Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > सकाळी ११ नंतर दुधाची एक घोटही कॉफी घेत नाहीत इटलीतील लोक, कारण असं जे वाचून आपणही पिणं बंद कराल

सकाळी ११ नंतर दुधाची एक घोटही कॉफी घेत नाहीत इटलीतील लोक, कारण असं जे वाचून आपणही पिणं बंद कराल

Coffee Rule In Italy : भारताप्रमाणेच जगातील इतरही अनेक देशांमध्ये चहा आवडीने प्यायला जातो. पण त्यांचे चहा घेण्याचे काही खास नियमही असतात. असाच एक देश म्हणजे इटली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 09:07 IST2026-04-15T09:07:17+5:302026-04-15T09:07:56+5:30

Coffee Rule In Italy : भारताप्रमाणेच जगातील इतरही अनेक देशांमध्ये चहा आवडीने प्यायला जातो. पण त्यांचे चहा घेण्याचे काही खास नियमही असतात. असाच एक देश म्हणजे इटली.

Italians don't drink even a sip of coffee with milk after 11 am, Know the reason | सकाळी ११ नंतर दुधाची एक घोटही कॉफी घेत नाहीत इटलीतील लोक, कारण असं जे वाचून आपणही पिणं बंद कराल

सकाळी ११ नंतर दुधाची एक घोटही कॉफी घेत नाहीत इटलीतील लोक, कारण असं जे वाचून आपणही पिणं बंद कराल

Coffee Rule In Italy : चहा भलेही आपल्याला जीवनाचा महत्वाचा भाग असेल, त्याच्याशिवाय दिवसाची चांगली सुरूवात होत नसेल पण तो शरीरासाठी किती आणि कसा घातक आहे हे नेहमीच समोर येत राहतं. अनेक हेल्थ एक्सपर्ट दुधाचा चहा न पिण्याचा आणि चहाची सवय कमी करण्याचा सल्ला वेळोवेळी देत असतात. कारण ज्याप्रकारे, ज्या प्रमाणात आपल्याकडे चहा प्यायला जातो किंवा कॉफी प्यायली जाते, त्यामुळे आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्यांचा धोका हल्ली खूप वाढला आहे.

भारताप्रमाणेच जगातील इतरही अनेक देशांमध्ये चहा आवडीने प्यायला जातो. पण त्यांचे चहा किंवा कॉफी घेण्याचे काही खास नियमही असतात. असाच एक देश म्हणजे इटली. इटलीमध्ये चहा त्यांच्या संस्कृतीचा भाग आहे. पण येथील लोक चहा पिण्याची पद्धत आणि वेळ फार काटेकोरपणे पाळतात. इथे सकाळी ११ वाजतानंतर दुधाचा चहा, कॉफी पिणं योग्य मानलं जातं नाही. आता हा नियम फारच विचित्र वाटू शकतो, पण त्यामागे काही खास कारणं आहेत. 

इटलीमधील कॉफी कल्चर लोकांच्या जीवनात खोलवर रूजलं आहे. इथे दिवसाची सुरूवात सामान्यपणे कॅपेचिनो आणि क्रोइसासोबत केली जाते. पण जशी सकाळी संपते, लोक दुधाच्या कॉफी टाटा टाटा -बाय बाय करतात. त्यानंतर ते केवळ ब्लॅक कॉफी किंवा एस्प्रेसो पेयाला प्राधान्य देतात. इटलीतील लोकांचं मत आहे की, दुधाची कॉफी पोटासाठी जड असते आणि ती केवळ सकाळी नाश्त्यावेळीच घ्यावी.


इटलीमध्ये हा नियम असण्यामागचं कारण पचन तंत्र आहे. इटलीमध्ये मान्यता आहे की, जेवणानंतर दूध किंवा दुधापासून तयार गोष्टींनी पचनक्रिया स्लो होते. त्यामुळे दुपारच्या जेवणानंतर किंवा रात्रीच्या जेवणानंतर कॉफी पिणं योग्य मानलं जात नाही. त्याऐवजी लोक छोटा एस्प्रेसो शॉट घेतात, ज्याने पचन चांगलं होण्यास मदत मिळते आणि आपल्याला हलकं वाटतं. जर आपण इटलीमध्ये रोम किंवा मिलानसारख्या मोठ्या शहरांमध्ये दुपारी जाऊ कॉफी मागितली तर आपण पर्यटक आहात हे त्यांना कळून येतं. स्थानिक लोक हा नियम फार गंभीरतेने पाळतात आणि अशाप्रकारे आपलं पचन चांगलं ठेवतात.

Web Title : इटली में सुबह 11 बजे के बाद दूध वाली कॉफी क्यों नहीं पीते?

Web Summary : इटली में लोग सुबह 11 बजे के बाद दूध वाली कॉफी पीने से बचते हैं, क्योंकि उनका मानना है कि इससे पाचन क्रिया धीमी हो जाती है। वे भोजन के बाद ब्लैक कॉफी या एस्प्रेसो पसंद करते हैं, जिससे पाचन में मदद मिलती है। यह इतालवी संस्कृति का हिस्सा है।

Web Title : Italians avoid milk coffee after 11 AM for digestion reasons.

Web Summary : Italians traditionally avoid milk-based coffee after 11 AM, believing it hinders digestion. They prefer black coffee or espresso, especially after meals, to aid digestion. This custom is deeply ingrained in Italian culture.