चहा कुणाला आवडत नाही. जगभरात ९० टक्के लोकांच्या दिवसाची सुरुवात चहाने होते. अगदी झोपेतून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अनेकजण चहा पितात. डोकेदुखी, तणाव, थकवा, झोप किंवा मूड फ्रेश करण्यासाठी चहा प्यायला जातो.(Tea and digestion tips) काहीजण तर चहा आवडतो म्हणून दर १ ते २ तासाने चहा पितात. सकाळच्या दिवसाची सुरुवात एक कप चहा घेतल्याशिवाय दिवस पूर्ण होत नाही.(Healthy tea consumption guide) पण चुकीच्या वेळी आणि चुकीच्या पद्धतीने घेतलेला चहा आपल्या आरोग्यासाठी वरदान ठरण्याऐवजी शाप ठरू शकतो? अनेकदा आपण चवीच्या नादात दिवसभरात किती चहा पितो याचे भान ठेवत नाही, ज्यामुळे पित्त (Acidity), अपचन आणि निद्रानाश यांसारख्या समस्या उद्भवतात.
चहा पिणे चुकीचे नाही, पण तो कधी आणि किती प्रमाणात प्यावा याचे शास्त्र आहे. विशेषतः रिकाम्या पोटी चहा घेतल्याने पोटातील आम्लाचे प्रमाण वाढते, जे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. तसेच, चहामध्ये कॅफिन असल्यामुळे त्याचे अतिसेवन शरीराच्या नैसर्गिक चक्राला विस्कळीत करते. जर आपल्यालाही चहा पिण्याची सवय असेल तर ५ गोल्डन नियम लक्षात ठेवल्यास चहा आवडीने पिऊ शकता. (When to avoid tea for better sleep)
साडी १ - ड्रेस ७, जुन्या खणाच्या साडीतून शिवा ७ डिझायनर इंडो-वेस्टन ड्रेस, कमी बजेट- लूक स्टायलिश
1. सकाळी उठल्याबरोबर अनेकांना बेड टी घेण्याची सवय असते. पण रिकाम्या पोटी चहा घेतल्याने चयापचय मंदावते आणि पित्ताचा त्रास सुरु होतो. सकाळी चहा घेण्यापूर्वी किमान एक ग्लास कोमट पाणी किंवा फळ खाणे कधीही चांगले.
2. अनेकांना जेवल्यानंतर चहा पिण्याची तलफ लागते. पण यामुळे अन्नातील पोषक घटक विशेषत: लोह शरीर शोषून घेऊ शकत नाही. जेवण आणि चहा यामध्ये किंमान १ ते पाऊण तासांचे अंतर असायला हवे.
3. चहामध्ये कॅफिन असते. त्यामुळे दिवसभरात खूप वेळा चहा प्यायल्यावर रात्रीच्या झोपेवर परिणाम होऊ शकतो. यामुळे आपल्याला निद्रानाशाचा त्रास उद्भवतो. झोपण्याच्या किमान ४ ते ५ तासांआधी चहा घ्यावा.
4. एकदा बनवलेला चहा थंड झाल्यावर पुन्हा पुन्हा गरम करुन पिऊ नका. असं करणं आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. चहा जास्त वेळ उकळल्याने त्यातील टॅनिनचे प्रमाण वाढते. ज्यामुळे बद्धकोष्ठता आणि पोटाचे विकार होऊ शकतात.
5. सतत चहा प्यायल्याने लघवीचे प्रमाण वाढवते. ज्यामुळे शरीरातील पाणी कमी होऊ शकते. म्हणून चहा पिण्यापूर्वी किंवा नंतर पाणी पिण्याची सवय ठेवा. ज्यामुळे आपले शरीर हायड्रेट राहिल.
6. आरोग्य तज्ज्ञांच्या मते एका सुदृढ व्यक्तीने दिवसभरात २ ते ३ कप पेक्षा जास्त चहा घेऊ नये. जर आपल्याला पित्ताचा किंवा अपचनाचा त्रास असेल, तर चहाचे प्रमाण कमी करायला हवे.
