आजकाल पूर्वी एवढा कापराचा वापर केला जात नाही मात्र कापूर हा आपल्या दैनंदिन आयुष्यात वापरला जाणारा एक अत्यंत उपयुक्त आणि बहुगुणी पदार्थ आहे. धार्मिक विधींमध्ये त्याचे विशेष स्थान असले तरी त्याचे आरोग्य, घरगुती आणि सौंदर्यविषयक उपयोगही तितकेच महत्त्वाचे आहेत. (Campor use for better health , see how to use for various things at once )बाजारात सहज मिळणारा कापूर थंड गुणधर्माचा असून त्याला सुगंधी आणि जंतुनाशक वैशिष्ट्ये लाभलेली आहेत.
कापुराचे मुख्य गुणधर्म म्हणजे त्याची थंडावा देण्याची क्षमता, अँटीसेप्टिक (जंतुनाशक) आणि अँटी-इन्फ्लेमेटरी (सूज कमी करणारे) गुण. त्यामुळे त्वचेवरील खाज, सूज किंवा किरकोळ जखमा यावर तो उपयोगी ठरतो. कापूर हवेत मिसळल्यावर वातावरण शुद्ध करण्यास मदत करतो, म्हणूनच तो घरातील दुर्गंध दूर करण्यासाठीही वापरला जातो. शिवाय हवेतील जंतु कमी करण्यासाठी तो फायद्याचा ठरतो.
आरोग्याच्या दृष्टीने पाहिल्यास कापूर अनेक प्रकारे फायदेशीर आहे. सर्दी, खोकला किंवा नाक बंद झाल्यास कापूर पेटवून खोलीत ठेवा. त्याचा वास घेतल्यास श्वसनमार्ग मोकळा होतो. सांधेदुखी किंवा स्नायू दुखत असल्यास कापूर मिसळलेले तेल लावल्याने आराम मिळतो. तसेच कापूर डोक्यावर किंवा कपाळावर लावल्यास थोड्या फार प्रमाणात डोकेदुखीपासूनही आराम मिळतो. घरगुती उपयोगांमध्ये कापूर कीटक आणि डास दूर ठेवण्यासाठी खूप प्रभावी ठरतो. कपाटात कापूर ठेवला तर कपड्यांना येणारा वास कमी होतो आणि कीटकांपासून संरक्षण मिळते. तसेच घरात कापूर जाळल्याने वातावरणात प्रसन्नता आणि शुद्धता निर्माण होते. त्यामुळे उंचावर ट्रेकींगला जाणारे लोक कापूर सोबत ठेवतात. श्वासासाठी तो मदत करतो.
सौंदर्यविषयक वापरातही कापूर महत्त्वाचा आहे. त्वचेवरील पिंपल्स कमी करण्यासाठी कापूर थोड्या प्रमाणात खोबरेल तेलात मिसळून लावला जातो. केसांमध्ये कोंडा कमी करण्यासाठीही कापूरयुक्त तेलाचा वापर केला जातो. मात्र हा वापर मर्यादित प्रमाणातच करावा. लहान मुलांच्या डोक्यात होणाऱ्या उवा या कापराच्या तेलाने निघून जातात. कापूर वापरताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. तो थेट त्वचेवर जास्त प्रमाणात लावू नये, कारण त्यामुळे जळजळ होऊ शकते. लहान मुलांच्या आवाक्याबाहेर ठेवावा आणि खाण्यासाठी वापरण्याचा विचार करत असाल तर केवळ खाद्यपदार्थांसाठी योग्य (edible) कापूरच वापरावा.
