हार्ट ॲटॅक येण्याचं प्रमाण आता खूप वाढलेलं आहे. बदललेल्या जीवनशैलीचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. त्यामुळे मग कमी वयातच कित्येक दुखणी मागे लागतात. त्यापैकीच एक आहे हृदयविकार. आता तर अगदी पंचविशी- तिशीतल्या रुग्णांनाही हार्ट ॲटॅक आल्याचं आपण ऐकतो. त्यातही बऱ्याचशा केसेसमध्ये असं दिसून येतं की पहाटे झोपेत असतानाच किंवा मग झोपेतून उठल्यानंतर पुढच्या काही मिनिटांत किंवा तासांतच हृदयविकाराचा झटका आला (Why do Heart Attack Happens in the Morning?). असं का होत असावं याविषयीची कारणं डॉक्टरांनी सांगितली आहेत. ती कारणं नेमकी कोणती ते पाहुया..(main reasons for heart attack in morning period)
पहाटेच्या वेळी हार्ट ॲटॅक येण्याचं प्रमाण जास्त का असतं?
१. मायोकार्डिनल यांनी दिलेली माहिती हेल्थशॉटने प्रकाशित केली आहे. त्यानुसार आपल्या शरीराची बायोलॉजिकल क्लॉक हे एक कारण आहे. म्हणजेच आपल्या शरीरातल्या अनेक क्रिया एका ठराविक वेळेनंतर होत असतात.
निस्तेज कोरड्या त्वचेला ५ मिनिटांत फ्रेश करण्याचा उपाय- जावेद हबीब सांगतात मस्त ट्रिक
त्यानुसार काही अभ्यासकांनी केलेला अभ्यास असं सांगतो की सकाळी ६ ते दु. १२ या दरम्यान आपल्या शरीरातील कॉर्टिसॉल हार्मोन्सचा थर जास्त असतो. यामुळे रक्तदाब वाढतो आणि धमन्यांवर ताण येतो. हृदयाला ऑक्सिजन जास्त प्रमाणात लागतं. पण धमन्या आकुंचित असल्याने ते मिळत नाही. त्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.
२. सकाळच्या वेळी रक्त थोडं घट्ट झालेलं असतं. अशातच जर धमन्यांमध्येही फॅट्स जास्त असतील तर रक्तप्रवाहामध्ये अडचणी येतात. हृदयाला पुरेसं ऑक्सिजन मिळत नाही आणि त्यामुळेही हृदयविकार येऊ शकतो.
काय काळजी घ्यावी?
सकाळच्या वेळी जर श्वास घ्यायला त्रास होत असेल, खूप थकवा जाणवत असेल, डाेकेदुखी होत असेल किंवा अस्वस्थता वाटत असेल तर या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.
उन्हाळ्यात डब्यात ठेवलेल्या पोळ्या जास्तच घामट होतात? ३ उपाय, पोळ्या ओलसर होणार नाहीत
सकाळी खूप गडबडीत उठून एकदम कामाला लागू नये. सावकाश उठून मग हळूहळू कामाला लागा. उठल्यावर लगेचच खूप कठीण व्यायाम करू नका.
सकाळी उठताच एक ग्लास पाणी शांतपणे प्या. यामुळे रक्त पातळ होण्यास मदत होत असते.
