मधुमेह किंवा हाय शुगरची समस्या असली की, आपला पहिला प्रयत्न असतो तो म्हणजे बाहेरचं खाणं बंद करणं. हॉटेलमधील तेलकट पदार्थ, जंक फूड आणि पाकीटबंद खाद्यपदार्थ खाणं टाळून, आपण घरच्या साध्या जेवणालाच प्राधान्य देतो. घरामध्ये कमी तेलात बनवलेली चपाती - भाजी किंवा वरण - भात हे आरोग्यासाठी उत्तमच मानले जातात. मात्र, अनेकांच्या बाबतीत असे दिसून येते की, एवढं पथ्य पाळून आणि फक्त घरचेचं अन्नपदार्थ खाऊनही त्यांची रक्तातील साखरेची पातळी अपेक्षेप्रमाणे नियंत्रणात राहात नाही(why sugar level increases after home cooked food).
जेव्हा घरचे सकस, पौष्टिक आणि संतुलित आहार घेऊनही शुगर वाढलेली असते, तेव्हा साहजिकच मनात भीती आणि संभ्रम निर्माण होतो. "मी तर सगळं घरचंच खातोय, वेळच्यावेळीच पथ्य पाळतोय, मग शुगर का वाढतेय?" हा प्रश्न अनेक मधुमेहींना सतावत असतो. याचे मुख्य कारण म्हणजे आपण 'काय खातोय' यासोबतच 'ते किती प्रमाणात आणि कोणत्या (reasons for high blood sugar levels) पद्धतीने खातोय' याकडे आपले दुर्लक्ष होते. खरंतर, फक्त घरचं अन्न खाणं पुरेसं नसून ते कसं, किती आणि कधी खाल्लं जातं यावरही शुगर कंट्रोल अवलंबून असतो. काही छोट्या पण महत्त्वाच्या सवयी आणि चुका (blood sugar control tips at home) आपल्या लक्षात न आल्यामुळे शुगर लेव्हल वाढू शकते. जे घरचं अन्न खाऊनही तुमची शुगर वाढवत आहेत आणि सोबतच त्यावर कोणते सोपे घरगुती उपाय करता येतील ते पाहूयात.
घरचा आहार असूनही शुगर वाढतेय? त्यामागची ३ छुपी कारणं आणि उपाय...
१. सकाळच्या चहा / कॉफीतून मिळणारे IGF मॉलिक्युल :- IGF म्हणजेच 'इन्सुलिन लाईक ग्रोथ फॅक्टर' (Insulin Like Growth Factor). हे दूध आणि दुधापासून बनवलेल्या पदार्थांमध्ये आढळणारे एक मॉलिक्युल आहे. हे इन्सुलिनच्या जागी जाऊन चिकटते कारण ते हुबेहूब इन्सुलिनसारखेच असते. हे इन्सुलिनला नीट काम करू देत नाही, ज्या कारणामुळे शुगर लेव्हल वेगाने वाढू लागते. यावर उपाय म्हणून डॉक्टर असा सल्ला देतात की, रोज सकाळी तुम्ही जो चहा किंवा कॉफी घेता, त्यातून गाईचे दूध पूर्णपणे काढून टाका. याऐवजी तुम्ही नारळाचे दूध किंवा बदामाचे दूध वापरू शकता. हा छोटासा बदल करताच तुमची शुगर लेव्हल नियंत्रणात राहण्यास सुरुवात होते.
२. नाश्ता आणि दुपारच्या जेवणामुळे होते शुगर स्पाईक :- शुगर वाढण्याचे दुसरे मोठे कारण म्हणजे आपला सकाळचा नाश्ता आणि दुपारचे जेवण. सामान्यतः आपल्या नाश्त्यामध्ये पोहे, इडली, उपमा, पराठे किंवा डोसा यांसारख्या पदार्थांचा समावेश असतो, तर लंचमध्ये पोळी किंवा भात असतो. या सर्व पदार्थांमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण सर्वाधिक असते. हेच कारण आहे की हे पदार्थ खाल्ल्यानंतर शुगर स्पाईक देखील वेगाने होते. डॉ. प्रमोद त्रिपाठी म्हणतात की, सकाळी नाश्त्यामध्ये धान्याचे प्रमाण कमी करा आणि त्याऐवजी डाळ आणि डाळीपासून बनवलेले पदार्थ नाश्त्यात समाविष्ट करा. जसे की मूग डाळ, ढोकळा, धिरडे अप्पे इत्यादी. तसेच लंच आणि डिनरमध्ये तुम्ही '२५% चा नियम' फॉलो करू शकता. म्हणजेच तुम्ही भात किंवा पोळी यांसारखे जे काही धान्य घेत आहात, त्याचे प्रमाण एकूण जेवणाच्या तुलनेत फक्त २५ टक्केच ठेवावे.
स्वयंपाकघरातील 'हे' ६ मसाले म्हणजे नॅचरल पेनकिलर! लहानमोठी दुखणी होतात घरच्याघरी बरी...
३. अंदाजे तेलातुपाचा वापर करणे :- ही समस्या बहुतांश घरांमध्ये आहे. आपण जेवण बनवताना अंदाजाने तूप किंवा तेलाचा वापर करतो आणि अनेकदा तर हा वापर खूप जास्त होतो. ढोबळमानाने अंदाज लावला तर, एक व्यक्ती दररोज ६ ते ७ चमचे तेल किंवा तूप अन्नपदार्थांच्या माध्यमांतून शरीरात घेते. इतके तेल आपले यकृत पचवू शकत नाही आणि ते हळूहळू 'फॅटी' होऊ लागते, सोबतच शरीरात ग्लुकोज देखील जास्त प्रमाणात तयार होऊ लागते. म्हणजेच फॅटी लिव्हरसोबतच शुगर स्पाईक देखील वेगाने होतो. यावर उपाय म्हणून डॉक्टर असा सल्ला देतात की, आपल्या रोजच्या जेवणातील तेलातुपाचे प्रमाण कमी करावे. रोजच्या जेवणात तेलाचे प्रमाण दोन चमच्यांपेक्षा कमी असावे. हेच मुख्य कारण आहे की, आज प्रत्येक घरोघरी हृदयविकाराचे रुग्ण आणि डायबिटीस पेशंट इतक्या मोठ्या संख्येने वाढत आहेत.
