कैरीच्या कित्येक वेगवेगळ्या रेसिपी आपण करत असतो. प्रत्येक घरानुसार कैरीचा तक्कू, चटणी किंवा इंस्टंट लोणचं करण्याची पद्धत बदलत जाते. त्यामुळे उन्हाळ्यात कैरीच्या अनेक वेगवेगळ्या रेसिपी आपण चाखून बघतच असतो. आता आपल्याकडच्या या रेसिपींपेक्षा एकदम वेगळी रेसिपी पाहा.. या रेसिपीनुसार दक्षिण भारतात कैरीची चटणी केली जाते. रेसिपी अतिशय सोपी असून चव बदल होण्यास निश्चितच मदत होईल (South Special Kairi Chutney Recipe). ही चटणी तुम्ही पोळी, भाकरी, पराठा, भात यासोबत खाऊ शकता.(kairichi chutney recipe)
कैरीची चटणी करण्याची आंध्रा स्पेशल पद्धत
साहित्य
१ मध्यम आकाराची कैरी
१ चमचा डाळवं आणि अर्धा चमचा उडीद डाळ
उन्हाळ्यात डब्यात ठेवलेल्या पोळ्या जास्तच घामट होतात? ३ उपाय, पोळ्या ओलसर होणार नाहीत
थोड्याशा मेथ्या आणि लसणाच्या ७ ते ८ पाकळ्या
वाळलेल्या लाल मिरच्या, कडिपत्ता आणि फोडणीसाठी तेल
चवीनुसार मीठ आणि लाल तिखट
कृती
कैरीची चटणी करण्यासाठी सगळ्यात आधी तर कैरी धुवून पुसून घ्या आणि तिच्या बारीक फोडी करा.
यानंतर गॅसवर कढई गरम करायला ठेवा. तिच्यामध्ये तेल घालून लाल मिरच्या, लसूण पाकळ्या, उडीद डाळ, डाळवं आणि मेथ्या घालून ते परतून घ्या. हे सगळं साहित्य थंड झाल्यानंतर ते मिक्सरमध्ये घाला आणि बारीक करून घ्या.
पहाटेच्या वेळी हार्टॲटॅक येण्याचं प्रमाण जास्त का असतं? एक्सपर्ट सांगतात २ महत्त्वाची कारणं
आता ते वाटण मिक्सरच्या भांड्यात तसंच राहू द्या आणि त्यामध्ये कैरीच्या बारीक चिरलेल्या फोडी घालून त्या बारीक करून घ्या. आता तयार झालेलं सगळं वाटण एका भांड्यात काढा.
त्याला तेल, मोहरी, जिरे, हिंग, कडिपत्ता, लाल मिरच्यांची वरतून पुन्हा एकदा फोडणी घाला. चवीनुसार मीठ घातलं की कैरीची चटपटीत चटणी तयार.
