Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > फूड पॉयझनिंग फक्त बाहेर खाल्याने होत नाही तर अन्न शिजवताना असे भांडे वापरले तरी होते

फूड पॉयझनिंग फक्त बाहेर खाल्याने होत नाही तर अन्न शिजवताना असे भांडे वापरले तरी होते

Food poisoning doesn't just happen from eating outside, it also happens when such utensils are used while cooking food : चुकीची भांडी वापरली तरी होते पोटात गडबड.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2026 14:48 IST2026-04-19T14:46:38+5:302026-04-19T14:48:03+5:30

Food poisoning doesn't just happen from eating outside, it also happens when such utensils are used while cooking food : चुकीची भांडी वापरली तरी होते पोटात गडबड.

Food poisoning doesn't just happen from eating outside, it also happens when such utensils are used while cooking food. | फूड पॉयझनिंग फक्त बाहेर खाल्याने होत नाही तर अन्न शिजवताना असे भांडे वापरले तरी होते

फूड पॉयझनिंग फक्त बाहेर खाल्याने होत नाही तर अन्न शिजवताना असे भांडे वापरले तरी होते

अनेकांना अनेक कारणांमुळे पोटाच्या विविध समस्या होत असतात. पोट दुखते म्हणजे नक्की काय होते हे तर आपल्याला माहिती आहे. पण त्याची कारणे वेगवेगळी असल्याने त्या त्रासाला वेगवेगळी नावे आहेत. पोट नेमकं कशामुळे दुखतं ते समजून घेणं म्हणजे वैद्यांकडे जायलाच हवे. पण पोट दुखलं की घरचे लगेच म्हणतात अरबटचरबट खाल्लं असेल. अन्नातून होणारा असाच एक त्रास म्हणजे अन्नातून विषबाधा होणे. (Food poisoning doesn't just happen from eating outside, it also happens when such utensils are used while cooking food.)अनेकदा आपण फूड पॉयझनिंग हा शब्द ऐकत असतो. अन्नातून विषबाधा झाली हे ऐकायला जरा चिंता जनक वाटते मात्र घाबरण्याची गरज नाही. फूड पॉयझनिंग झाल्यावर साध्या उपायांनी आराम मिळतो. मात्र वेगळीच डॉक्टरांचा सल्ला घेणेही तेवढेच गरजेचे असते. अनेकांना वाटते फक्त बाहेरचे खलल्यामुळे फूड पॉयझनिंग होते. काहीतरी शिळं खातात आणि आजारी पडतात असे आईचे टोमणेही आपण ऐकतोच. पण अन्नातून विषबाधा होण्यामागे फक्त हे एकच कारण नसते इतरही काही कारणे असतात. 

आपण जेवण तयार करायला कोणती भांडी वापरतो याचा विचार करणे गरजेचे असते. चुकीच्या भांड्यांचा वापर केल्याने अशी विषबाधा होऊ शकते. पातेल्यांना कल्हही असणे फार गरजेचे असते. खास काही आंबट घालून पदार्थ करताना. उरलेले पदार्थ कल्हही नसलेल्या भांड्यात काढून ठेवल्यानेही ते खराब होतात चव बदलत नाही मात्र पोटाला त्रास होतो. घरातील अन्न शिजवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या भांड्यांना कल्हही आहे का नाही याची तपासणी करा. असे अन्न खाल्यानेही विषबाधा होते. त्यामुळे अनेकदा काहीही चुकीचे खाल्ले नाही तरीही पोटाला त्रास का झाला असा प्रश्न पडत असेल तर नक्कीच भांडे चुकीचे वापरत आहात.  

अन्न वाया जाऊ नये म्हणून आपण कालचे उरलेले खातो तसेच परवाचेही खातो तेवढेच नाही तर अगदी तेरवाचेही गरम करुन खातो. मात्र असे शिळे अन्न खाणे आरोग्यासाठी चांगले नाही. त्यामुळे ताजे गरम पदार्थच खावेत. जुने करुन ठेवलेले खाणे टाळा. फळे आरोग्यासाठी फार चांगली असतात. मात्र फळे फार दिवस ठेवली की त्यातील गुणधर्म कमी होतात. फळांमध्ये सालमोनेला नावाचा एक जंतू तयार होतो. त्यामुळे फळे ताजी आणि धुतल्यानंतरच खा. अन्न कायम झाकून ठेवा. कधीही उघडे राहू देऊ नका. फार वेळ उघडे राहीलेले पदार्थ खाऊच नका. माश्या, झुरळे, चिलटी अन्नाच्या आजूबाजूला फिरणार नाहीत ना याची काळजी घ्यायची.

Web Title : फूड पॉइजनिंग: केवल बाहर खाने से नहीं, खाना पकाने के बर्तन भी हैं कारण

Web Summary : फूड पॉइजनिंग केवल बाहर खाने से नहीं होती; खाना पकाने के बर्तन भी मायने रखते हैं। बिना कल्हई वाले बर्तन, खासकर अम्लीय भोजन के लिए, समस्याएँ पैदा करते हैं। ताज़ा खाना खाएं, फल धोएं, संदूषण रोकने के लिए भोजन ढककर रखें।

Web Title : Food poisoning: Cooking utensils also cause it, not just eating out.

Web Summary : Food poisoning isn't solely from eating out; utensil choice matters. Using unlined cookware, especially for acidic foods, causes issues. Eat fresh food, wash fruits, cover food to prevent contamination and illness.