Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Social Viral > पाण्याची बाटली उघडा, बांगड्या भरून झाकण लावून टाका! भन्नाट बँगल बॉक्स तयार, स्मार्ट देसी जुगाड

पाण्याची बाटली उघडा, बांगड्या भरून झाकण लावून टाका! भन्नाट बँगल बॉक्स तयार, स्मार्ट देसी जुगाड

Viral Video Of Making Bangle Box From Plastic Water Bottle: आता बांगड्या ठेवण्यासाठी वेगळा बँगल बॉक्स घेण्याची गरजच नाही. ही बघा एक खास आयडिया..(how to make bangle box at home?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2025 18:26 IST2025-06-10T16:28:47+5:302025-06-10T18:26:03+5:30

Viral Video Of Making Bangle Box From Plastic Water Bottle: आता बांगड्या ठेवण्यासाठी वेगळा बँगल बॉक्स घेण्याची गरजच नाही. ही बघा एक खास आयडिया..(how to make bangle box at home?)

viral video of making bangle box from plastic water bottle, how to make bangle box at home | पाण्याची बाटली उघडा, बांगड्या भरून झाकण लावून टाका! भन्नाट बँगल बॉक्स तयार, स्मार्ट देसी जुगाड

पाण्याची बाटली उघडा, बांगड्या भरून झाकण लावून टाका! भन्नाट बँगल बॉक्स तयार, स्मार्ट देसी जुगाड

Highlightsसध्या तुफान व्हायरल असलेला हा प्रयोग एकदा करून पाहाच.. 

डोकं लावून कोण काय कल्पनाशक्ती वापरेल आणि त्यापासून काय काय वस्तू तयार करेल काहीच सांगता येत नाही. आता हेच पाहा ना प्रत्येकीकडे कित्येक डझन बांगड्या असतात. त्या बांगड्या ठेवण्यासाठी आपण किमान १०० - १५० रुपये खर्च करून बँंगल बॉक्स आणतो. शिवाय एकाच बॉक्समध्ये सगळ्या बांगड्या बसतीलच असं नाही. त्यासाठी मग एकापेक्षा जास्त बॉक्सही लागतात आणि आपले तेवढे पैसे खर्च हाेतात (how to make bangle box at home?). म्हणूनच आता सध्या सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत असलेला हा एक व्हिडिओ पाहाच.. यामध्ये पाण्याच्या टाकाऊ बाटल्या वापरून घरच्याघरी बँगल बॉक्स कसा तयार करायचा याची मस्त माहिती दिली आहे.(viral video of making bangle box from plastic water bottle)

 

घरच्याघरी बँगल बॉक्स कसा तयार करावा?

पाण्याच्या रिकाम्या झालेल्या बाटल्या वापरून बँगल बॉक्स कसा तयार करायचा, याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ manjucreativeworld12 या इंस्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. अवघ्या ४ दिवसांतच हा व्हिडिओ जबरदस्त व्हायरल झाला असून त्याला कित्येक लाईक्स मिळाले आहेत.

''पोळी नको, काहीतरी वेगळं हवं..'' असं म्हणणाऱ्या मुलांना 'या' पोळ्या खाऊ घाला, आवडीने सगळ्या संपवतील..

आता तुम्हालाही व्हिडिओमध्ये सांगितलेल्या पद्धतीने बँगल बॉक्स तयार करायचा असेल तर त्यासाठी एक पाण्याची रिकामी बाटली घ्या. ती बाटली मधोमध उभी कापा. अगदी शेवटपर्यंत कापून दोन्ही भाग वेगळे करू नका. 

 

आता ती बाटली उघडा. त्यात जेवढ्या मावतील तेवढ्या बांगड्या भरून ठेवा. यानंतर बाटलीचे दोन्ही भाग पुन्हा जोडून घ्या आणि बाटलीचं झाकण लावून घ्या. बघा किती छान आयडिया आहे.

घरात भाजीच नाही? २ कांदे घेऊन 'या' पद्धतीने करा भाजी- नेहमीपेक्षा खूपच वेगळी, चवदार होईल 

यामध्ये जणूकाही आपण बांगड्या बाटलीमध्येच भरून ठेवतो आहोत असं दिसतं. शिवाय बांगड्या व्यवस्थित झाकून राहात असल्याने त्यांच्यावर धूळ, घाण बसण्याचंही टेन्शन नाही. सध्या तुफान व्हायरल असलेला हा प्रयोग एकदा करून पाहाच.. 



 

Web Title: viral video of making bangle box from plastic water bottle, how to make bangle box at home