Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > पोळ्या लाटताना जगभरातल्या देशांचे नकाशेच तयार होतात? परफेक्ट गोल आकाराची पोळी लाटण्याची घ्या खास ट्रिक

पोळ्या लाटताना जगभरातल्या देशांचे नकाशेच तयार होतात? परफेक्ट गोल आकाराची पोळी लाटण्याची घ्या खास ट्रिक

How to Make Perfect Round Shape Chapati?: परफेक्ट गोल आकाराच्या पोळ्या लाटणं जमत नसेल तर त्यासाठी काय करायला हवं याविषयी काही सोप्या ट्रिक्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2026 15:50 IST2026-04-29T15:49:30+5:302026-04-29T15:50:07+5:30

How to Make Perfect Round Shape Chapati?: परफेक्ट गोल आकाराच्या पोळ्या लाटणं जमत नसेल तर त्यासाठी काय करायला हवं याविषयी काही सोप्या ट्रिक्स

how to make perfect round shape chapati, tips for round shape roti | पोळ्या लाटताना जगभरातल्या देशांचे नकाशेच तयार होतात? परफेक्ट गोल आकाराची पोळी लाटण्याची घ्या खास ट्रिक

पोळ्या लाटताना जगभरातल्या देशांचे नकाशेच तयार होतात? परफेक्ट गोल आकाराची पोळी लाटण्याची घ्या खास ट्रिक

Highlightsपरफेक्ट गोल आकाराच्या पोळ्या करायच्या असतील तर त्यासाठी नेमकं काय करावं ते पाहुया..

पोळ्या किंवा चपाती हा जवळपास सगळ्याच घरांमध्ये अगदी रोजच लागणारा पदार्थ. पोळ्या किंवा चपाती नाही केल्या तर किमान पराठे, भाकरी असे पदार्थ तरी केले जातातच. पण बऱ्याच जणींना अशी अडचणी येते की त्यांना पोळ्या छान गोलाकार येत नाहीत. त्यांनी केलेल्या पोळ्यांना खूप वेगवेगळे आकार येतात. अशा पोळ्या पाहुण्यांना वाढायला बऱ्याचदा अवघडल्यासारखे वाटते. म्हणूनच परफेक्ट गोल आकाराच्या पोळ्या करायच्या असतील तर त्यासाठी नेमकं काय करावं ते पाहुया...(How to Make Perfect Round Shape Chapati?)

 

परफेक्ट गोल आकाराच्या पोळ्या कशा लाटायच्या?

सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे पोळ्या करण्यासाठी कणिक अतिशय उत्तम मळली गेली पाहिजे. यासाठी कणिक भिजवून झाल्यानंतर तिला तेल लावा आणि ती चांगली ५ ते ७ मिनिटे मळून घ्या. 

डायबिटीस असणाऱ्यांना मध्यरात्री अचानक भूक लागते, अस्वस्थ होतं? ४ महत्त्वाच्या गोष्टी कायम लक्षात ठेवा

त्यानंतर कणकेवर झाकण ठेवा आणि ती १० ते १२ मिनिटे झाकून ठेवा. यामुळे कणिक चांगली भिजते आणि पोळी छान पसरत जाते, मऊ होते.

 

आता सुरुवातीला परफेक्ट गोल आकाराच्या पोळ्या जमत नसतील तर पुरीसाठी घेतो त्यापेक्षा अगदी थोडासाच मोठ्या आकाराचा कणकेचा गोळा घ्या त्याला दोन्ही हातांनी गोल गोल वळून छान गोल आकार द्या. 

दुपारी जेवण झाल्यानंतर झोपण्याची योग्य पद्धत पाहा- हृदयावर ताण येणार नाही, पचनही चांगले होईल 

आता त्या गोळ्याला दोन्ही बाजूंनी पीठ लावा आणि हळुवार दाब देत पोळी लाटून घ्या. पोळी लाटत असताना तिच्या काठांवर भर द्या. मध्यभागी जास्त जोरात लाटू नका. काठ हळूहळू लाटत गेलात की आपोआप पोळी पसरत जाऊन तिला गोल आकार येतो. काठाच्या प्रत्येक भागावर व्यवस्थित लाटलं जाईल याकडे लक्ष द्या. 

 

Web Title : गोल रोटी बनाने की कला: हर रसोई के लिए आसान टिप्स।

Web Summary : आसान टिप्स के साथ एकदम गोल रोटियां बनाएं: आटा अच्छी तरह गूंधें, आराम दें, छोटी लोइयां बनाएं और किनारों से धीरे-धीरे बेलें। लगातार गोल परिणाम के लिए समान दबाव पर ध्यान दें।

Web Title : Master the art: Perfect round roti-making tips for every kitchen.

Web Summary : Achieve perfectly round rotis with these simple tips: knead dough well, rest it, shape small balls, and gently roll from the edges. Focus on even pressure for consistently round results.