Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > वास आवडत नाही म्हणून नाक मुरडू नका, गायीचं तूप म्हणजे वरदान! १ चमचा जादू घरोघर

वास आवडत नाही म्हणून नाक मुरडू नका, गायीचं तूप म्हणजे वरदान! १ चमचा जादू घरोघर

Health care tips , home remedies , use cow's ghee everyday , good for skin and health : गायीचे तूप म्हणजे आरोग्यासाठी वरदानच.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2026 14:01 IST2026-05-06T13:59:13+5:302026-05-06T14:01:18+5:30

Health care tips , home remedies , use cow's ghee everyday , good for skin and health : गायीचे तूप म्हणजे आरोग्यासाठी वरदानच.

Health care tips , home remedies , use cow's ghee everyday , good for skin and health | वास आवडत नाही म्हणून नाक मुरडू नका, गायीचं तूप म्हणजे वरदान! १ चमचा जादू घरोघर

वास आवडत नाही म्हणून नाक मुरडू नका, गायीचं तूप म्हणजे वरदान! १ चमचा जादू घरोघर

गायीचे तूप हे भारतीय घराघरात वापरला जाणारा एक पारंपरिक आणि अत्यंत गुणकारी घटक आहे. आयुर्वेदात तर त्याला विशेष महत्त्व दिले गेले आहे. शरीराला पोषण देण्यापासून ते त्वचेची काळजी घेण्यापर्यंत गायीच्या तुपाचे अनेक फायदे आहेत. (Health care tips , home remedies , use cow's ghee everyday , good for skin and health )आजकाल मात्र त्याचा वापर फार कमी झाला. वासच येतो , चिकटच आहे असं म्हणून अनेक जण कान मुरडतात. पण गायीचे तूप वारण्याचा (मालिश करण्याचा) एक मोठा फायदा म्हणजे शरीराला मिळणारी खोलवरची विश्रांती. तूप अनेक गुणधर्मांनी भरलेले असल्यामुळे ते स्नायूंमध्ये शिरुन ताण कमी करण्यास मदत करते. तुपाने नियमित मालीश केल्यास शरीरातील कोरडेपणा कमी होतो आणि त्वचा मऊ, लवचिक राहते. विशेषतः थकवा, अंगदुखी किंवा सांधेदुखी असेल तर तूप वापरल्याने आराम मिळू शकतो.

त्वचेसाठी गायीचे तूप खूपच उपयुक्त मानले जाते. त्यामध्ये नैसर्गिक मॉइश्चरायझिंग गुणधर्म असतात. कोरडी, रापलेली त्वचा मऊ करण्यासाठी तूप खूप प्रभावी ठरते. चेहर्‍यावर थोड्या प्रमाणात तूप लावल्यास त्वचेचा ग्लो वाढतो आणि सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. ओठ फुटले असतील तर तूप लावल्याने ते लवकर बरे होतात. पायाच्या तळव्याला गायीचे तूप लावणे हा एक सोपा पण खूप फायदेशीर उपाय आहे. रात्री झोपण्यापूर्वी तळव्याला तूप लावल्यास शरीरातील उष्णता संतुलित राहते आणि चांगली झोप लागण्यास मदत होते. डोळ्यांची जळजळ, डोळ्यांचा थकवा कमी होण्यासही याचा उपयोग होतो. तसेच पायातील कोरडेपणा, भेगा यावरही तूप उपयुक्त ठरते.

आहारात गायीचे तूप असणेही तितकेच महत्त्वाचे आहे. योग्य प्रमाणात तूप खाल्ल्यास पचन सुधारते, शरीराला ऊर्जा मिळते आणि मेंदूचे कार्य चांगले राहते. तुपामध्ये चांगले फॅट्स असल्यामुळे ते शरीराला आवश्यक पोषण देते. लहान मुलांच्या वाढीसाठी आणि वयोवृद्धांच्या आरोग्यासाठीही तूप उपयुक्त आहे. एकंदरीत, गायीचे तूप हे केवळ स्वयंपाकातील घटक नसून संपूर्ण आरोग्य सांभाळणारा नैसर्गिक उपाय आहे. मात्र, कोणतीही गोष्ट मर्यादेत वापरणे महत्त्वाचे असल्यामुळे तूपही प्रमाणातच वापरावे.

Web Title : घी से मुंह न मोड़ें: गाय का घी सेहत के लिए वरदान!

Web Summary : आयुर्वेद में पूजनीय गाय का घी शरीर और त्वचा को पोषण देता है। इससे मालिश करने से मांसपेशियों का तनाव, सूखापन और जोड़ों का दर्द दूर होता है। यह त्वचा को मॉइस्चराइज़ करता है, झुर्रियाँ कम करता है, फटे होंठों को ठीक करता है और नींद में सुधार करता है। घी खाने से पाचन में मदद मिलती है, ऊर्जा बढ़ती है और मस्तिष्क के कार्य को समर्थन मिलता है, जो इसे एक समग्र स्वास्थ्य समाधान बनाता है।

Web Title : Don't Shun Ghee: Cow Ghee is a Boon for Health!

Web Summary : Cow ghee, revered in Ayurveda, nourishes the body and skin. Massaging with it relieves muscle tension, dryness, and joint pain. It moisturizes skin, reduces wrinkles, heals cracked lips and improves sleep. Eating ghee aids digestion, boosts energy, and supports brain function, making it a holistic health solution.