Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > नाश्त्यासाठी करा बटाट्याचा खास वेगळा पदार्थ, बॉल्स म्हणा किंवा कटलेट्स चवीला भारी ...

नाश्त्यासाठी करा बटाट्याचा खास वेगळा पदार्थ, बॉल्स म्हणा किंवा कटलेट्स चवीला भारी ...

Make a special potato dish for breakfast, easy to make , takes less than 15 minutes , must try recipe : बटाटे उकडून करा पटकन हा नाश्ता, सोपी रेसिपी आणि चविष्टही.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2026 08:45 IST2026-05-02T08:40:10+5:302026-05-02T08:45:02+5:30

Make a special potato dish for breakfast, easy to make , takes less than 15 minutes , must try recipe : बटाटे उकडून करा पटकन हा नाश्ता, सोपी रेसिपी आणि चविष्टही.

Make a special potato dish for breakfast, easy to make , takes less than 15 minutes , must try recipe | नाश्त्यासाठी करा बटाट्याचा खास वेगळा पदार्थ, बॉल्स म्हणा किंवा कटलेट्स चवीला भारी ...

नाश्त्यासाठी करा बटाट्याचा खास वेगळा पदार्थ, बॉल्स म्हणा किंवा कटलेट्स चवीला भारी ...

बटाटा हा असा पदार्थ आहे जो जवळजवळ प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असतो. त्याची चव, मऊसर टेक्स्चर आणि पटकन शिजतो यामुळे तो नाश्त्यासाठी अगदी योग्य ठरतो. विशेष म्हणजे मुलांना बटाट्याचे पदार्थ खूप आवडतात, त्यामुळे सकाळच्या घाईतही त्यांच्यासाठी चविष्ट आणि पोटभर नाश्ता तयार करता येतो. (Make a special potato dish for breakfast, easy to make , takes less than 15 minutes , must try recipe )नाश्त्यासाठी बटाट्याचे पदार्थ बनवण्याचे आणखी एक मोठं कारण म्हणजे त्यांची विविधता. कधी पराठा, कधी कटलेट, कधी पोह्यात किंवा उपम्यात बटाट्याचा वापर करून वेगवेगळे पदार्थ करता येतात. त्यामुळे रोज तोच नाश्ता खाण्याचा कंटाळा येत नाही. थोडे मसाले आणि भाज्या घालून बटाटा अधिक पौष्टिकही बनवता येतो. असाच एक मस्त पदार्थ म्हणजे बटाटा आणि कॉर्नफ्लावरचे तळलेले बॉल्स म्हणा किंवा कटलेट्स. करायला सोपे आणि चवीला मस्त .

साहित्य 
बटाटा, पाणी, मीठ, काळीमिरी पावडर, कॉर्नफ्लावर, तेल

कृती
१. स्वच्छ धुतलेले बटाटे एका कुकरमध्ये घ्यायचे. त्यात पाणी ओतायचे आणि मीठ घालायचे. बटाटे शिजवून घ्यायचे. अगदी मऊ करायचे. त्याची सालं काढून घ्यायची. बटाटे कुस्करुन घ्यायचे. अगदी मस्त कुस्करायचे. त्यात अजिबात थोडाही तुकडा राहू देऊ नका.  छान मऊ असे मळा.

२. मग बाटाट्यात थोडा कॉर्नफ्लावर घाला. त्यात चवीनसुार मीठ घाला. तसेच त्यात थोडी काळीमिरी पावडर घालायची. थोडं गरम तेल घालायचं आणि मळून घ्यायचे. सगळं छान एक करायचं. 

३. कढईत तेल तापत ठेवायचे. बटाट्याच्या मिश्रणाचे गोलाकार आकाराचे गोळे तयार करा. चपटे करा जास्त मोठे नको मध्यम आकाराचे करा. तुम्हाला दुसरा आकार द्यायचा असेल तर तसही चालेल. आवडता आकार द्या. तेल तापल्यावर त्यात सगळे तुकडे तळून घ्या. दोन्ही बाजूंनी मस्त खमंग तळायचे. 

Web Title : आलू का झटपट नाश्ता: बनाएँ बॉल्स या कटलेट्स!

Web Summary : आलू से बनाएं झटपट नाश्ता - स्वादिष्ट बॉल्स या कटलेट्स! आलू, कॉर्नफ्लोर और मसालों से आसानी से बनने वाला यह व्यंजन बच्चों और बड़ों दोनों को पसंद आएगा। सुबह के लिए एक बढ़िया और अलग विकल्प।

Web Title : Quick & Easy Potato Snack: Balls or Cutlets for Breakfast!

Web Summary : Make delicious potato balls or cutlets for a quick breakfast. Simple ingredients like potatoes, cornflour, and spices create a satisfying and versatile dish. Perfect for kids and adults alike, offering a delightful twist on the usual morning fare.