Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > पोहे म्हणताच तोंडाला पाणी सुटते पण पोहे कधी लगदा होतात कधी कोरडे? घ्या परफेक्ट पोहे करण्याची युक्ती

पोहे म्हणताच तोंडाला पाणी सुटते पण पोहे कधी लगदा होतात कधी कोरडे? घ्या परफेक्ट पोहे करण्याची युक्ती

Make perfect poha for breakfast, it won't get moisty or dry , cooking tips : पोहे करताना लक्षता ठेवा या टिप्स. होतील चविष्ट मस्त.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2026 16:06 IST2026-05-03T16:03:01+5:302026-05-03T16:06:35+5:30

Make perfect poha for breakfast, it won't get moisty or dry , cooking tips : पोहे करताना लक्षता ठेवा या टिप्स. होतील चविष्ट मस्त.

Make perfect poha for breakfast, it won't get moisty or dry , cooking tips | पोहे म्हणताच तोंडाला पाणी सुटते पण पोहे कधी लगदा होतात कधी कोरडे? घ्या परफेक्ट पोहे करण्याची युक्ती

पोहे म्हणताच तोंडाला पाणी सुटते पण पोहे कधी लगदा होतात कधी कोरडे? घ्या परफेक्ट पोहे करण्याची युक्ती

अनेक पदार्थ नाश्त्यासाठी आपण घरी करतोच. तरीही एक पदार्थ घरोघरी केलाच जातो आणि आवडीने खाल्लाही जातो तो म्हणजे फोडणीचे पोहे.  छान मऊ, पिवळे आणि चविष्ट फोडणीचे पोहे हा आपल्या घराघरातला आवडता नाश्ता आहे. (Make perfect poha for breakfast, it won't get moisty or dry , cooking tips )पण कधी पोहे कोरडे होतात, तर कधी खूप चिकट. योग्य पद्धत आणि काही सोप्या टिप्स लक्षात ठेवल्या तर पोहे नेहमीच परफेक्ट बनतात.

पोहे निवडताना मध्यम जाड पोहे (मीडियम पोहे) घ्यावेत. खूप पातळ पोहे घेतले तर ते पटकन मऊ होऊन गिळगिळीत होतात, आणि खूप जाड पोहे घेतले तर ते नीट मऊ होत नाहीत. पोहे धुताना त्यांना पाण्यात भिजवू नका, फक्त चाळणीत घेऊन हलक्या हाताने पाण्याखाली धुवा आणि लगेच पाणी निथळू द्या. त्यावर थोडे मीठ आणि साखर घालून ५–१० मिनिटे झाकून ठेवल्यास पोहे छान मऊ होतात.

पोहे छान पिवळे दिसण्यासाठी हळद योग्य प्रमाणात वापरणे महत्त्वाचे आहे. फोडणी करताना तेलात प्रथम मोहरी तडतडू द्या, त्यानंतर कडीपत्ता, हिरवी मिरची, कांदा घालून परता. कांदा थोडा गुलाबी झाला की हळद घाला. हळद जास्त घातली तर रंग खूप गडद होतो, त्यामुळे संतुलन ठेवणे गरजेचे आहे.  पोहे मोकळे आणि मऊ राहावेत यासाठी फोडणीत घातल्यानंतर त्यांना हलक्या हाताने मिसळा. वारंवार ढवळू नका. तसेच पोहे घातल्यानंतर झाकण ठेवून २–३ मिनिटे वाफ येऊ द्या. हाताने पाण्याचा हबका मारा. यामुळे ते छान मऊ होतात. शेवटी वरून लिंबाचा रस, कोथिंबीर आणि ओले खोबरे घातल्याने चव अधिक वाढते.

पोहे अधिक चविष्ट करण्यासाठी शेंगदाणे आधीच परतून घालावेत. यामुळे कुरकुरीतपणा येतो आणि चवही छान लागते. थोडी साखर घातल्याने गोड-तिखट चव येते, जी अनेकांना खूप आवडते. तसेच चमचाभर साखर पोहे मऊ ठेवते. पोहे पौष्टिक करण्यासाठी काही सोपे बदल करता येतात. पोह्यात भरपूर भाज्या घालाव्यात जसे की गाजर, मटार, टोमॅटो. यामुळे फायबर आणि व्हिटामिन्स वाढतात. पोहे करण्यासाठी तेल जरा प्रमाणात वापरले तर हेच पोहे पौष्टिक ठरतात. तसेच पोटभरीचे असतात. 

Web Title : परफेक्ट पोहा रेसिपी: इन टिप्स से पोहा न होगा गीला, न सूखा।

Web Summary : परफेक्ट पोहा बनाने की कला सीखें! मध्यम-मोटे फ्लेक्स का उपयोग करें, हल्के से धोएं, और चीनी और नमक डालें। सरसों के बीज, करी पत्ते और प्याज भूनें। हल्दी सावधानी से डालें, धीरे से मिलाएं और भाप लें। नींबू, धनिया और नारियल से सजाकर स्वादिष्ट नाश्ता परोसें।

Web Title : Perfect Poha Recipe: Avoid soggy or dry poha with these tips.

Web Summary : Master the art of making perfect poha! Use medium-thick flakes, rinse lightly, and add sugar and salt. Sauté mustard seeds, curry leaves, and onions. Add turmeric carefully, mix gently, and steam. Garnish with lemon, coriander, and coconut for a delicious, fluffy breakfast.