Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Inspirational > Bhavitha Mandava : "भारतात खूप वर्णभेद खोलवर रुजलेला"; कोण आहे ब्रिटीश व्होगच्या कव्हरवर झळकलेली भविता मांडवा?

Bhavitha Mandava : "भारतात खूप वर्णभेद खोलवर रुजलेला"; कोण आहे ब्रिटीश व्होगच्या कव्हरवर झळकलेली भविता मांडवा?

Bhavitha Mandava : फॅशन जगतातील दिग्गजांनी ब्रिटीश व्होगच्या इन्स्टाग्राम पोस्टवर भवितावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 17:08 IST2026-02-14T17:08:03+5:302026-02-14T17:08:58+5:30

Bhavitha Mandava : फॅशन जगतातील दिग्गजांनी ब्रिटीश व्होगच्या इन्स्टाग्राम पोस्टवर भवितावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

‘In India, colourism is so deep-rooted’: Bhavitha Mandava makes history as second Indian woman on British Vogue cover | Bhavitha Mandava : "भारतात खूप वर्णभेद खोलवर रुजलेला"; कोण आहे ब्रिटीश व्होगच्या कव्हरवर झळकलेली भविता मांडवा?

Bhavitha Mandava : "भारतात खूप वर्णभेद खोलवर रुजलेला"; कोण आहे ब्रिटीश व्होगच्या कव्हरवर झळकलेली भविता मांडवा?

डिसेंबरमध्ये न्यूयॉर्कमध्ये झालेल्या 'शॅनेल मेटियर्स डी आर्ट' शोची सुरुवात करणारी पहिली भारतीय मॉडेल म्हणून इतिहास रचल्यानंतर भविता मांडवा आता मार्च २०२६ च्या 'ब्रिटीश व्होग' (British Vogue) मॅगझीनच्या कव्हरवर झळकण्यासाठी सज्ज झाली आहे. जानेवारी २०२३ मध्ये प्रियंका चोप्रानंतर हे मानाचं स्थान मिळवणारी भविता ही दुसरी भारतीय महिला ठरली आहे.

गडद निळ्या पार्श्वभूमीवर, भविता केशरी, पिवळ्या आणि तपकिरी रंगाच्या 'फेदरी जॅकेट' आणि स्कर्टमध्ये अत्यंत तेजस्वी दिसत होती. वाऱ्यावर उडणारे दाट केस आणि ओठांवर एक मोठं हास्य अशा रूपात कॅमेऱ्यासमोर आत्मविश्वासाने उभ्या असलेल्या भविताने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. फॅशन जगतातील दिग्गजांनी ब्रिटीश व्होगच्या इन्स्टाग्राम पोस्टवर भवितावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

मॅगझीनला दिलेल्या मुलाखतीत भविताने तो अनुभव सांगितला ज्याने तिला एका मोठ्या सांस्कृतिक वादाच्या केंद्रस्थानी आणलं. ती म्हणाली, "शॅनेल शोची सुरुवात करणं ही माझ्यासाठी वैयक्तिक बाब होती, पण अचानक त्याला अपेक्षित नसलेलं एक प्रतिकात्मक स्वरूप प्राप्त झालं. पाश्चात्य देशांमध्ये सौंदर्याच्या संकल्पनेत कोणाला स्थान दिलं जातं आणि भारतीय महिलांना पारंपारिक अर्थाने सुंदर मानलं जातं का असा प्रश्न यातून निर्माण झाला."


आपल्या देशातील वर्णभेदाच्या इतिहासावर भाष्य करताना ती पुढे म्हणाली, "भारतात वर्णभेद खूप खोलवर रुजलेला आहे. मी 'रस्त्यावरील कोणत्याही सामान्य मुलीसारखी' दिसते असं अनेकांनी म्हटलं कारण तिथे गोरा रंग हेच सौंदर्याचे प्रमाण मानलं जाते. मला असं वाटतं की हे माझ्याबद्दल नसून आपली संस्कृती स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करत आहे."

कोण आहे भविता मांडवा?

हैदराबादमधील जवाहरलाल नेहरू टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीची आर्किटेक्चरची विद्यार्थिनी असलेल्या भविताने न्यूयॉर्क विद्यापीठातून (NYU) आपलं पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करण्यासाठी न्यूयॉर्क गाठलं. २०२५ मध्ये पदवी पूर्ण होण्यापूर्वीच दोन वर्षांपूर्वी अटलांटिक एव्हेन्यू सबवे स्टेशनवर ट्रेनची वाट पाहत असताना तिला बोटेगा वेनेटाच्या स्प्रिंग/समर २०२५ शोसाठी निवडण्यात आलं. जेव्हा कला दिग्दर्शक मॅथ्यू ब्लेझी शॅनेलमध्ये गेले, तेव्हा भवितानेही त्यांच्यासोबत काम करत डिसेंबरमध्ये मेटियर्स डी आर्ट शोची सुरुवात केली आणि जानेवारी २०२६ मध्ये पॅरिस कुतूर वीक मधील त्यांच्या पहिल्या शोचा समारोप केला.

भविताच्या आधी मलाला युसुफझाई, प्रियंका चोप्रा जोनास, जमीला जमील, सॅफ्रॉन वढेर आणि सिमोन ॲशली यांसारख्या दिग्गज महिला या मॅगझीनच्या कव्हरवर झळकल्या आहेत. अनेक भारतीय मॉडेल्सनी गेल्या काही वर्षांत देशाची मान अभिमानाने उंचावली आहे, परंतु भविताचे हे 'सोलो फिचर' ऐतिहासिक मानलं जात आहे. कारण ती सध्या फॅशन उद्योगातील सौंदर्याची मानकं बदलणाऱ्या एका मोठ्या सांस्कृतिक बदलाचा चेहरा बनली आहे.
 

Web Title : भविता मांडवा: ब्रिटिश वोग कवर स्टार, भारतीय सौंदर्य मानकों को चुनौती।

Web Summary : प्रियंका चोपड़ा के बाद ब्रिटिश वोग के कवर पर आने वाली दूसरी भारतीय महिला भविता मांडवा सौंदर्य मानकों को चुनौती दे रही हैं। आर्किटेक्चर की छात्रा से मॉडल बनीं भविता ने चैनल के शो की शुरुआत कर सांस्कृतिक बहस छेड़ दी, जिसमें भारत में गहरे रंगभेद को उजागर किया गया।

Web Title : Bhavita Mandava: British Vogue cover star challenges Indian beauty standards.

Web Summary : Bhavita Mandava, the second Indian woman after Priyanka Chopra to grace British Vogue's cover, is challenging conventional beauty standards. The architecture student-turned-model sparked cultural debate after opening Chanel's show, highlighting deep-rooted colorism in India and advocating for change in beauty perceptions.