टराटरा वजन वाढतंय, पोट फुगतंय-अपचनाचा त्रास, ६० सेकंदात करा सोपी ५ योगासनं, रोजचा त्रासच संपेल
Updated:January 31, 2026 18:01 IST2026-01-31T15:16:01+5:302026-01-31T18:01:22+5:30

वजन सातत्याने वाढत असेल किंवा अपचन, ॲसिडीटी असे त्रास नेहमीच होत असतील तर काही याेगासनं नियमितपणे केल्यास तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो.(5 yoga poses after meal for better digestion)
ती योगासनं नेमकी कोणती आणि त्यामुळे शरीरावर काय परिणाम होतो ते पाहूया..(yoga poses to avoid indigestion)
सगळ्यात पहिलं आहे वज्रासन. तज्ज्ञ सांगतात की जेवण झाल्यानंतर ५ ते १० मिनिटे तरी पाय गुडघ्यात दुमडून वज्रासनात बसायला हवं. यामुळे पचन तर चांगलंच होतं पण गॅसेस, ॲसिडीटी असे त्रासही कमी होतात.(yogasana for better digestion)
दुसरं आहे पवन मुक्तासन. जेवण झाल्यानंतर पवन मुक्तासन केलं तरी चालतं. हे आसन केल्यास गॅसेस मोकळे होतात, पोट फुगण्याचा त्रास होत नाही आणि पचन अधिक चांगलं होतं.
जेवण झाल्यानंतर तुम्ही बालासनही करू शकता. यामुळे पोटाच्या स्नायूंवर, आतड्यांवर योग्य तो दाब पडतो आणि त्यामुळे पचन चांगलं होतं. शिवाय हे आसन केल्याने झोपही चांगली लागते. त्यामुळे ज्यांना निद्रानाशाचा त्रास आहे, त्यांनी रात्रीचं जेवण झाल्यानंतर हे आसन करावं असा सल्ला दिला जातो.
काही वेळ सुखासनात बसणेही खूप फायदेशीर ठरते. यासाठी जेवण झाल्यानंतर शांतपणे डोळे मिटून मांडी घालून बसा. यामुळे शरीराचा आणि मनावरचा ताण कमी होऊन तणावमुक्त वाटतं. त्याचा चांगला परिणाम पचनक्रियेवर होतो.
बद्धकोनासन केल्याने पेल्विक भागातील स्नायू रिलॅक्स होतात आणि पचनक्रिया अधिक चांगली होण्यासाठीही हे आसन उपयुक्त ठरते.