Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Social Viral > Home Made Air Freshner: महागडं रुम फ्रेशनर कशाला? फक्त १० रुपयांत करा घर सुगंधित ठेवणारं फ्रेशनर, उन्हाळ्यात घरात येणार नाही दुर्गंधी-कुबट वास

Home Made Air Freshner: महागडं रुम फ्रेशनर कशाला? फक्त १० रुपयांत करा घर सुगंधित ठेवणारं फ्रेशनर, उन्हाळ्यात घरात येणार नाही दुर्गंधी-कुबट वास

Camphor and Lemon air freshener: Stop bad smell in rooms: उन्हाळ्याच्या दिवसात घर टवटवीत ठेवण्यासाठी घरगुती एअर फ्रेशनर कसे बनवायचे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2026 18:00 IST2026-05-06T18:00:00+5:302026-05-06T18:00:02+5:30

Camphor and Lemon air freshener: Stop bad smell in rooms: उन्हाळ्याच्या दिवसात घर टवटवीत ठेवण्यासाठी घरगुती एअर फ्रेशनर कसे बनवायचे.

Homemade Air Freshener Budget friendly home fragrance Remove bad odor from home in summer Chemical free air freshener | Home Made Air Freshner: महागडं रुम फ्रेशनर कशाला? फक्त १० रुपयांत करा घर सुगंधित ठेवणारं फ्रेशनर, उन्हाळ्यात घरात येणार नाही दुर्गंधी-कुबट वास

Home Made Air Freshner: महागडं रुम फ्रेशनर कशाला? फक्त १० रुपयांत करा घर सुगंधित ठेवणारं फ्रेशनर, उन्हाळ्यात घरात येणार नाही दुर्गंधी-कुबट वास

उन्हाळा सुरु झाला की घरामध्ये अनेकदा घामाचा, ओलसरपणाचा किंवा कुबट वास येऊ लागतो. किचन किंवा बंद खोल्यांमध्ये ही समस्या जास्त प्रमाणात जाणवते. स्वच्छता केल्यानंतरही वास तसाच राहतो, ज्यामुळे वातावरण जड वाटू लागते.(Camphor and Lemon air freshener) अशा परिस्थितीत, लोक लगेच एअर फ्रेशनरचा वापर करतात, परंतु रसायने वापरणे  हा नेहमीच योग्य उपाय नसतो.  बाजारात मिळणारे महागडे एअर फ्रेशनर फक्त खिशावर भारी पडतात असं नाही, तर त्यातील कृत्रिम सुगंधामुळे अनेकांना डोकेदुखी किंवा अॅलर्जीचा त्रास होतो. पण आपल्या स्वयंपाकघरात असलेल्या अवघ्या १० रुपयांच्या वस्तूंनी आपण घर अगदी सुगंधी आणि फ्रेश ठेवू शकतो. (Stop bad smell in rooms) चला तर मग जाणून घेऊया, उन्हाळ्याच्या दिवसात घर टवटवीत ठेवण्यासाठी घरगुती एअर फ्रेशनर कसे बनवायचे.

बंगाली महिलांच्या घनदाट केसांचे सिक्रेट, महिन्याभरात केस वेगाने वाढवणाऱ्या ५ गोष्टी, केस होतील गुडघ्यापर्यंत लांब- दाट

कमी खर्चात नॅचरल एअर फ्रेशनर बनवण्याची कृती 
भीमसेन कापूर- ४ ते ५ वड्या 
लिंबू- १  
पाणी- गरजेनुसार अर्धा कप
बाऊल- एक छोटी वाटी किंवा स्प्रे बाटली

एअर फ्रेशनर कसा बनवायचा?

सगळ्यात आधी लिंबू दोन भागात कापून घ्या. आता एका भांड्यात थोडे पाणी ओता आणि त्यात कापराचे तुकडे घाला. यानंतर त्याच भांड्यात लिंबाचे तुकडेही घाला. आता ही वाटी खोलीच्या कुठल्याही एका कोपऱ्यात ठेवा. अगदी काही वेळात लिंबू आणि कापराचा सुगंध घरभर पसरेल. हवं असल्यास आपण स्प्रे बाटतील भरुन हे घरभर स्प्रे देखील करु शकतो. 

आपण हा स्प्रे स्वयंपाकघरात, बाथरुममध्ये देखील मारु शकतो. हा नॅचरल एअर फ्रेशनर बंद खोल्या आणि दमट भागांसाठी फायदेशीर आहे. सुगंध टिकवून ठेवण्यासाठी आपण हे पाणी दर २ ते ३ दिवसांनी बदलायला हवे. 

हा एअर फ्रेशनर नैसर्गिक आहे. त्यात कोणतेही हानिकारक रसायने नाहीत. यामुळे आपल्या घरातील दुर्गंधी नाहीशी होत नाही तर वातावरण अधिक फ्रेश आणि सकारात्मक होते. 


 

Web Title : DIY एयर फ्रेशनर: नींबू और कपूर से प्राकृतिक घरेलू खुशबू

Web Summary : गर्मी की दुर्गंध को एक साधारण घरेलू एयर फ्रेशनर से दूर करें। कपूर और नींबू का उपयोग करके, यह प्राकृतिक घोल कमरों, रसोई और बाथरूम को ताज़ा करता है, और बासी गंध को खत्म करता है। स्थायी, रसायन-मुक्त खुशबू के लिए हर कुछ दिनों में पानी बदलें।

Web Title : DIY Air Freshener: Natural home fragrance with lemon and camphor.

Web Summary : Beat summer odors with a simple homemade air freshener. Using camphor and lemon, this natural solution freshens rooms, kitchens, and bathrooms, eliminating musty smells. Change the water every few days for a lasting, chemical-free fragrance.