Mother's Day 2026 Wishes : आईला भेट देण्यासाठी स्पेशल ग्रिटिंग कार्ड, मनातलं प्रेम खास शब्दांत
Updated:May 9, 2026 16:51 IST2026-05-09T15:22:53+5:302026-05-09T16:51:34+5:30

आई... तुझ्यामुळेच आहे घराला घरपण.. लेकरांचं बालपण आणि लेकीचं मायेचं माहेरपण...
आई.. तू म्हणजे कुटूंबाला बांधून ठेवणारा प्रेमळ धागा हट्ट- लाड पुरवून घेण्याची हक्काची जागा...
आई.. तू म्हणजे लेकरांची आस तू म्हणजे जगण्याचा ध्यास! तुझ्याशिवाय कळलंच नसतं, जगणं काय असतं..
आई, तू म्हणजे अखंड वाहणारी मायेची नदी, तू म्हणजेच सप्तसुरांचं संगीत... जगण्याचं दुसरं नावच म्हणून आईपण बाई!
आई.. तू म्हणजे फक्त देत जाणं, तू म्हणजे मोठं होणं.. तूच म्हणजे मोठ्या मनाचं रुप होणं..