Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > आंघोळ करताना लघवी झाल्याने इन्फेक्शनचा धोका? पर्सनल हायजिन न सांभाळल्याने वाढतात आजार

आंघोळ करताना लघवी झाल्याने इन्फेक्शनचा धोका? पर्सनल हायजिन न सांभाळल्याने वाढतात आजार

Urinary Health Tips : पर्सनल हायजिनसंदर्भात आपल्याकडे प्रचंड अज्ञान असल्यानेही इन्फेक्शनचा धोका वाढतो.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 12:37 IST2026-05-08T11:47:27+5:302026-05-08T12:37:10+5:30

Urinary Health Tips : पर्सनल हायजिनसंदर्भात आपल्याकडे प्रचंड अज्ञान असल्यानेही इन्फेक्शनचा धोका वाढतो.

Urinary Health Tips : Is it normal to pee while having a shower | आंघोळ करताना लघवी झाल्याने इन्फेक्शनचा धोका? पर्सनल हायजिन न सांभाळल्याने वाढतात आजार

आंघोळ करताना लघवी झाल्याने इन्फेक्शनचा धोका? पर्सनल हायजिन न सांभाळल्याने वाढतात आजार

Urinary Health Tips : आंघोळ करणं हा आपला रोजचा सवयीचा भाग आहे. शरीर स्वच्छ ठेवण्यासाठी, दिवसभराचा थकवा, आळस दूर करण्यासाठी आंघोळ करणं फार आवश्यक असतं. आपल्याला अनेकदा जाणवलं असेल की, आंघोळ करताना किंवा शॉवर घेताना लघवी येते. शरीर जेव्हा पाण्याच्या संपर्कात येतं तेव्हा असं होतं. बऱ्याच लोकांना असं करणं चांगलंही वाटतं. पण अशा पद्धतीने लघवी करताना एक छोटीशी चूक केली तर पेल्विक फ्लोरमध्ये म्हणजेच ओटीपोटात समस्या होऊ शकते. एक्सपर्ट सांगतात की, शॉवर घेत असताना लघवी करणं काही घातक नसतं. पण याने आरोग्यासंबंधी काही समस्याही होऊ शकतात. 

अनेकांना असं वाटतं की, लघवी पूर्णपणे साफ आणि कीटाणुरहित असते. पण असं नाहीये.  जर एखाद्याला यूरिन इन्फेक्शन किंवा दुसरी काही समस्या असेल, लघवीमध्ये नुकसानकारक बॅक्टेरिया होतात. किडनी रक्त फिल्टर करून शरीरातील विषारी तत्व आणि अतिरिक्त पाणी बाहेर काढतात. जास्तकरून पाणी असतं. पण सोबतच यात यूरिया, अमोनिया, क्रिएटिनिन आणि इतरही अपिशिष्ट पदार्थ असतात.  

इन्फेक्शनचा धोका

जर कुणी शॉवर घेत असताना लघवी करत असेल, तर आपल्या खाजगी बाथरूममध्ये असं करावं. कॉमन बाथरूममध्ये असं केलं तर इन्फेक्शन पसरण्याचा धोका खूप असतो. जर एखाद्या व्यक्तीला यूटीआय इन्फेक्शन असेल, तर लघवीतील बॅक्टेरिया दुसऱ्या लोकांपर्यंत पोहोचू शकतात. यूटीआय झाल्यावर लघवी करताना जळजळ, दुर्गंधी, पुन्हा पुन्हा लघवी लागणे अशा समस्या होतात. जर वेळीच उपचार घेतले नाही तर इन्फेक्शन किडनीपर्यंत पोहोचू शकतं. 

त्याशिवाय काही बॅक्टेरिया जसे की, एमआरएसए ओल्या जागेवर जास्त काळ जिवंत राहतात. असे बॅक्टेरिया शॉवर फ्लोरवर पसरून इन्फेक्शनचा धोका वाढू शकतो. त्यामुळे स्वच्छता आणि हायजीनची काळजी घेणं फार गरजेचं आहे.

खालच्या भागात कमजोरी

उभे राहून किंवा अर्धे बसलेल्या स्थितीत लघवी केल्याने पेल्विक फ्लोरच्या स्नायूंवर दबाव पडतो. पेल्विक फ्लोर हा शरीराचा असा भाग आहे जो ब्लॅडर, आतडी, यूरिन पाइप आणि महिलांमध्ये गर्भाशय व प्रायव्हेट पार्टला आधार देतो. जेव्हा व्यक्ती आरामदायक स्थितीमध्ये बसून लघवी करत नाही, तेव्हा ब्लॅडर पूर्णपणे रिकामं होत नाही. अशात हळूहळू पेल्विक फ्लोर कमजोर होऊ शकतो.

पेल्किव फ्लोर कमजोर झाल्याने भविष्यात यूरिन कंट्रोल करण्यात अडचण येऊ शकते. या स्थितीला यूरिनरी इन्कॉन्टिनेन्स म्हटलं जातं, ज्यात लघवी अचानक आल्याची इच्छा होते किंवा लघवी लीक होते. ही समस्या पुरूषांमध्येही होते, पण महिलांमध्ये ही समस्या वय वाढल्यावर, गर्भावस्था किंवा स्नायू कमजोर झाल्याने अधिक वाढते.

Web Title : शावर में पेशाब करना: आम, लेकिन अस्वस्थकर; संभावित खतरे जानें।

Web Summary : शावर में पेशाब करना हानिरहित लग सकता है, लेकिन स्वास्थ्य जोखिम पैदा कर सकता है। यह साझा बाथरूम में संक्रमण फैला सकता है और पेल्विक फ्लोर की मांसपेशियों को कमजोर कर सकता है, जिससे मूत्र असंयम हो सकता है। स्वच्छता बनाए रखना महत्वपूर्ण है।

Web Title : Peeing in shower: Common, but unhealthy; know potential risks.

Web Summary : Urinating in the shower, while seemingly harmless, can pose health risks. It may spread infections in shared bathrooms and weaken pelvic floor muscles, potentially leading to urinary incontinence. Maintaining hygiene is crucial.