बहुतांश महिलांच्या बाबतीत दिसून येणारी एक महत्त्वाची समस्या म्हणजे तरुण वयात असताना त्या स्वत:च्या तब्येतीकडे, खाण्यापिण्याकडे, व्यायामाकडे अजिबात लक्ष देत नाही. शरीर सांगत असतं तरी त्याकडे दुर्लक्ष करतात आणि कित्येक आजार अंगावर काढतात. मग चाळिशीत जेव्हा मेनोपॉजची सुरुवात व्हायला लागते तेव्हा शरीराचं कुरकुरणं सातत्याने जाणवू लागतं. बसता- उठता हाडं ठणकतात, पाठ- कंबर- गुडघे दुखतात. हे सगळं टाळायचं असेल तर तरुण वयापासूनच महिलांनी २ गोष्टी अगदी कटाक्षाने करायला हव्या. जेणेकरून म्हातारपणीही हाडं मजबूत राहतील...(health tips for women for strong bones)
हाडं बळकट ठेवण्यासाठी महिलांनी काय काळजी घ्यावी?
महिलांची जेव्हा पाळी बंद होते तेव्हा त्यांच्या शरीरातल्या इस्ट्रोजीन हार्मोनची पातळी कमी कमी होत जाते. याचा परिणाम हाडांमधील कॅल्शियमवरही होतो. आणि हाडं ठिसूळ व्हायला लागतात. हे टाळायचं असेल तर अगदी तरुण वयापासूनच काही गोष्टी नियमितपणे करायला हव्या.
चिंच- गूळ घालून केलेल्या कारल्याच्या भाजीची चटपटीत रेसिपी- अजिबात कडू न होणारी चवदार भाजी
त्यापैकी पहिली गोष्ट म्हणजे आहारात कॅल्शियमचे प्रमाण वाढविणे. यासाठी कॅल्शियमयुक्त वेगवेगळे पदार्थ तुम्ही खाऊ शकता. किंवा मग कॅल्शियमचा स्वस्तात मस्त्र स्त्रोत म्हणजे नाचणी. नियमितपणे नाचणी खा. कोणत्या ना कोणत्या स्वरुपात तुमच्या आहारात नाचणी असेल तर हाडं मजबूत होत जातील. त्यामुळे नाचणी खाणं वाढवा.
दुसरी गोष्ट म्हणजे आहारातून कॅल्शियम घेत असलात तरीही रोजच्या रोज व्यायाम करून हाडांना बळकटी देणं खूप गरजेचं आहे.
उरलेला कच्चा कांदा फ्रिजमध्ये ठेवून खाणं योग्य आहे का? एक्सपर्ट सांगतात ३ महत्त्वाच्या गोष्टी
त्यासाठी तुम्ही योगा, रनिंग, सायकलिंग, स्विमिंग असा कोणताही तुम्हाला आवडेल तो व्यायाम करू शकता. पण त्यामध्ये सातत्य मात्र ठेवा. आहार आणि व्यायाम या दोन गोष्टी सांभाळल्या तर हाडांचं दुखणं म्हातारपणीही तुमच्याकडे फिरकणार नाही.
