Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > उन्हाळ्यात आईस्क्रिम खावंसं वाटतं; पण दात ठणकतात? ५ उपाय करा- बिंधास्त आईस्क्रिम खा

उन्हाळ्यात आईस्क्रिम खावंसं वाटतं; पण दात ठणकतात? ५ उपाय करा- बिंधास्त आईस्क्रिम खा

5 Remedies for Sensitive Teeth: आईस्क्रिम किंवा इतर कोणतेही थंड पदार्थ खाताना तुमचेही दात ठणकत असतील तर पुढे सांगितलेले उपाय करून पाहा...(ayurvedic home hacks to reduce tooth pain)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2026 17:31 IST2026-04-29T17:30:27+5:302026-04-29T17:31:42+5:30

5 Remedies for Sensitive Teeth: आईस्क्रिम किंवा इतर कोणतेही थंड पदार्थ खाताना तुमचेही दात ठणकत असतील तर पुढे सांगितलेले उपाय करून पाहा...(ayurvedic home hacks to reduce tooth pain)

5 remedies for sensitive teeth, ayurvedic home hacks to reduce tooth pain | उन्हाळ्यात आईस्क्रिम खावंसं वाटतं; पण दात ठणकतात? ५ उपाय करा- बिंधास्त आईस्क्रिम खा

उन्हाळ्यात आईस्क्रिम खावंसं वाटतं; पण दात ठणकतात? ५ उपाय करा- बिंधास्त आईस्क्रिम खा

Highlightsदात ठणकत असतील तर लवंगाच्य तेलाने दररोज दातांना मालिश करा. दात ठणकणं बंद होईल.

आईस्क्रिम, कुल्फी, वेगवेगळे थंडगार ज्सूस, मिल्कशेक असे गारेगार पदार्थ म्हणजे उन्हाळ्याची खरी मजा. या दिवसांत इतकी उष्णता असते की अगदी लहान मुलांनाही आपण सतत हे थंड पदार्थ देतो. पण तरीही काही लोकांची मात्र खूपच पंचाईत होते. त्यांना आईस्क्रिमसोबतच इतरही गारेगार पदार्थ तर खावेसे वाटतात, पण त्यांचे दात त्यांना खाऊ देत नाही. काहीही थंड खाल्लं की दातांना, दाढांना लगेच झिणझिण्या येऊ लागतात. हा त्रास टाळून जर आईस्क्रिम खाण्याचा मनमुराद आनंद घ्यायचा असेल तर पुढे सांगितलेले काही उपाय करून पाहा (5 remedies for sensitive teeth). दातांना त्रास होणार नाही.(ayurvedic home hacks to reduce tooth pain)

थंड खाल्ल्यानंतर दातांना झिणझिण्या येत असल्यास काय करावं?

 

१. संवेदनशील झालेल्या दातांसाठी त्रिफळा चूर्ण अतिशय उपयुक्त ठरते. यासाठी त्रिफळा चुर्णाचा काढा तयार करा आणि जेवण झाल्यानंतर या कोमट काढ्याने गुळण्या करा. दिवसांतून दोन वेळा हा उपाय करा. दात स्वच्छ होतील आणि ठणक कमी होईल.

पोळ्या लाटताना जगभरातल्या देशांचे नकाशेच तयार होतात? परफेक्ट गोल आकाराची पोळी लाटण्याची घ्या खास ट्रिक

२. मोहरीच्या तेलाचा वापर करूनही दातांचे ठणकणे कमी करता येते. यासाठी मोहरीच्या तेलामध्ये २ चमचे मीठ घाला. आता या मिश्रणाने रोज रात्री झोपण्यापुर्वी अगदी अलगदपणे दात घासा. हे मिश्रण सगळ्या दातांना व्यवस्थित लागेल याची काळजी घ्या. हवं तर टुथब्रश न वापरता तुम्ही बोटानेही दात घासू शकता. यानंतर एखाद्या मिनिटाने गुळणा करून टाका. काही दिवस रोज हा उपाय करून पाहा. चांगला परिणाम दिसून येईल.

 

३. तुरटी गरम करून ती वितळवून घ्या आणि मग थंड करून तिची पावडर तयार करा. या पावडरने रात्री झोपण्यापुर्वी दातांना मालिश करा. दात ठणकणं कमी होईल.

लिंबाचा रस काढून साल फेकू नका, करा गोड आंबट लोणचं- घ्या अगदी सोपी पौष्टिक रेसिपी

४. पेरू, जांभूळ आणि आंब्याच्या झाडाच्या काड्यांची सालं काढून घ्या. त्यानंतर त्यांचा काढा करून त्याने गुळण्या करा.

५. दात ठणकत असतील तर लवंगाच्य तेलाने दररोज दातांना मालिश करा. दात ठणकणं बंद होईल. हे सगळे डॉ. मिनाक्षी शर्मा यांनी सांगितलेले उपाय न्यूज १८ने प्रकाशित केले आहेत.  

 

Web Title : दांतों में झनझनाहट से आइसक्रीम का मजा किरकिरा? ये 5 उपाय आजमाएं।

Web Summary : दांतों की झनझनाहट से छुटकारा पाएं और आइसक्रीम का आनंद लें! त्रिफला, सरसों का तेल, फिटकरी, फलों के पेड़ की छाल का काढ़ा, या लौंग का तेल इस्तेमाल करें।

Web Title : Sensitive teeth ruining your ice cream fun? Try these 5 remedies.

Web Summary : Enjoy ice cream without tooth pain! Use trifala, mustard oil, alum, fruit tree bark decoction, or clove oil to relieve sensitivity and enjoy cold treats.