Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > उन्हाळ्यात पचायला फार जड असणारे पदार्थ, टाळाल तर फायद्यात रहाल; पाहा शरीर थंड ठेवण्यास काय खावे...

उन्हाळ्यात पचायला फार जड असणारे पदार्थ, टाळाल तर फायद्यात रहाल; पाहा शरीर थंड ठेवण्यास काय खावे...

Slow Digesting Foods: उन्हाळ्यात आपल्याकडून अशा काही चुका होतात, ज्यामुळे तब्येतीत आणखी बिघाड होतो. या दिवसात असे काही पदार्थ असतात जे पचन होण्यास फार वेळ लागतो.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 11:05 IST2026-04-30T11:04:04+5:302026-04-30T11:05:21+5:30

Slow Digesting Foods: उन्हाळ्यात आपल्याकडून अशा काही चुका होतात, ज्यामुळे तब्येतीत आणखी बिघाड होतो. या दिवसात असे काही पदार्थ असतात जे पचन होण्यास फार वेळ लागतो.

These food items are very hard to digest summer days | उन्हाळ्यात पचायला फार जड असणारे पदार्थ, टाळाल तर फायद्यात रहाल; पाहा शरीर थंड ठेवण्यास काय खावे...

उन्हाळ्यात पचायला फार जड असणारे पदार्थ, टाळाल तर फायद्यात रहाल; पाहा शरीर थंड ठेवण्यास काय खावे...

Slow Digesting Foods:  तापमान वाढलं की, शरीरही प्रभावित होऊ लागतं. म्हणजे शरीराचं देखील तापमान वाढतं आणि याचा प्रभाव पचन तंत्रावर पडतो. पचनक्रिया हळुवार होते. इतकंच नाही तर या दिवसांमध्ये उष्णतेमुळे भूक कमी लागते. यात भर म्हणजे आपल्याकडून अशा काही चुका होतात, ज्यामुळे तब्येतीत आणखी बिघाड होतो. या दिवसात असे काही पदार्थ असतात जे पचन होण्यास फार वेळ लागतो. ज्यामुळे गॅस, अॅसिडिटीचा त्रास होतो. तसेच पोटावर अतिरिक्त दबावही पडतो. त्यामुळे या दिवसांमध्ये कोणते पदार्थ आपण टाळले पाहिजे हे पाहुयात, जेणेकरून तब्येत बिघडू नये.

तळलेले - भाजलेले पदार्थ

रोज तळलेले पदार्थ जसे की, समोसे, कचोरी, वडे, भजी खाण्याची अनेकांना सवय असते. पण हे पदार्थ पचन तंत्रासाठी फारच जड ठरतात. या पदार्थांमध्ये जास्त तेल आणि फॅट असतं, जे पचन करण्यास शरीराला जास्त मेहनत करावी लागते. जर तब्येत बिघडू द्यायची नसेल तर याऐवजी आपण हलके आणि लवकर पचन होणारे पदार्थ जसे की, उकडलेल्या भाज्या, ताजी फळं, कडधान्य खाऊ शकता. यातून शरीराला ऊर्जाही मिळते आणि पचनही सुधारतं.

लाल मांस

लाल मांस म्हणजे मटणामध्ये प्रोटीन आणि फॅट जास्त प्रमाणात असतं, जे पचन करायला शरीरात जास्त वेळही लागतो आणि जास्त ऊर्जाही लागते. उन्हाळ्यात जर मांस जास्त खात असेल तर पोट जड वाटू शकतं आणि सुस्तीही जास्त येऊ शकते.

जास्त मसालेदार जेवण

जास्त तिखट आणि मसालेदार जेवण करणं उन्हाळ्यात त्रासदायक ठरू शकतं. यामुळे शरीराचं तापमान तर वाढतंच, सोबतच पोटात जळजळ, अॅसिडिटी आणि पचनासंबंधी समस्या वाढू शकतात. या दिवसांमध्ये गरम किंवा जड मसाल्यांऐवजी हलकं मसाले जसे की, जिरे, धणे आणि हळद असलेलं जेवण चांगलं मानलं जातं. घरचं साधं आणि संतुलित जेवण पचनास चांगलं असतं.

जड डेअरी प्रॉडक्ट्स

फुल क्रीम दूध, चीज आणि इतर डेअरी प्रॉडक्ट्स उन्हाळ्यात पचायला जड असतात. या गोष्टींमुळे शरीरात जडपणा जाणवतो. काही लोकांमुळे यामुळे गॅस किंवा अपचनाची समस्या होऊ शकते. त्याऐवजी थंड दही, छाछ आणि लो फॅट असलेलं दूध घ्याल तर शरीर थंड राहणार.

जंक फूड आणि प्रोसेस्ड फूड

जंक फूड आणि प्रोसेस्ड फूड खाण्याचा ट्रेंड हल्ली खूप वाढलाय. बर्गर, पिझ्झा आणि पॅकेज्ड फूड मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात. हे पदार्थ पचायला तर जड असतातच, सोबतच शरीरात विषारी तत्वही वाढवतात. त्याऐवजी ताजी फळं, सलाद आणि घरचं हलकं जेवण चांगला पर्याय ठरेल. 

Web Title : गर्मी में पाचन के लिए भारी भोजन से बचें, सेहतमंद रहें।

Web Summary : गर्मी में भारी, तला हुआ और मसालेदार भोजन, लाल मांस और फुल-फैट डेयरी पचाने में मुश्किल होते हैं। ठंडा और स्वस्थ रहने के लिए फल, सब्जियां और दही जैसे हल्के, ताज़े भोजन चुनें।

Web Title : Avoid these foods in summer for better digestion and health.

Web Summary : Heavy, fried, and spicy foods, along with red meat and full-fat dairy, are difficult to digest in summer. Opt for light, fresh foods like fruits, vegetables, and yogurt to stay cool and healthy.