Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > जेवताना फक्त १ चमचा ही चटणी खा; युरिक ॲसिड कमी करणारा एक सोपा घरगुती उपाय

जेवताना फक्त १ चमचा ही चटणी खा; युरिक ॲसिड कमी करणारा एक सोपा घरगुती उपाय

Chutney To Reduce High Uric Acid : भारतीयांच्या आहारात पूर्वीपासूनच वेगवेगळ्या चटण्यांचा समावेश असतो. या चटण्यांचा आहारात समावेश करून तुम्ही निरोगी-फिट जीवन मिळवू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 19:07 IST2026-02-26T12:34:18+5:302026-02-26T19:07:01+5:30

Chutney To Reduce High Uric Acid : भारतीयांच्या आहारात पूर्वीपासूनच वेगवेगळ्या चटण्यांचा समावेश असतो. या चटण्यांचा आहारात समावेश करून तुम्ही निरोगी-फिट जीवन मिळवू शकता.

Home Remedy For Uric Acid Chutney To Reduce High Uric Acid Know How To Make It | जेवताना फक्त १ चमचा ही चटणी खा; युरिक ॲसिड कमी करणारा एक सोपा घरगुती उपाय

जेवताना फक्त १ चमचा ही चटणी खा; युरिक ॲसिड कमी करणारा एक सोपा घरगुती उपाय

शरीरात युरीक एसिड (Uric Acid) वाढण्याची समस्या आजकाल अनेकांना उद्भवते. बरेच लोक या समस्येनं ग्रासलेले आहेत.  युरिक एसिड वाढल्यानंतर सांध्यांमध्ये वेदना जाणवतात ज्यामुळे चालण्याफिरण्यात अडचणी येऊ शकतात. तुमच्याही शरीरात युरिक एसिडचं प्रमाण वाढलं असेल तर आहारात एका पदार्थाचा समावेश करून तुम्ही वाढलेलं युरिक एसिड नियंत्रणात ठेवू शकता. जास्त प्रमाणात प्रोटीन खाणं,  सतत उपवास करणं यामुळेही युरीक एसिड वाढू शकतं. (Home Remedy For Uric Acid Chutney To Reduce High Uric Acid) 

भारतीयांच्या आहारात पूर्वीपासूनच वेगवेगळ्या चटण्यांचा समावेश असतो. या चटण्यांचा आहारात समावेश करून तुम्ही निरोगी-फिट जीवन मिळवू शकता. एका विशिष्ट प्रकारची चटणी रोजच्या जेवणात खाल्ल्यानं तुमचं वाढलेलं युरिक एसिड कमी होऊ शकतं. ही पौष्टीक, गुणकारी चटणी कोणती ते पाहू. (Eat These Chutney For Uric Acid Control)

ही गुणकारी चटणी कशी करायची?

ही चटणी करण्यासाठी तुम्हाला धण्याची पानं, पुदीन्याची पानं, तुळशीची पानं आणि कडुलिंबाची पानं या पदार्थांची गरज लागेल. सगळ्यात आधी ही पानं व्यवस्थित धुवून घ्या. त्यानंतर  व्यवस्थित चिरून त्यात हिरवी मिरची, आलं, लसूण व्यवस्थित बारीक चिरून घाला नंतर ब्लेंडरमध्ये बारीक करून घ्या. त्यानंतर त्यात लिंबाचा रस आणि मीठसुद्धा घाला.

रश्मिका मंदाना चेहऱ्याला असं लावते तरी काय? पाहा, तिच्या तेजस्वी-तजेलदार चेहऱ्याचं गुपीत...

ही चटणी तयार झाल्यानंतर रोजच्या आहारात या चटणीचा समावेश करू शकता. दही किंवा सॅलेडसोबतही तुम्ही हे खाऊ शकता. ही चटणी खाल्ल्यानं तुम्हाला काही दिवसांत फरक जाणवलेला दिसेल. ही चटणी खाल्ल्यानं युरीक एसिड लेव्हल कमी होण्यासोबतच गुडघेदुखी, सूज येणं या समस्यांपासूनही आराम मिळेल आणि पचनक्रिय चांगली राहण्यास मदत होईल. 

धाग्यासारखे पांढरे केस चमकतात? सुकलेला आवळा 'या' पद्धतीनं लावा; काळेभोर होतील केस

पुदिन्याच्या चटणीनं युरीक एसिड कंट्रोल होते

 पुदिना एक औषधी गुणांनी परिपूर्ण असलेला पदार्थ आहे. ज्यामुळे वाढलेलं युरीक एसिड कमी होण्यास मदत होते. यात आयर्न, पोटॅशियम, मॅग्ननीजचे प्रमाण भरपूर असते. याशिवाय यात व्हिटामीन ए, फॉलेट हे पदार्थही असतात. पुदिन्याच्या चटणीचे नियमित सेवन केल्यानं शरीरातील प्युरीनचं प्रमाण नियंत्रणात राहते.  यातील डिटॉक्सिफाईंग गुण शरीरातील टॉक्सिन्स पदार्थ बाहेर काढतात ज्यामुळे सांधेदुखी आणि सूज कमी होण्यास मदत होते.

Web Title : यूरिक एसिड को प्रभावी ढंग से निकालने के लिए रोज खाएं यह चटनी।

Web Summary : उच्च यूरिक एसिड जोड़ों के दर्द का कारण बनता है। धनिया, पुदीना, तुलसी, नीम के पत्ते, अदरक, लहसुन, हरी मिर्च, नींबू और नमक की यह चटनी यूरिक एसिड को नियंत्रित करने, घुटने के दर्द, सूजन को कम करने और पाचन में सुधार करने में मदद करती है। पुदीना शरीर को डिटॉक्सिफाई करने और सूजन को कम करने में मदद करता है।

Web Title : Eat this chutney daily to flush out uric acid effectively.

Web Summary : High uric acid causes joint pain. This chutney of coriander, mint, basil, neem leaves, ginger, garlic, green chilli, lemon and salt helps control uric acid, reduces knee pain, swelling and improves digestion. Mint helps detoxify body and reduces inflammation.