Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > उरलेला कच्चा कांदा फ्रिजमध्ये ठेवून खाणं योग्य आहे का? एक्सपर्ट सांगतात ३ महत्त्वाच्या गोष्टी

उरलेला कच्चा कांदा फ्रिजमध्ये ठेवून खाणं योग्य आहे का? एक्सपर्ट सांगतात ३ महत्त्वाच्या गोष्टी

How to Store Raw Chopped Onion?: कच्चा कांदा उरला की तो फ्रिजमध्ये ठेवून देण्याची सवय तुम्हालाही असेल तर एकदा हे वाचायलाच हवं...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2026 13:50 IST2026-05-09T13:49:27+5:302026-05-09T13:50:12+5:30

How to Store Raw Chopped Onion?: कच्चा कांदा उरला की तो फ्रिजमध्ये ठेवून देण्याची सवय तुम्हालाही असेल तर एकदा हे वाचायलाच हवं...

is it okay to store raw chopped onion in fridge, how to store raw onion | उरलेला कच्चा कांदा फ्रिजमध्ये ठेवून खाणं योग्य आहे का? एक्सपर्ट सांगतात ३ महत्त्वाच्या गोष्टी

उरलेला कच्चा कांदा फ्रिजमध्ये ठेवून खाणं योग्य आहे का? एक्सपर्ट सांगतात ३ महत्त्वाच्या गोष्टी

Highlightsहे खरंच योग्य आहे का, असा कांदा किती वेळात खाणं चांगलं?

कांदा हा आपल्या जेवणातला असा एक पदार्थ की तो कच्चा खा किंवा परतून खा किंवा एखाद्या भाजीमध्ये घालून खा... तो हमखास आपल्या जेवणाला जास्त खमंगपणा देतो आणि पदार्थांची चव खुलवतो. त्यामुळे बहुतांशवेळा स्वयंपाकात कांदा असतोच. काही वेळेस असंही होतं की कांदा आपण चिरतो, पण चिरल्यानंतर लक्षात येतं की जरा जास्त झाला आहे. अशावेळी मग तो टाकूनही द्यावा वाटत नाही किंवा आपण तो तोंडी लावायलाही घेऊ शकत नाही. मग अशावेळी कच्च्या कांद्याचं काय करावं असा प्रश्न पडतोच. हा कांदा तसाच फ्रिजमध्ये ठेवून देण्याची सवय अनेक जणांना असते (How to Store Raw Chopped Onion?). पण हे खरंच योग्य आहे का, असा कांदा किती वेळात खाणं चांगलं (is it okay to store raw chopped onion in fridge?)

 

उरलेला कच्चा कांदा फ्रिजमध्ये ठेवून खाणं योग्य आहे का?

नॅशनल लायब्ररी ऑफ मेडीसीन यांच्या अभ्यासानुसार असं सांगण्यात आलं आहे की कांदा जर फ्रिजमधल्या थंड वातावरणात ठेवला तर त्यामधले घटक बदलायला सुरुवात होते. त्यात अनेक केमिकल्स तयार व्हायला लागतात. कारण थंड वातावरणात कांदा टिकत नाही.

फरशी पुसण्याच्या कापडाला कुबट वास येतो? 'या' पद्धतीने धुवा- दुर्गंधी जाऊन कपडा स्वच्छ निघेल

त्यामुळे कांदा उरलाच असेल तर तो शक्यतो फ्रिजमध्ये ठेवू नये. जर तुम्हाला ठेवायचाच असेल तर एअर टाईट कंटेनरमध्ये घाला आणि मग तो फ्रिजमध्ये ठेवा. पण असा कांदा पुढच्या २ ते ३ तासांतच संपवायला हवा. त्यापेक्षा जास्त वेळ झाला तर तो कांदा खाणं टाळायलाच हवं.

 

उरलेल्या कांद्याचं करायचं काय?

कांदा उरलाच असेल तर तो पुढील पद्धतीने साठवून ठेवू शकता. यासाठी कांद्याचे बारीक काप करा आणि कढईमध्ये तेल घालून तो हलकासा परतून घ्या.

चिंच- गूळ घालून केलेल्या कारल्याच्या भाजीची चटपटीत रेसिपी- अजिबात कडू न होणारी चवदार भाजी

कांद्याचा सोनेरी रंग आला की गॅस बंद करा आणि मग हा कांदा थंड झाल्यानंतर एअरटाईड डब्यामध्ये किंवा काचेच्या बरणीमध्ये घालून फ्रिजमध्ये ठेवा. अशा पद्धतीने ठेवलेला कांदाही पुढच्या ८ ते १० तासांत संपवायला हवा. त्यापेक्षा शिळा कांदा खाऊ नये. 

 

Web Title : क्या बचा हुआ कच्चा प्याज फ्रिज में रखना सुरक्षित है? एक्सपर्ट सलाह।

Web Summary : कच्चे, कटे प्याज को फ्रिज में रखने से रासायनिक परिवर्तन होते हैं। एयरटाइट कंटेनर में स्टोर करें और 2-3 घंटे के भीतर सेवन करें। वैकल्पिक रूप से, भूनें और 10 घंटे तक रेफ्रिजरेट करें। लंबे समय तक भंडारण से बचें।

Web Title : Is it safe to refrigerate leftover raw onion? Expert advice.

Web Summary : Refrigerating raw, cut onions promotes chemical changes. Store in airtight containers and consume within 2-3 hours. Alternatively, sauté and refrigerate for up to 10 hours. Avoid prolonged storage.