आजच्या डिजिटल युगात, प्रत्येक लहान - मोठा आनंद आणि नात्यातील खास क्षण सोशल मिडीयावर पोस्ट करणे ही जणू एक फॅशन आणि ट्रेंडच बनला आहे. आपण नेहमी पाहतो की, अनेक लोक आपल्या जोडीदारासोबतचे फोटो आणि व्हिडिओ सतत शेअर करत असतात. आपल्या आयुष्यात काय चाललंय, हे जगाला दाखवण्याची जणू स्पर्धाच लागलेली असते... हॉटेलमधील जेवण असो किंवा जोडीदारासोबत फिरायला जाणं, जोपर्यंत त्याचा फोटो फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर पोस्ट करत नाही, तोपर्यंत तो आनंद पूर्ण झाला असं अनेकांना वाटतच नाही. आपण अनेकदा पाहतो की, काही जोडपे सतत आपले 'रोमँटिक' फोटो आणि व्हिडिओ शेअर करून आपण किती सुखी आहोत हे जगाला सांगत असतात(why less posting means stronger relationship).
दिल्ली येथील पीएसआरआय (PSRI) हॉस्पिटलच्या कन्सल्टंट सायकॉलॉजिस्ट अर्पिता कोहली, यांच्या मतांनुसार, जे कपल्स सोशल मिडीयावर फारसे ॲक्टिव्ह नसतात, ते प्रत्यक्ष आयुष्यात अधिक आनंदी आणि समाधानी दिसतात... सोशल मिडियाच्या कमी प्रमाणांत वापरामुळे नात्यातील प्रायव्हसी टिकून राहते, अनावश्यक तुलना टळते (couples happiness without social media) आणि एकमेकांसोबत घालवलेला वेळ अधिक चांगला बनतो. त्यामुळेच अशा कपल्सचं नातं अधिक मजबूत आणि टिकाऊ असतं. यासाठीच सोशल मिडीयावर कमी ॲक्टिव्ह असणारे कपल्स खऱ्या आयुष्यात जास्त (benefits of low social media relationship) आनंदी का असतात, याची नेमकी कारणं कोणती आहेत ते पाहूयात.
सोशल मिडीयावर ॲक्टिव्ह नसणारे कपल्स खऱ्या आयुष्यात जास्त आनंदी असतात कारणं...
१. दिखाव्यापेक्षा तो क्षण जगण्यावर अधिक विश्वास :- खऱ्या अर्थाने सुखी असणारी जोडपी सोशल मिडीयावर आपल्या नात्याचे प्रदर्शन करण्यापेक्षा, ते नाते प्रत्यक्ष आयुष्यात जगण्यावर अधिक जास्त भर देतात. त्यांच्यासाठी सोशल मिडियावरील 'लाईक्स' आणि 'कमेंट्स' पेक्षा एकमेकांशी होणारा संवाद, एकमेकांच्या भावना समजून घेणे आणि सोबत घालवलेला वेळ जास्त मोलाचा असतो. प्रत्येक सुंदर क्षण केवळ कॅमेऱ्यात कैद करण्याच्या स्पर्धेत न पडता, तो क्षण पूर्णपणे अनुभवणे हे त्यांच्यासाठी जास्त महत्त्वाचे आहे, असे त्यांचे ठाम मत असते.
स्वयंपाकघरातील 'हे' ६ मसाले म्हणजे नॅचरल पेनकिलर! लहानमोठी दुखणी होतात घरच्याघरी बरी...
२. बाहेरच्या जगाकडून 'मान्यते'ची गरज नसते :- जी जोडपी आपल्या नात्यात पूर्णपणे सुरक्षित आणि समाधानी असतात, त्यांना जगाकडून कोणत्याही मान्यतेची किंवा कौतुकाची गरज भासत नाही. आपले नाते किती श्रेष्ठ आहे, हे त्यांना लोकांसमोर सिद्ध करण्याची अजिबात आवश्यकता वाटत नाही. त्यांचा खरा आनंद आणि समाधान त्यांच्या खाजगी आयुष्यातच दिसून येते.
उंदीर-झुरळं-पाली-मुंग्या पळतील घराबाहेर-पाहा धूप आणि कापराचा सोपा उपाय-करा कायमचा बंदोबस्त...
३. प्रायव्हसी हीच नात्यातील खरी सुंदरता :- समंजस, समजूतदार जोडप्यांसाठी प्रायव्हसी अत्यंत महत्त्वाची असते. ते आपले सुंदर आणि खास क्षण फक्त स्वतःपुरतेच मर्यादित ठेवणे पसंत करतात. नात्यातील प्रत्येक गोष्ट सार्वजनिक केल्याने त्यातील गोडवा आणि सौंदर्य कमी होऊ शकते, असे त्यांचे स्पष्ट मत असते. जेव्हा प्रेमाचे क्षण आणि वैयक्तिक भावना केवळ दोन व्यक्तींमध्ये सुरक्षित राहतात, तेव्हा त्या नात्याचे महत्त्व आणि खोली आपोआपच कित्येक पटीने वाढते.
