाचं असतं. आज आपण अशाच एका कॉमन सवयीबाबत समजून घेऊ जी सर्वच घरांमध्ये फॉलो केली जाते. यामागे काही फायदेही आहेत आणि जुन्या काळापासून लोक फॉलो करत आहेत. लादी पुसण्याच्या पाण्यात चिमूटभर मीठ घातल्यानं बरेच फायदे मिळतात. (Why You Must Add Little Salt In Mopping Water Benefits Will Shock You)

लादी पुसण्याच्या पाण्यात मीठ घालून पुसण्याचे फायदे (Adding Salt In Mopping Water Benefits)

1) बॅक्टेरिया आणि किटाणू कमी करण्यास मदत होते

पाण्यात थोडं मीठ मिसळून लादी पुसणं हे उत्तम ठरतं. यामुळे डिप क्लिनिंग होण्यास मदत होते. मीठात एंटी बॅक्टेरिअल गुण असतात. जे फरशीवरून बॅक्टेरियाज आणि किटाणू कमी करण्यास मदत  करतात. किचन फ्लोअर आणि ड्रॉईंग रूमसारखे भाग मिठाच्या पाण्यानं स्वच्छ करणं उत्तम ठरतं.

2) दुर्गंध आणि पिवळेपणा दूर होतो

अनेकदा साफ-सफाईनंतरही दुर्गंध येतो. अशा स्थितीत मिठाच्या पाण्यानं फरशी पुसल्यास डिप क्लिनिंग होते याव्यतिरिक्त पांढरे मार्बल किंवा टाईल्सवर पिवळे डाग पडले असतील तर नियमित स्वरूपात लादी पुसल्यानं पिवळेपणा दूर होण्यास मदत होते.

3) कीड आणि माश्या दूर होतात

घराच्या अंगणात माश्या, मुंग्या आणि किडे येत असतील तर उन्हाळ्याच्या दिवसांत ही समस्या वाढू शकते. म्हणून लादी पुसण्याच्या पाण्यात मीठ घाला. ज्यामुळे  कीटक आणि माश्या दूर होतील.

4) फरशीचा चिकटपणा आणि डाग कमी होतात
 
अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की साफसफाई केल्यानंतरही लादी चिकट राहते. अशावेळी तुम्ही मीठ मिसळलेल्या पाण्यानं लादी पुसली तर फरशी स्वच्छ दिसेल आणि ब्रशनं न घासता डागही निघून जातील. तुम्ही रोज मीठाचं पाणी वापरून लादी पुसू शकता.

 5) घरात पॉझिटिव्हीटी राहते

पूर्वीच्या काळी मिठाचा वापर घरात सकारात्मक ऊर्जा राहण्यासाठी केला जायचा. पण घर स्वच्छ, फ्रेश ठेवण्यासाठी घरात नेहमीच लादी पुसण्याच्या चिमूटभर मीठ घालायला हवं.

Web Title : पोंछे के पानी में नमक डालें; कीड़े दूर, ये फायदे पाएं!

Web Summary : पोंछे के पानी में नमक मिलाने से बैक्टीरिया, दुर्गंध और चिपचिपाहट दूर होती है। यह कीड़ों को दूर भगाता है और टाइल्स पर लगे दागों को हल्का करता है। नमक सकारात्मकता लाता है।

Web Title : Add salt to mopping water; repel pests, get these benefits!

Web Summary : Adding salt to mopping water cleans deeply, removing bacteria, odors, and stickiness. It helps repel insects and lighten stains on tiles. Salt is believed to bring positivity.