Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > अस्सल झणझणीत पारंपरिक चवीची मिसळ करा आता झटपट कुकरमध्ये , चव तीच पण कष्ट कमी ....

अस्सल झणझणीत पारंपरिक चवीची मिसळ करा आता झटपट कुकरमध्ये , चव तीच पण कष्ट कमी ....

One pot recipes - Make authentic spicy traditional flavoured misal , instant cooking : कुकरमध्ये करा चमचमीत मिसळ. पाहा सोपी रेसिपी.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2026 11:47 IST2026-05-08T11:45:11+5:302026-05-08T11:47:37+5:30

One pot recipes - Make authentic spicy traditional flavoured misal , instant cooking : कुकरमध्ये करा चमचमीत मिसळ. पाहा सोपी रेसिपी.

One pot recipes - Make authentic spicy traditional flavoured misal , instant cooking | अस्सल झणझणीत पारंपरिक चवीची मिसळ करा आता झटपट कुकरमध्ये , चव तीच पण कष्ट कमी ....

अस्सल झणझणीत पारंपरिक चवीची मिसळ करा आता झटपट कुकरमध्ये , चव तीच पण कष्ट कमी ....

मिसळ म्हणजे महाराष्ट्रात गल्लोगल्ली मिळणारा पदार्थ. चवीला एकदम मस्त आणि पोटभरीचा. घरीही मिसळ करता येते. घरोघरी केली जातेच. मात्र मिसळ करायची म्हणजे फार जास्त कष्ट असतात. सगळं वेगळं शिजवा आणि मग एकत्र करा. (One pot recipes - Make authentic spicy traditional flavoured misal , instant cooking )तसेच भांडीही बरीच वापरावी लागतात. मात्र मिसळीची ही रेसिपी फक्त एका कुकरमध्ये करता येते आणि झटपट होते. चवीलाही तेवढीच मस्त असते. त्यामुळे एकदा नक्की करुन पाहा. 

साहित्य 
मटकी, मूग, खोबरं, कांदा, लसूण, लाल तिखट, हळद, मिसळ मसाला, टोमॅटो, कोथिंबीर, मीठ, पाणी, तेल, गरम मसाला, कडीपत्ता, हिरवी मिरची, जिरे, मोहरी 

कृती
१. मूग मटकी भिजत ठेवायचे. त्याला मोड आले की मिसळ चवीला मस्त लागते. दोन दिवस भिजवले तर उत्तम नाहीतर रात्रभर भिजवायच .कांदा बारीक चिरुन घ्यायचा. टोमॅटो बारीक चिरुन घ्यायचा. हिरव्या मिरचीचे तुकडे करायचे. लसणाच्या पाकळ्या सोलून घ्यायच्या. छान ताजी कोथिंबीर घ्यायची आणि निवडून घ्यायची. बारीक चिरुन घ्यायची. 

२. कुकरमध्ये थोडं तेल घ्यायचं त्यात कांद्याचे तुकडे आणि खोबऱ्याचे तुकडे परतायचे. मिक्सरच्या भांड्यात घ्यायचे आणि वाटून घ्यायचे. कुकरमध्ये तेल गरम करायचे. त्यात मोहरी घालायची. परतून घ्यायची. नंतर कडीपत्ता घालायचा आणि तडतडू द्यायचा. जिरं घालायचं आणि परतून घ्यायचं. नंतर त्यात तयार केलेले वाटण घालायचे आणि छान परतून घ्यायचे. त्यात लाल तिखट, मिसळ मसाला आणि हळद घाला. परता आणि पाणी ओता. 

३. कांदा घालायचा परतून घ्यायचा. टोमॅटो घालायचा आणि चवीनुसार मीठही घालायचे. थोडा गरम मसाला घालायचा. थोडं पाणी घालून मसाला शिजवायचा. छान लालसर एकजीव झाला की त्यात शिजवलेले मूग मटकी घाला आणि जरा परतून घ्या. गरजेनुसार पाणी घाला कुकर लावा आणि नेहमीपेक्षा एक शिटी जास्त काढा. कुकर उघडला की छान कटही आला असेल. वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि ढवळून घ्या. दोन मिनिटे उकळू द्या.  

Web Title : झटपट मिसल रेसिपी: प्रामाणिक स्वाद, कम मेहनत, कुकर विधि।

Web Summary : घर पर आसानी से महाराष्ट्र की लोकप्रिय मिसल पाव का आनंद लें! यह एक-पॉट कुकर रेसिपी प्रामाणिक, मसालेदार और संतोषजनक पारंपरिक स्वाद को बरकरार रखते हुए प्रयास को कम करती है। मिनटों में तैयार।

Web Title : Quick Misal Recipe: Authentic Taste, Less Effort, Cooker Method.

Web Summary : Enjoy Maharashtra's popular Misal Pav easily at home! This one-pot cooker recipe reduces effort while retaining the authentic, spicy, and satisfying traditional flavor. Ready in minutes.